ब्रेकिंग! राज्यात अंगणवाड्यांमध्ये होणार 15000 मदतनीस पदांची भरती, पण ‘या’ कारणामुळे हुकणार मराठा उमेदवारांची संधी?

महाराष्ट्रातील जवळपास 13 हजार 11 मिनी अंगणवाड्यांमध्ये नव्याने पद भरती करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे.त्यामुळे आता राज्यातील अंगणवाड्यांमधील तब्बल 15000 अंगणवाडी मदतनीसांची रिक्त पदे भरली जाणार आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त पात्र उमेदवारांनी लाभ घेणे गरजेचे आहे.

Published on -

लहान मुलांच्या एकंदरीत शिक्षणाच्या दृष्टिकोनातून अंगणवाड्यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. केंद्र पुरस्कृत एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये सध्या एक लाखापेक्षा जास्त अंगणवाड्या कार्यरत आहेत.

तसेच आता या मिनी अंगणवाड्यांचा विस्तार करण्यात आला असून ज्या ठिकाणी आवश्यक असलेले अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची रिक्त पदे भरली जाणे गरजेचे आहे व याकरिता आता महाराष्ट्रातील जवळपास 13 हजार 11 मिनी अंगणवाड्यांमध्ये नव्याने पद भरती करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे.

त्यामुळे आता राज्यातील अंगणवाड्यांमधील तब्बल 15000 अंगणवाडी मदतनीसांची रिक्त पदे भरली जाणार आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त पात्र उमेदवारांनी लाभ घेणे गरजेचे आहे.

या अंगणवाड्यामध्ये मदतीनिसाची पदे नव्याने भरली जाणार

अंगणवाडी सेविकांसाठी बारावी पास असल्याचे अट आहे व या अटीविरोधात उच्च न्यायालयामध्ये याचिका देखील दाखल आहे. या याचिकेमुळे अंगणवाडी सेविकांची भरती स्थगित करण्यात आलेली आहे. या स्थगिती मुळे पूर्वीच्या ज्या मदतनीस महिला कर्मचारी बारावी पास आहेत त्यांना आता ज्या मिनी अंगणवाड्या मोठ्या झालेल्या आहेत अशा अंगणवाड्यांवर अंगणवाडी सेविका म्हणून नेमणूक दिली जात आहे.

त्यामुळे साहजिकच अंगणवाडी मदतनीसाची पदे रिक्त होत असल्याने आता ही नव्याने पदे भरली जाणार आहेत. या भरतीमध्ये शैक्षणिक पात्रतेवर 75 गुण मिळतात व उर्वरित 25 गुण हे विधवा, अनाथ तसेच एससी-एसटी, इतर मागास प्रवर्ग तसेच विमुक्त जाती व भटक्या जमाती,

आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक, विशेष मागास प्रवर्ग व दोन वर्षाचा अध्यापनाचा अनुभव इत्यादी बाबींवर आहेत. परंतु या सगळ्यांमध्ये एसीईबीसी प्रवर्गाचा समावेश नसल्यामुळे मराठा आरक्षणानंतर देखील अशा उमेदवारांना भरतीत लाभ होत असल्याची वस्तुस्थिती आहे.

 कशी केली जाते अंगणवाड्यांमधील पदभरती?

अंगणवाड्यांमधील भरती प्रक्रिया विषयी जर बघितले तर यामध्ये अंगणवाडी सेविका किंवा अंगणवाडी मदतनीस म्हणून उमेदवारांची भरती किंवा निवड करण्याकरिता 100 गुणांचा निकष लावण्यात आलेला असतो. यामध्ये जे उमेदवार बारावी उत्तीर्ण असतात त्यांना त्यांच्या गुणांच्या टक्केवारीनुसार 45 ते 60 गुण मिळतात.

उमेदवार जर पदवीधर असेल तर एक ते पाच गुण( टक्केवारीनुसार), पदव्युत्तर असलेल्यांसाठी चार गुण, उमेदवार डीएड पूर्ण आहेत त्यांच्यासाठी दोन तर बीएड पूर्ण केलेल्यांसाठी दोन व एमएससीआयटी करिता दोन गुण अतिरिक्त दिले जातात.

तसेच जे उमेदवार विधवा तसेच अनाथ असतात अशांना दहा गुण, एसटी व एससी प्रवर्गाकरिता पाच गुण आणि दोन वर्षाचा अनुभव असेल अशांना पाच गुण यामध्ये दिले जातात. परंतु यामध्ये एसीईबीसी प्रवर्गाचा समावेश करण्यात आलेला नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News