राज्यातील 44 लाख शेतकऱ्यांना फायदा देणारी मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना नेमकी काय आहे? वाचा ए टू झेड माहिती

योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांवर असलेला शेतीपंपांचा वीज बिलाचा भार उचलण्याची शासनाने ठरवले असून या योजनेच्या माध्यमातून राज्यातील 44 लाख 6 हजार शेतकऱ्यांच्या शेतीला पूर्णपणे मोफत वीज दिली जाणार आहे व या योजनेसाठी तब्बल 14,761 कोटी रुपयांचे अनुदान देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

Ajay Patil
Published:
free electricity scheme

शेतकऱ्यांसाठी अनेक प्रकारच्या योजना राबवल्या जातात व या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीसाठी असलेल्या पायाभूत सुविधा निर्माण करणे तसेच वेगवेगळ्या गोष्टींमध्ये त्यांच्यावर असलेला आर्थिक भार कमी करण्याच्या दृष्टिकोनातून अशा योजनांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.

या अनुषंगाने जर आपण महाराष्ट्र सरकारच्या दृष्टिकोनातून बघितले तर महाराष्ट्र सरकारने देखील शेतकऱ्यांसाठी अनेक प्रकारच्या योजना सुरू केल्या असून यातीलच महत्त्वाची गोष्ट म्हणजे अर्थसंकल्पात सादर करण्यात आलेली मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना होय.

या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांवर असलेला शेतीपंपांचा वीज बिलाचा भार उचलण्याची शासनाने ठरवले असून या योजनेच्या माध्यमातून राज्यातील 44 लाख 6 हजार शेतकऱ्यांच्या शेतीला पूर्णपणे मोफत वीज दिली जाणार आहे व या योजनेसाठी तब्बल 14,761 कोटी रुपयांचे अनुदान देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

 कोणत्या शेतकऱ्यांना मिळेल या योजनेचा लाभ काय आहे या योजनेचा कालावधी?

आपल्याला माहित आहे की विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती आणि शेतकरी हे आर्थिक अडचणींमध्ये सापडल्याचे सध्या चित्र आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत व्हावी या दृष्टिकोनातून 7.5 एचपी क्षमतेच्या शेतीपंप ग्राहकांना एप्रिल 2024 पासून मोफत वीज देण्याकरिता प्रामुख्याने ही योजना सुरू करण्यात आलेली आहे.

मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना-2024 एप्रिल 2024 ते मार्च 2029 म्हणजेच पाच वर्षांसाठी राबवण्यात येणार आहे. परंतु महत्वाचे म्हणजे तीन वर्षाच्या कालावधीनंतर या योजनेचा आढावा घेतला

जाणार असून त्यानंतर तिच्या मुदतवाढीबद्दल निर्णय घेतला जाणार आहे. या योजनेचा लाभ राज्यातील 7.5 एचपी पर्यंत मंजूर भार असलेल्या शेती पंप असलेले शेतकऱ्यांना मिळणार आहे.

 कधीपासून केली जाईल या योजनेची अंमलबजावणी?

या योजनेच्या माध्यमातून एप्रिल 2024 पासून 7.5 एचपी पर्यंतच्या शेतीपंप ग्राहकांना मोफत वीज मिळणार आहे व या वीज बिलाची रक्कम शासन महावितरण कंपनीला देणार असून 14,760 कोटी रुपये राज्य सरकार महावितरण कंपनीला देणार आहे.

या योजनेच्या माध्यमातून राज्यातील 44 लाख 3000 शेतकऱ्यांच्या 7.5 अश्वशक्ती क्षमतेपर्यंतच्या शेतीपंपाला मोफत वीज दिली जाणार आहे व याकरिता 14760 कोटी रुपये अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe