श्रीरामपूर मधून कांबळे की उदमले? विधानसभेसाठी कोण वरचड ठरणार…?

Ahmednagarlive24 office
Published:

Ahmednagar Politiics : श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जाती साठी राखीव आहे. तिथे सध्या काँग्रेस पक्षाचे लहू कानडे हे आमदार आहेत. त्यांना करण ससाणे गटाचे हेमंत ओगले यांनी उमेदवारीसाठी कडवे आव्हान उभे केले आहे. परंतु, काँग्रेस पक्ष विद्यमान आमदाराचे तिकीट कापण्याचा धोका पत्करेल, असे वाटत नाही.

काँग्रेस कडून लहू कानडे यांचीच उमेदवारी अंतिम होईल. तर हेमंत ओगले अपक्ष लढतात की अन्य पक्षात जातात हे पाहणे उत्सुकतेचे राहील. श्रीरामपूर ची जागा महायुती मध्ये शिवसेनेकडे जाईल हे आता जवळपास निश्चित मानले जात आहे. शिवसेना त्या दृष्टीने मोठ्या प्रमाणावर तयारी करत आहे. जिल्ह्यात एवढी एकच जागा शिवसेना लढवणार असल्याचे समजते.

त्यामुळे या जागेला महत्व प्राप्त झाले आहे. सध्या सेनेकडून माजी खासदार सदाशिव लोखंडे यांचे पुत्र प्रशांत लोखंडे व माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्या मध्ये स्पर्धा आहे. मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत लोखंडे यांचा पराभव झाला. त्यामुळे लगेच त्यांचा मुलाला संधी देण्याची शिवसेनेची तयारी नसल्याचे समजते.

माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकी आधी पक्षात प्रवेश केला व त्यांना विधानसभेचा शब्द दिला असल्याचे ते सांगतात. मात्र सलग दोन वेळा झालेला पराभव, शिक्षणाचा आणि वैयक्तिक कार्यकर्त्यांचा अभाव, या मुळे कानडे यांच्या तुलनेत त्यांचा निभाव लागणार नाही, असे सेनेत मानले जात आहे. म्हणून अन्य उमेदवारीच्या पर्यायावर पक्षाचे निरीक्षक काम करत असल्याचे समजते. सर्व पक्षाचे इच्छुक या निरीक्षकांच्या संपर्कात असल्याचेही समजते.

दरम्यान या सर्वात सध्या भाजपा किसान मोर्चाचे राज्य उपाध्यक्ष, माजी प्रशासकीय अधिकारी नितीन उदमले यांनी आघाडी घेतल्याचे समजते. उपलब्ध पर्यायात सर्वात उजवा उमेदवार म्ह्णून उदमले यांचे नाव अंतिम होत असल्याचे समजते. आज पर्यन्त एकदाही “भगवा” उमेदवार निवडून न आलेल्या या मतदारसंघात भगवा फडकवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शक्ती काम करत असून सर्वाना चालणारा उमेदवार म्हूणन नितीन उदमले हेच निश्चित होतील असे समजते. जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांना मानणारा मोठा वर्ग या मतदारसंघात असल्याने, त्यांचे माप कोणाच्या पारड्यात पडणार हे ही महत्वाचे आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe