Ahmednagar News : आयुष्यामध्ये भरपूर नाती आहेत काही नाती जन्मताच असतात तर काही नाती जोडली जातात मानली जातात पण त्या सर्व नात्यांपैकी मैत्री हे नात सगळ्यात वेगळे असत.
एक मित्रच असतो ज्याच्या समोर आपण आपल्या मनातलं सर्वकाही स्पष्टपणे बोलतो, आपल दु:ख वेदना सर्वकाही त्याच्यासोबत शेअर करतो.आपल्या आयुष्यामध्ये एखाद संकट आल की आपले खरे मित्रच संकटकाळी धावून येतात.
मैत्री ही श्रीकृष्ण आणि सुदामा सारखी असावी कधीही न तुटणारी आणि कोणत्याही परिस्थिती मध्ये कधीही न विसरणारी. मात्र आर्थिक वादातून मित्रानेच मित्राचा दारूमधून उच्च रक्तदाबाच्या व झोपेच्या गोळ्या देऊन त्यांचा खून केल्याचा प्रकार समोर आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिडकोतील राहणारे सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र सांबरे यांचा १४ महिन्यापूर्वी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे हद्दीत संशयास्पद मृतदेह आढळून आला होता.
याप्रकरणी कोपरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास पोलीस करत असताना गुन्हे शाखेचे अंमलदार मनोहर शिंदे यांना माहिती मिळाली की सांबरे यांचा आकस्मात मृत्यू नसून, खून करण्यात आला आहे. गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने संशयित आरोपी प्रमोद रणमाळे याला सीताफिने ताब्यात घेतले.
पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याने खूनाची कबुली दिली. दरम्यान पुढील कार्यवाहीसाठी त्याला कोपरगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक समाधान हिरे, यशवंत बेंडकोळी, पोलीस हवालदार मनोहर शिंदे, प्रकाश महाजन, चंद्रकांत गवळी, वाल्मिक चव्हाण, विशाल कुंवर, समाधान वाजे, तेजस मते, महेश खांडबहाले, स्वप्नील जुद्रे यांनी केली.
मृत अभिजित सांबरे हा संशयित आरोपी रणमाळे याचा मित्र होता. त्यांचे आर्थिक देवाण-घेवाणीवरून वाद होता. त्याने २७ जून २०२३ रोजी आर्थिक व्यवहारासाठी येवला येथे जायचे आहे, असे सांगून मयत अभिजित सांबरे यास दारू पाजली.
दारू पिण्याच्या सवयीचा फायदा घेत रात्री नऊ वाजेच्या सुमारास दारूमधून उच्च रक्तदाबाच्या व झोपेच्या अतिरिक्त गोळ्यांचा डोस दिला. त्यानंतर बुलेटवर बसून येवला येथून संभाजीनगरकडे जाणाऱ्या रस्त्याने वैजापूर गावाजवळून कोपरगाव रस्त्याने घेऊन गेला.
शुध्द हरपल्याचा अंदाज घेऊन बुलेट थांबवून त्यास कोपरगाव रस्त्याच्या कडेला फेकून देत पळ काढला. याबाबत सांबरे यांच्या परिवाराने संशयित हरणमाडे याच्यावर संशय घेतला होता. त्यानुसार पोलीस त्याचा तपास करत असताना गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने त्याला ताब्यात घेतले.