Ahmednagar News : कर्जत-जामखेड मतदार संघातील कोणतीही महिला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत पासून वंचित राहणार नाही तुमचा आशीर्वाद भाऊ म्हणून माझ्या पाठीशी राहू द्या, मात्र ही योजना बंद पडावी म्हणून कोर्टात जाणाऱ्या सावत्र भावांना आगामी विधानसभा निवडणुकीत घरी बसवा अशी टीका आमदार प्रा. राम शिंदे यांनी विरोधकांचे नाव न घेता केली.
ते खर्डा येथे ‘मान नात्याचा भाऊ-बहिणीं’चा रक्षाबंधन मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या व दुसरा हप्ता जमा झाल्याबद्दल लाडक्या बहिणीच्या रक्षाबंधनच्या सोहळ्यात ते बोलत होते. महिलांच्यावतीने आ. राम शिंदे यांचा महिलांनी राख्या बांधून सत्कार केला.
याप्रसंगी खड्यांच्या सरपंच संजीवनी वैजनाथ पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस युती महिला प्रदेशाध्यक्ष संध्या सोनवणे, उर्मिला मुरूमकर, अर्चना राळेभात, रिंकू काशीद, ज्योती गोलेकर, चंद्रकला जायभाय, मुक्ता गोपाळघरे, दिपाली गर्जे, राजश्री कोरे, ज्योती कांबळे, शितल कांबळे, शोभा गोपाळघरे, मंगल गोपाळघरे, इरफान आतार, तबशीर मोमीन, ज्योती खोत, सारिका सुरवसे आदी महिला व्यासपीठावर उपस्थित होत्या.
आमदार राम शिंदे पुढे बोलताना म्हणाले की, महाराष्ट्रातील कष्टकरी व सन्मानाने जगणाऱ्या महिलांना खऱ्या अर्थाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने न्याय देण्याची भूमिका घेतली आहे.
आमचे विरोधक ही योजना बंद करण्यासाठी सावत्र भाऊ म्हणून कोर्टात गेले आहेत ही योजना टिकणार नाही अशा खोट्या अफवा पसरवत आहेत. त्यांना येणारा विधानसभा निवडणुकीत घरी बसवा असे वक्तव्य राम शिंदे यांनी केले.
मी खात्रीपूर्वक सांगतो उद्याच्या काळात महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनाही तीन हजार रुपये महिना करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
महायुती सरकारच्या काळात रेशन दुकानावर मोफत धान्य, महिलांना वर्षात तीन मोफत सिलेंडर, आनंदाचा शिधा देण्याचे काम या लाडक्या सरकारने केले आहे असे मत आमदार राम शिंदे यांनी व्यक्त केले.
आपला भाऊ म्हणून रामभाऊ च्या पाठीमागे आपला आशीर्वाद राहू द्या, असे त्यांनी शेवटी सांगितले. कार्यक्रम संपल्यानंतर सर्व महिलांची भोजन व्यवस्था केली होती, त्यानंतर लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाच्या निमित्ताने भाऊबीज ओवाळणी म्हणून उपस्थित महिलांना आमदार राम शिंदे मित्र मंडळाच्या वतीने साड्यांचे वाटप करण्यात आले.