आधी विधानसभा मग स्थानिक स्वराज्यसंस्था ? प्रशासकराजमुळे गाव पुढारी हिरमुसले …

Ahmednagarlive24 office
Published:

Ahmednagar News : सध्या सर्वजण विधानसभा निवडणूक कधी एकदा जाहीर होते याकडे डोळे लावून बसले आहेत. कारण जवळपास दोन वर्षांपासून जिल्हा परिषदेसह अनेक स्थनिक स्वराज्य संस्थांवर प्रशासकराज सुरू आहे.

त्यामुळे अनेकांचे स्थनिक स्वराज्य संस्थांवर काम करण्याचे स्वप्न अधांतरीच राहिले आहे. त्याचसोबत गावच्या विकास कामांनाही ब्रेक लागल्याचे चित्र आहे. त्यामुळे एकदा विधानसभा निवडणूक पार पडली कि आपण मोकळे असा काहीसा प्लॅन सध्या गाव पुढारी आखत आहेत.

राज्यात विधानसभा निवडणूक होण्याच्या हालचाली झाल्या सुरू आहेत. आगामी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये निवडणूक होण्याचे संकेत राजकीय वर्तुळातून मिळत आहेत. तर दुसरीकडे, दोन- अडीच वर्षांपासून मिनी मंत्रालय म्हणून गावखेड्यात ओळख असलेल्या पंचायत समिती, जिल्हा परिषदमध्ये प्रशासनराज सुरू आहे.

प्रशासकराजमुळे सर्वसामान्य नागरिकांची कामे वेळेवर होत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. गावच्या विकास कामांनाही ब्रेक लागल्याचे चित्र आहे.

मागील दोन वर्षांपासून पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुका झालेल्या नाहीत. पंचायत समिती व जिल्हा परिषदेचा कारभार प्रशासकाच्या हाती आलेला आहे. पदाधिकारी नसल्याने अधिकाऱ्यांवर कोणाचाही वचक राहिलेला नाही.

गाव पुढाऱ्यांना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे वेध लागलेले आहेत. परंतु निवडणुकीचा कोणताही अंदाज दिसत नसल्यामुळे तेही आता शांतच बसलेले आहेत. लोकसभेची निवडणूक झाली आणि खासदार दिल्लीला गेले आहेत.

विधानसभेची निवडणूक नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये होण्याच्या हालवाली आहेत परंतु जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत यावर काम करण्याची इच्छा असणान्या इच्छुकांना मात्र आपल्या नेत्यांच्या फक्त पालख्या वाहण्याची वेळ आली आहे. एकूणच परिस्थिती पाहता नव्या वर्षातच या होण्याची शक्यता आहे.

नवीन सरकार स्थापन झाल्यावर म्हणजे पुढील वर्षी २०२५ मध्ये या निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेवरील प्रशासकराज हटणार आहे. सध्या राजकीय कार्यकर्त्यांमध्ये एक प्रकारचा निरुत्साह पाहायला मिळत आहे.

महाविकास आघाडीतील कार्यकर्ते लोकसभेमुळे जरा उत्साहात आहेत. परंतु महायुतीच्या कार्यकर्त्यांना पदेही नाहीत आणि अन्य लाभ निवडक लोकांनाच, त्यामुळे त्यांच्यात मोठी नाराजी आहे.

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe