Home Loan News : तुम्हीही नजीकच्या काळात होम लोन घेण्याच्या तयारीत आहात का? अहो मग आजची बातमी तुमच्यासाठी कामाची ठरणार आहे. खरंतर घरांच्या वाढलेल्या किमती पाहता अलीकडे होम लोन घेऊनच घर खरेदीचे स्वप्न पूर्ण केले जात आहे. विविध बँका ग्राहकांना परवडणाऱ्या व्याजदरात होम लोन उपलब्ध करून देत आहेत.
मात्र होम लोन घेताना बँका काही गोष्टीं कसुन तपासत असतात. यातीलच एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सिबिल स्कोर. पण, असे बरेच लोक आहेत जे की CIBIL स्कोर हलक्यात घेतात. सिबिल स्कोर सुधारण्यासाठी कोणीच प्रयत्न करत नाहीत.
याउलट अशा काही छोट्या-मोठ्या चुका करतात ज्यामुळे सिबिल स्कोर कमी होत राहतो. पण, एक साधा CIBIL स्कोर तुमचे लाखो रुपयांचे नुकसान करू शकते.
सिबिल स्कोर खराब असेल तर ही एक चूक तुम्हाला महागात पडू शकते. जर तुमचा CIBIL स्कोर खराब असेल तर तुम्हाला 50 लाख रुपयांच्या गृहकर्जावर चक्क 19 लाख रुपयांचे नुकसान सहन करावे लागू शकते.
म्हणून CIBIL स्कोअर चांगला ठेवावा आणि तो खराब होऊ देऊ नये, असा सल्ला तज्ञांनी दिला आहे. आता आपण जर सिबिल स्कोर कमी असेल तर यामुळे 50 लाखाच्या गृहकर्जावर 19 लाख रुपयांच्या नुकसानीचा हिशेब जाणून घेणार आहोत.
19 लाखांचे नुकसान कसे होणार?
समजा तुमचा CIBIL स्कोर 820 आहे आणि तुम्ही 20 वर्षांच्या कालावधीसाठी 50 लाख रुपयांचे गृहकर्ज घेतले आहे, जे तुम्हाला सुमारे 8.35 टक्के दराने मिळू शकते. कारण की तुमचा सिबिल स्कोर चांगला आहे.
अशा प्रकारे तुम्हाला 20 वर्षात सुमारे 53 लाख रुपयांच्या व्याजासह एकूण 1.03 कोटी रुपये द्यावे लागतील. पण, जर तुमचा CIBIL स्कोर खूप कमी असेल. समजा तुमचा सिबिल स्कोर 580 आहे मग तुम्हाला हे कर्ज सुमारे 10.75 टक्के दराने मिळेल.
अशा प्रकारे, तुम्हाला 71.82 लाख रुपये व्याज द्यावे लागेल, जे पूर्वीपेक्षा सुमारे 18.82 लाख रुपये अधिक आहे. म्हणजे तुमचा सिबिल स्कोअर चांगला नसल्यामुळे तुम्ही तुमच्या एकूण कर्जाच्या एक तृतीयांशपेक्षा जास्त पैसे गमावू शकता.
अशा तऱ्हेने सिबिल स्कोर कमी असला तर तुमचे 19 लाख रुपयांपर्यंतचे नुकसान होऊ शकते. यामुळे नेहमीच सिबिल स्कोर कसा चांगला राहील याकडे लक्ष असणे आवश्यक आहे.