बँकेमधून पटकन कर्ज हवे तर नुसता सिबिल स्कोरच डोक्यात नका ठेवू! ‘या’ गोष्टी देखील असतात खूपच महत्त्वाच्या, तरच मिळते कर्ज

जेव्हा आपण बँकेकडे कर्जासाठी अर्ज करतो तेव्हा बँकेच्या माध्यमातून मात्र अर्जदाराचा सिबिल स्कोरच नाही तर इतर काही गोष्टी देखील बघितल्या जातात व त्यानंतरच कर्जासाठीचा केलेला अर्ज मंजूर केला जातो किंवा कर्ज मंजूर केले जाते.

Ajay Patil
Published:
bank loan

आपत्कालीन परिस्थितीमध्ये जेव्हा आपण बँकेच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारची कर्ज म्हणजेच वैयक्तिक कर्ज वगैरे साठी अर्ज करतो किंवा त्यासोबत वाहन खरेदीसाठी वाहन कर्ज आणि घर खरेदीसाठी होमलोन सारख्या कर्जासाठी अर्ज करतो तेव्हा बँकेच्या माध्यमातून असलेल्या आवश्यक अटी व शर्ती आपल्याला पूर्ण करणे गरजेचे असते.

यामध्ये सिबिल स्कोर म्हणजेच क्रेडिट हिस्टरी महत्वाची असते व सिबिल स्कोर जर तुमचा चांगला असेल तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचे कर्ज सहजपणे उपलब्ध होते व विशेष म्हणजे दिले जाणारे हे कर्ज तुम्हाला कमी व्याजदरात मिळू शकते.

त्यामुळे बँकेतून कर्ज घेण्याचा जेव्हा विचार येतो तेव्हा सगळ्यात अगोदर आपल्या डोक्यात सिबिल स्कोर ही एक बाब प्रकर्षाने असते व त्याचाच आपण जास्त करून विचार करत असतो.

परंतु जेव्हा आपण बँकेकडे कर्जासाठी अर्ज करतो तेव्हा बँकेच्या माध्यमातून मात्र अर्जदाराचा सिबिल स्कोरच नाही तर इतर काही गोष्टी देखील बघितल्या जातात व त्यानंतरच कर्जासाठीचा केलेला अर्ज मंजूर केला जातो किंवा कर्ज मंजूर केले जाते.

 बँकेतून कर्ज घेण्यासाठी सिबिल सोबत या गोष्टी देखील असतात महत्त्वाच्या

1- डीटीआय रेशियो( कर्जउत्पन्नाचे प्रमाण)- जेव्हा बँकेमध्ये कर्ज घ्यायला जातात तेव्हा बँक कर्ज देण्यापूर्वी जसा सिबिल स्कोर अगोदर तपासते. त्यानंतर मात्र तुमचे बँक कर्ज व उत्पन्नाचे प्रमाण याचे गुणोत्तर बँकेच्या माध्यमातून तपासले जाते. हे प्रमाण तपासताना महिन्याचे कर्जाचे पेमेंट आणि तुमचा एकूण पगार किंवा तुमची उत्पन्न यांची तुलना करून हा रेशियो काढला जातो.

यामध्ये तुमचा डीटीआय रेशियो जितका कमी असेल तितके तुम्हाला कर्ज मिळण्याची शक्यता वाढते. या माध्यमातून तुमच्यावर किती कर्ज आहे व तुमच्या हातात किती पैसा शिल्लक राहतो हे बँकेला समजत असते म्हणून हा रेशियो महत्त्वाचा असतो.

2- ईएमआय/ एनएमआय रेशियो हे गुणोत्तर देखील कर्ज मिळण्याच्या बाबतीत खूप महत्त्वाचे असते. या अंतर्गत तुमचे निव्वळ मासिक उत्पन्नाचा कोणता भाग सध्याचे तुमचे ईएमआय,तुम्ही घेत असलेल्या प्रस्तावित कर्जाच्या ईएमआय वर खर्च केला जाईल याची गणना किंवा याचा अंदाज बँकेच्या माध्यमातून केला जातो.

त्यामध्ये तुमचा ईएमआय/ एनएमआय 50 ते 55 टक्के पर्यंत असेल तर ते योग्य मानले जाते व बँकेच्या माध्यमातून तुम्हाला कर्ज मिळू शकते. परंतु यापेक्षा जर ईएमआय/ एनएमआय जास्त असेल तर बँक तुम्हाला कर्ज देण्यामध्ये टाळाटाळ करू शकते किंवा कर्ज दिले तरी त्यावर जास्तीचा व्याजदर आकारला जातो.

3- एलटीव्ही रेशियो( लोन टू व्हॅल्यू रेशिओ)- हा रेशो प्रामुख्याने होमलोनच्या बाबतीत बघितला जातो. याच्या मदतीने बँकेला तुमची मालमत्ताच्या तुलनेत तुमच्या कर्जाची किंमत किती आहे हे या रेशियोच्या  माध्यमातून दर्शविले जाते.

त्यामुळे कर्ज सुरक्षित होण्यास मदत होते व कर्ज देणारी बँक या माहितीचा वापर आवश्यक अटी व शर्ती लागू करण्यासाठी करू शकते. तसेच या रेशियोच्या मदतीने बँकेला तुम्हाला कर्ज देते तेव्हा त्यामध्ये काही धोका आहे की नाही हे देखील समजते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe