पाऊस पुन्हा हजेरी लावणार ! ‘या’ तारखेपासून महाराष्ट्रात मुसळधार पावसाला सुरुवात होणार, पंजाबरावांचे भाकित

या काळात राज्यातील विविध भागांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. प्रामुख्याने 23 ते 25 सप्टेंबर दरम्यान राज्यातील काही भागांमध्ये खूप मोठ्या पावसाची शक्यता आहे. 21 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत राज्यातील लातूर, नांदेड, परभणी, सांगली, सातारा, धाराशिव, सोलापूर, कोल्हापूर, कोकण, अहमदनगर, पुणे, बीड या भागात जोरदार ते अतिजोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

Tejas B Shelar
Updated:
Panjabrao Dakh Havaman Andaj

Panjabrao Dakh Havaman Andaj : आजपासून पुढील पाच ते सहा दिवस महाराष्ट्रातील हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. हवामान अभ्यासक पंजाब रावांनी हा नवीन अंदाज दिला आहे. पंजाबरावांनी वर्तवलेल्या नवीन हवामान अंदाजानुसार, आजपासून पाच ते सहा दिवस म्हणजेच 20 सप्टेंबर पर्यंत महाराष्ट्रातील हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार आहे.

या काळात राज्यातील कोणत्याचं जिल्ह्यात पावसाची हजेरी पाहायला मिळणार नाही. मात्र तदनंतर महाराष्ट्रातील हवामान बदलणार आहे. त्यामुळे या काळात शेतीमधील सर्व महत्त्वाची कामे पूर्ण करून घ्यावीत जेणेकरून नुकसान सहन करावे लागणार नाही असा सल्ला जाणकारांनी दिला आहे.

खरेतर सध्या महाराष्ट्रातील बहुतांशी भागांमधील सोयाबीन पीक हार्वेस्टिंग साठी तयार झालेले आहे. यामुळे ज्या शेतकऱ्यांचे सोयाबीन पीक काढणीसाठी तयार असेल त्यांनी सोयाबीनची काढणी करून घ्यावी आणि काढणी झालेला शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा असे आवाहन पंजाब रावांनी केले आहे.

कारण की राज्यात 21 सप्टेंबर पासून पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे. खरे तर बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा आता निवळला आहे. 7 सप्टेंबरच्या सुमारासं बंगालच्या उपसागरात एक कमी दाबाचा पट्टा तयार झाला होता ज्यामुळे राज्यात सात ते दहा दरम्यान चांगला पाऊस झाला.

मात्र तदनंतर पावसाची उघडीप पाहायला मिळाली. महत्त्वाचे म्हणजे आणखी पाच ते सहा दिवस महाराष्ट्रात पाऊस पडणार नाही अशी शक्यता आहे. तथापि 21 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता आहे. या काळात राज्यातील विविध भागांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.

प्रामुख्याने 23 ते 25 सप्टेंबर दरम्यान राज्यातील काही भागांमध्ये खूप मोठ्या पावसाची शक्यता आहे. 21 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत राज्यातील लातूर, नांदेड, परभणी, सांगली, सातारा, धाराशिव, सोलापूर, कोल्हापूर, कोकण, अहमदनगर, पुणे, बीड या भागात जोरदार ते अतिजोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

काही ठिकाणी अतिवृष्टी देखील होऊ शकते असाही अंदाज पंजाब रावांनी दिला आहे. यामुळे पूरस्थिती तयार होईल असे पंजाब रावांचे म्हणणे आहे. खरंतर या काळात राज्यात सर्व दूर पाऊस पडण्याची शक्यता आहे मात्र विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा जोर राज्याच्या इतर भागापेक्षा अधिक राहणार आहे. एवढेच नाही तर ऑक्टोबर महिन्यातही राज्यात जोरदार पाऊस होणार असा अंदाज आहे.

राज्यात सात ते नऊ ऑक्टोबर दरम्यान आणि 21 ते 23 ऑक्टोबर दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हिवाळ्याला कधीपासून सुरुवात होणार याविषयीही पंजाब रावांनी एक नवीन अंदाज दिला आहे. पंजाबरांच्या मते यावर्षी पाच नोव्हेंबर पासून कडाक्याच्या थंडीला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe