10 हजार कोटींचा मालक संघर्षात असतो का ? ते कधी रोजगार हमीवर गेलेत का ? राम शिंदे यांची रोहित पवारांवर खरमरीत टीका

हा विधानसभा मतदारसंघ महाराष्ट्रातील राजकारणात एक वेगळे स्थान ठेवतो हे काही वेगळे सांगायला नको. या मतदारसंघाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष असते. यंदाही या मतदारसंघाकडे महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही गटांचे विशेष लक्ष आहे. गेल्या निवडणुकीत या मतदारसंघात राम शिंदे यांचा पराभव झाला होता. शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी रामाभाऊंचा पराभव केला होता.

Tejas B Shelar
Updated:
Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : येत्या काही दिवसांनी महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीचा बिगुल वाचणार आहे. यामुळे आत्तापासूनच महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या पायाला भिंगरी लागली आहे. नेतेमंडळी पायाला भिंगरी बांधून सर्वसामान्यांमध्ये पोहचत आहेत. कार्यकर्त्यांसोबत नेत्यांच्या भेटीगाठी वाढत आहेत. कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात देखील असेच दृश्य पाहायला मिळतय.

हा विधानसभा मतदारसंघ महाराष्ट्रातील राजकारणात एक वेगळे स्थान ठेवतो हे काही वेगळे सांगायला नको. या मतदारसंघाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष असते. यंदाही या मतदारसंघाकडे महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही गटांचे विशेष लक्ष आहे. गेल्या निवडणुकीत या मतदारसंघात राम शिंदे यांचा पराभव झाला होता. शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी रामाभाऊंचा पराभव केला होता.

यावेळी सुद्धा या मतदारसंघात राम शिंदे विरुद्ध रोहित पवार अशीच लढत होणार अशी शक्यता आहे. दरम्यान शिंदे यांनी विद्यमान आमदार रोहित पवार यांच्यावर जामखेड येथून जोरदार हल्ला चढवला आहे. सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आला त्याच्या वाटेला संघर्ष कसा येईल असं म्हणत शिंदे यांनी पवारांवर खरमरीत टीका केली आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की एकनाथ शिंदे सरकारने अलीकडेच जाहीर केलेल्या लाडकी बहीण योजनेचा पहिला आणि दुसरा हप्ता जमा झाल्याबद्दल जामखेड मधील लाडक्या बहिणींनी रामाभाऊंचा नान्नज येथे सत्कार ठेवला होता. यावेळी राम शिंदे यांना राखी बांधली गेली आणि त्यांचा उपस्थित महिलांनी सत्कार केला. या कार्यक्रमावेळी बोलतांना आमदार महोदयांनी, “ते म्हणतात, आम्ही संघर्ष करतो.

श्रीमंतांच्या घरी जन्माला आल्यावर संघर्ष असतो का ? जो माणूस सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आला, त्यांच्या वाट्याला संघर्ष कसा येईल ? १० हजार कोटींचा मालक संघर्षात असतो का ? ते कधी रोजगार हमीवर गेले का ? कधी ज्वारी उपटली का ? कधी करडीचा पाटा उपटला का ? पण, या लाडक्या रामभाऊच्या बापाने ३५ वर्षे सालं घातलेत, एका सालगड्याचा पोरगा सरपंच झाला, दोनदा आमदार झाला, मंत्री अन पालकमंत्री झाला, पडला तरी परत आमदार झाला, याला म्हणायचं संघर्ष..”, असं म्हणतं विद्यमान आमदार रोहित पवार यांच्यावर नाव न घेता बोचरी टीका केली आहे.

पुढे बोलताना राम शिंदे यांनी तुम्ही आम्हाला इंग्रजांसारखं किती दिवस गंडवणार? गरीब माणूस गरीबच राहिला पाहिजे अशी ज्याची संकल्पना आहे त्यांना आता काम दाखवण्याची वेळ आली आहे. काम दाखवण्यासाठी ते आता चुली वाटत सुटले आहेत. सरकार गॅस वापरण्यासाठी प्रोत्साहन देत आहे आणि ते आता चुली वाटत आहेत. ते म्हणाले होते आम्ही तुमची बारामती करू.

पण, तुम्ही चुली वाटून आमची बारामती करणार आहात का? आमची प्रगती करायची सोडून तुम्ही चुली वाटायला लागलात. मागच्या निवडणुकीच्या वेळी बारामती ॲग्रो ला येथून अनेक गाड्या भरून जायच्या. मात्र गत चार वर्षांपासून बारामतीला कोणालाच नेले नाही. न्यायचं म्हटलं तर पैसे भरायला लावायचे. आता निवडणूक जवळ आली असल्याने पुन्हा एकदा गाड्या फिरायला लागल्या आहेत.

आमच्या लोकांचा सन्मान करण्याऐवजी गेली पाच वर्षे तुम्ही अवमान केला आहे, अशा शब्दात राम शिंदे यांनी रोहित पवार यांचा समाचार घेतला आहे. सध्या मतदारसंघात विधान परिषद आमदार प्रा. राम शिंदे यांच्या या वक्तव्याची फारचं चर्चा सुरु आहे. गेल्या निवडणुकीत आपल्या वाटेला आलेला पराभवाचा वचपा काढण्यासाठी यावेळी रामभाऊ पूर्ण ताकतीनिशी मैदानात उतरले आहेत.

याचीच झलक जामखेड येथील महिलांनी आयोजित या सत्कार सोहळ्यात पाहायला मिळाली. नक्कीच आगामी काळात या दोन्ही उभय नेत्यांमध्ये आणखी भयान शाब्दिक युद्ध पाहायला मिळणार आहे. यामुळे कर्जत जामखेडची यंदाची निवडणूक गेल्या निवडणुकीपेक्षा अधिक रंगतदार होण्याची शक्यता आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe