Farmer Success Story:- शिक्षण करून नोकरी करणे हा जो काही ट्रेंड होता तो आता पूर्णपणे बदललेला असून नोकऱ्या खूप कमी प्रमाणात असल्यामुळे आता अनेक व्यवसायांकडे उच्चशिक्षित तरुण वळाल्याचे दिसून येत आहे. यामध्ये ग्रामीण भागातील आणि विशेषता शेतकरी कुटुंबातील उच्च शिक्षित तरुण नोकरी न मिळाल्यामुळे आता शेती व्यवसायाकडे वळले असून त्यांनी मात्र शेतीमध्ये आधुनिकतेचे बीज रोवण्यास सुरुवात केलेली आहे.
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत वेगवेगळ्या पिकांच्या लागवडीच्या माध्यमातून भरघोस उत्पादन घेऊन कमीत कमी क्षेत्रात देखील लाखो रुपये कमावण्याची किमया देखील त्यांनी साध्य केलेली आहे. आता शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाने फळबागांच्या लागवडीपासून फुल पिकांची लागवड व मसाला पिकामध्ये आले व हळदीच्या लागवडीतून देखील मोठ्या प्रमाणावर पैसे मिळवताना सध्या दिसून येत आहेत.
गेल्या काही वर्षापासून हळद आणि आले पिकाला चांगला बाजार भाव मिळत असल्याने कमीत कमी क्षेत्रात जास्त उत्पादन घेऊन लाखात उत्पन्न शेतकरी मिळवत आहेत. याच पद्धतीने जर आपण बीडच्या होळ येथील विजय शिंदे या शेतकऱ्याचे उदाहरण घेतले तर त्याने हळद पिकामध्ये सातत्य ठेवून सध्या 25 गुंठे क्षेत्रामध्ये हळद लागवड करून लाखोत उत्पन्न घेतले आहे.
हळद पिकातून घेतले लाखोत उत्पन्न
त्याबाबत सविस्तर वृत्त असे की, बीड जिल्ह्यातील होळ या गावचे विजय शिंदे प्रगतिशील शेतकरी असून गेल्या चार ते पाच वर्षापासून त्यांनी हळद लागवडीमध्ये सातत्य ठेवलेले आहे. शिंदे हे फक्त 25 गुंठ्यामध्ये हळदीचे लागवड करतात व त्या पिकाच्या माध्यमातून लाखोत उत्पन्न घेतात.
या हळद लागवडीच्या माध्यमातून त्यांना चांगला नफा मिळतो. 25 गुंठे हळद लागवड त्यांनी केलेली असून या पिकामध्ये त्यांनी मुग या आंतरपिकाचा देखील अंतर्भाव करुन त्या माध्यमातून देखील चांगले उत्पन्न मिळवले आहे. कमी क्षेत्रात जास्तीत जास्त उत्पन्न घेण्यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असल्याचे दिसून येतात.
विजय शिंदे हे हळदीच्या लागवडीपासून तर हळद थेट बाजारपेठेपर्यंत विक्रीसाठी ते विशेष गोष्टींची काळजी ते घेत असतात व त्यामुळेच त्यांना हळदी पासून भरघोस उत्पादन आणि आर्थिक उत्पन्न देखील मिळते.
तसेच हळद पिकाला फवारणी व आंतरमशागतीसाठी आवश्यक निंदनी तसेच पाणी व्यवस्थापन ते अगदी वेळेला करतात व त्याचा देखील उत्पादन वाढीमध्ये खूप मोठी मदत त्यांना होते. विजय शिंदे हे पंचवीस गुंठे हळद लागवडीतून वर्षाला पाच ते सहा लाख रुपयांची कमाई करतात.
हळद आरोग्यास लाभदायक म्हणून मागणी जास्त
आपल्याला माहित आहे की दैनंदिन जीवनामध्ये हळदीला खूप मोठे महत्त्व असून आहारामध्ये मोठ्या प्रमाणावर हळद पावडरचा समावेश केला जातो. हळद आरोग्याला खूप फायदेशीर असल्यामुळे बाजारपेठेत देखील हळदीला खूप मागणी असते.
त्यामुळे शेतकरी बंधू देखील हळद लागवडीला आता मोठ्या प्रमाणावर प्राधान्य द्यायला लागले आहेत. विजय शिंदे यांनी हळद पिकाच्या माध्यमातून चांगली कमाई करत स्वतःची आर्थिक प्रगती केली आहे व हळद पिकाच्या माध्यमातून चांगले आर्थिक उत्पन्न मिळते हे देखील त्यांनी सिद्ध करून दाखवले आहे.