अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघ : महायुतीत वादाची ठिणगी, जगतापांच्या विरोधात भाजपाची मोठी खेळी, जगतापांच्या गटात अस्वस्थता

अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघाची जागा आपल्याकडेच यावी असा चंग भाजपाच्या नव्या जुन्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी बांधला आहे. खरे तर गेल्या निवडणुकीत या जागेवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे संग्राम जगताप निवडून आलेत. सध्या संग्राम जगताप हे अजितदादा यांच्या गटात असून महायुतीचा एक भाग आहेत.

Tejas B Shelar
Published:
Ahmednagar Politics News

Ahmednagar Politics News : महाविकास आघाडी आणि महायुतीचे उमेदवार लोकसभा निवडणुकीच्या ट्रेलर नंतर आता विधानसभा निवडणुकीच्या पिक्चर कडे वळाले आहेत. राज्यातील दोन प्रमुख पक्ष फुटल्यानंतर प्रथमच विधानसभेची निवडणूक होत आहे. यामुळे या निवडणुकीकडे फक्त महाराष्ट्राचेचं लक्ष लागून आहे असे नाही तर संपूर्ण देशाचे या निवडणुकांकडे विशेष लक्ष राहणार आहे. यंदाच्या निवडणुकीत जनता कोणाला कौल देणार ही गोष्ट पाहणे खूपच उत्सुकतेचे ठरणार आहे.

कारण की, गेल्या काही महिन्यांमध्ये महायुती सरकारने सर्वसामान्यांसाठी असे मोठ-मोठे निर्णय घेतले आहेत ज्यामुळे निवडणुकीचा कौल महाविकास आघाडीकडे झुकणार की महायुतीकडे झुकणार हे आत्ताच ठामपणे सांगणे अशक्य आहे. जरूर लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी महायुतीला वरचढ भरली आहे.

मात्र लोकसभा निवडणुकीत आलेल्या पराभवातून धडा घेत महायुतीच्या नेत्यांनी आणि महायुती सरकारने सर्वसामान्य मतदारांना आकर्षित करण्यासाठी 100 नाही तर 110% काम केले आहे. साहजिकच याचे रिझल्ट देखील पाहायला मिळणार आहेत. पण, निवडणुकीच्या आधीच महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे.

अजून निवडणुकांच्या तारखा जाहीर झालेल्या नाहीत. वंचित बहुजन आघाडी आणि राजसाहेब ठाकरे यांच्या मनसेकडून काही उमेदवारांची नावे फायनल करून ती जाहीर करण्यात आली आहेत. उर्वरित पक्षांकडून अजूनही उमेदवारांची नावे जाहीर झालेली नाहीत. अशातच मात्र महायुतीमध्ये जागा वाटपावरून गदारोळ सुरू झाल्याचे चित्र आहे.

अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघाची जागा आपल्याकडेच यावी असा चंग भाजपाच्या नव्या जुन्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी बांधला आहे. खरे तर गेल्या निवडणुकीत या जागेवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे संग्राम जगताप निवडून आलेत. सध्या संग्राम जगताप हे अजितदादा यांच्या गटात असून महायुतीचा एक भाग आहेत.

गेल्या निवडणुकीत त्यांनी या जागेवरून निवडणूक जिंकली असल्याने यावेळीही महायुतीकडून अजितदादा यांच्या गटाला ही जागा दिली जाऊ शकते. मात्र अशातच आता भारतीय जनता पक्षाच्या नगर शहरातील जुन्या आणि नव्या पदाधिकाऱ्यांनी अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघाच्या जागेवर बीजेपीचाच उमेदवार हवा अशी इच्छा व्यक्त केली आहे. यासाठी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच एक बैठक घेतली आणि या बैठकीत याबाबतचा ठरावचं मंजूर करून घेतला आहे.

25 सप्टेंबरला भारतीय जनता पक्षाने (महाराष्ट्र राज्य) मुंबईत एक महत्त्वाची बैठक आयोजित केली आहे. दरम्यान याच बैठकीत नगर शहरातील पदाधिकाऱ्यांचा हा ठराव मांडला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र नगर शहरातील भाजप पदाधिकाऱ्यांच्या या भूमिकेनंतर संग्राम जगताप अडचणीत आले आहेत. संग्राम भैय्या आणि त्यांचे कार्यकर्ते आता अलर्ट मोडवर आले आहेत.

खरे तर नगर शहर ही जागा अजितदादा यांच्या गटाकडे जाईल आणि येथून संग्राम भैया यांचे नाव जवळपास फायनल झालेले आहे. मात्र भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते वसंत लोढा यांनी पक्षाकडे पत्र पाठवून ही जागा आपल्याकडेच हवी अशी मागणी केली आहे. याच अनुषंगाने भाजपाच्या जुन्या आणि नव्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली आणि या बैठकीत ही जागा आपल्याकडेच राहावी याबाबतचा चक्क ठराव मंजूर करण्यात आला आहे.

एवढेच नाही तर भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी विधानसभा तर आपण मिळवुच पण महापालिकेवर देखील आपली सत्ता येईल असा विश्वास व्यक्त करत सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज असल्याचे देखील स्पष्ट केले आहे. भाजपा पदाधिकाऱ्यांच्या या भूमिकेमुळे जरी संग्राम जगताप यांना महायुतीकडून या जागेवर तिकीट मिळालं तरी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते त्यांच्यासाठी किती प्रमाणात काम करणार हा मोठा विश्लेषणाचा विषय राहणार आहे.

त्यामुळे यंदाच्या निवडणुकीच्या आधीच संग्राम भैयांची डोकेदुखी वाढली आहे. आता या संदर्भात जगताप नेमका काय निर्णय घेतात महायुती या जागेवरून कोणाला उमेदवारी देते या साऱ्या गोष्टी पाहण्यासारख्या ठरणार आहेत. परंतु या निमित्ताने निवडणुकीच्या आधीच महायुतीत वादाची ठिणगी पडलेली आहे हे दिसतय.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe