नगर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पुढील चार दिवस जोरदार पावसाची शक्यता! आपत्कालीन परिस्थितीत ‘या’ क्रमांकावर साधावा संपर्क

परतीच्या पावसामुळे देखील राज्यातील काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून त्यानुसार पुढील चार दिवस अहमदनगर जिल्ह्यात विजाच्या कडकडाटा सह जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे.

Ajay Patil
Published:
rain guess

यावर्षी महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली व जवळपास प्रत्येक ठिकाणी असलेली पिण्याची आणि शेतीच्यासाठी लागणारे पाण्याची समस्या जवळपास संपुष्टात आलेली आहे. महाराष्ट्रात देखील जर आपण बघितले तर सर्वच ठिकाणाचे जलसिंचन प्रकल्प हे पूर्ण क्षमतेने यावर्षी भरले व शेती तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न महाराष्ट्रात देखील जवळजवळ मिटला आहे.

आता परतीच्या पावसाचे वेध लागले असून लवकरच मान्सून हा परतीचा प्रवास सुरू करणार असल्याचे देखील हवामान विभागाच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेले आहे. परंतु या परतीच्या पावसामुळे देखील राज्यातील काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून त्यानुसार पुढील चार दिवस अहमदनगर जिल्ह्यात विजाच्या कडकडाटा सह जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे.

 नगर जिल्ह्यात पुढील चार दिवस विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता

नगर  जिल्ह्यात पुढील चार दिवस विजांच्या कडकडाटांसह जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून, यलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. पुणे, नाशिक व अहमदनगर जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्यास भीमा व घोड नदी, गोदावरी नदी तसेच प्रवरा व मुळा या नद्यांवरील धरणातून सोडलेल्या विसर्गामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होऊ शकते.

त्यामुळे जिल्ह्यातील नदीकाठावरील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.मेघगर्जनेच्या वेळी, विजा चमकत असताना किंवा वादळीवारे वाहत असताना झाडाखाली किंवा झाडांजवळ उभे राहू नये. विजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. धोकादायक ठिकाणी सेल्फी
काढू नये.

गडगडाटीच्या वादळादरम्यान व विजा चमकताना कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नये. विजेच्या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा. ट्रॅक्टर्स, शेतीची अवजारे, मोटारसायकल, सायकल यांच्यापासून दूर रहावे.मोकळे मैदान, झाडाखाली, टॉवर्स, ध्वजांचे खांब, विद्युत, दिव्यांचे खांब, धातूचे कुंपण, विद्युतवाहिनी अथवा ट्रान्सफार्मरजवळ थांबू नये.

सर्व प्रकारच्या अधांतरी लटकणाऱ्या लोंबणाऱ्या केबल्सपासून दूर रहावे. जाहिरात फलक (होर्डिंग्ज) कोसळून होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी दक्षतेची बाब म्हणून जाहिरात फलकांच्या (होर्डिंग्ज) आजूबाजूला थांबू नये व योग्य ती दक्षता घ्यावी.स्थानिक प्रशासनाद्वारे दिलेल्या सूचनांचे पालन करावे. सखल भागात राहणाऱ्या नागरिकांना तातडीने सुरक्षितस्थळी स्थलांतर करावे.

नदी, ओढे व नाल्याकाठच्या नागरिकांनी दक्ष रहावे. पाणीपातळीत वाढ होत असल्यास नागरिकांनी नदीपात्रातून तसेच ओढे व नाले यापासून दूर रहावे व सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे. नदी अथवा ओढे नाल्यांवरील पुलावरुन पाणी वाहत असल्यास पूल ओलांडू नये. पूर पाहण्यासाठी गर्दी करू नये.वादळी वारे, वीज, पाऊस आणि सर्व गारपीट यापासून स्वतः सह जनावरांचे या संरक्षण होईल याबाबत योग्य ती दक्षता घ्यावी.

आपत्कालीन परिस्थितीत  नजीकचे तहसील कार्यालय, पोलिस स्टेशन किंवा जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथील दूरध्वनी क्र. १०७७ (टोल फ्री), ०२४१- २३२३८४४ अथवा २३५६९४० न्या या क्रमांकावर संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe