हवामान खात म्हणतं, आजपासून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होणार ! पंजाबराव डख यांचा अंदाज काय सांगतो ? वाचा सविस्तर

पंजाबरावांनी आपल्या या नवीन हवामान अंदाजात महाराष्ट्रात गांधी जयंती पर्यंत जोरदार पाऊस बरसणार असे सांगितले आहे. पंजाबरावांनी वर्तवलेल्या आपल्या नवीन हवामान अंदाजानुसार महाराष्ट्रात गांधी जयंती पर्यंत म्हणजेच 2 ऑक्टोबर पर्यंत जोरदार पावसाची शक्यता आहे. या काळात महाराष्ट्रातील प्रत्येक गावात पाऊस पडणार असा अंदाज त्यांनी दिला आहे.

Updated on -

Panjabrao Dakh News : भारतीय हवामान खात्याने आजपासून अर्थातच 23 सप्टेंबर 2024 पासून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होणार अशी घोषणा केली आहे. खरे तर गेल्या अनेक दिवसांपासून परतीच्या पावसाची वाट पाहिली जात होती. अखेरकार हवामान खात्याने आजपासून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होणार अशी घोषणा केली आहे. एवढेचं नाही नाही तर महाराष्ट्रात परतीचा पाऊस चांगलाचं धुमाकूळ घालणार अशी शक्यता देखील हवामान खात्याने वर्तवली आहे.

हवामान खात्याने राज्यात जवळपास 10 ऑक्टोबर पर्यंत जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. महाराष्ट्रातील दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये तर 10 ऑक्टोबर नंतर सुद्धा पाऊस बरसणार असा अंदाज आहे. दुसरीकडे जेष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी देखील एक नवीन हवामान अंदाज जारी केला आहे.

पंजाबरावांनी आपल्या या नवीन हवामान अंदाजात महाराष्ट्रात गांधी जयंती पर्यंत जोरदार पाऊस बरसणार असे सांगितले आहे. पंजाबरावांनी वर्तवलेल्या आपल्या नवीन हवामान अंदाजानुसार महाराष्ट्रात गांधी जयंती पर्यंत म्हणजेच 2 ऑक्टोबर पर्यंत जोरदार पावसाची शक्यता आहे.

या काळात महाराष्ट्रातील प्रत्येक गावात पाऊस पडणार असा अंदाज त्यांनी दिला आहे. राज्यात जवळपास 45000 गावे असून या प्रत्येक गावांमध्ये या काळात किमान तीन दिवस पाऊस पडणार अशी शक्यता आहे.

पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण, खानदेश, मराठवाडा या भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता पंजाबरावांच्या माध्यमातून वर्तवण्यात आली आहे.

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या काळात राज्यातील काही भागात पूरस्थिती देखील तयार होणार असा अंदाज आहे. यामुळे पुन्हा एकदा सर्वसामान्य जनजीवन विस्कळीत होण्याची भीती आणि शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे पुन्हा एकदा मोठे नुकसान होईल अशी भीती व्यक्त केली जाऊ लागली आहे.

ऑगस्ट महिन्यात महाराष्ट्रात जसा पाऊस झाला होता तसाच पाऊस आता पुन्हा एकदा राज्यात होईल आणि यामुळे पूरस्थिती तयार होणार असा अंदाज आहे. या काळात विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी आपल्या स्वतःची आणि पशुधनाची विशेष काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

राज्यात आता जवळपास 2 ऑक्टोबर पर्यंत पावसाची शक्यता आहे मात्र 25 ते 27 सप्टेंबर दरम्यान राज्यातील उत्तर महाराष्ट्रात म्हणजेच नाशिक व आजूबाजूच्या भागात पावसाची तीव्रता सर्वाधिक राहणार असे भाकीत त्यांनी वर्तवले आहे.

या काळात पावसाची तीव्रता अधिक राहणार असल्याने राज्यातील अनेक प्रमुख धरणे 100% क्षमतेने भरतील आणि यामुळे रब्बी हंगामात शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. नक्कीच राज्यातील प्रमुख धरणे जर 100% क्षमतेने भरलीत तर रब्बी आणि उन्हाळी हंगामात शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळवता येणे शक्य होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News