मुंबईमधील वाहतूक कोंडीची समस्या ही खूप भयानक अशी समस्या असून मुंबईमध्ये जर तुम्हाला अर्धा ते एक किलोमीटरचा प्रवास करायचा असेल बऱ्याचदा आपल्याला एक एक दीड दीड तासाचा कालावधी याकरिता लागतो. कारण वाहतूक कोंडीमुळे खूप मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे या समस्येतून मुक्तता मिळावी याकरिता सरकारच्या माध्यमातून अनेक प्रकारचे प्रकल्प मुंबईमध्ये हाती घेण्यात आलेले आहे
तो यामध्ये मेट्रो प्रकल्पापासून तर अनेक नवीन उड्डाणपुले, विविध ठिकाणी पर्यायी मार्ग उभारण्यात येत असून मुंबईकरांना वाहतूक कोंडीतून सुटका मिळेल हा सरकारचा प्रयत्न आहे. अगदी याच पद्धतीने आता एमएमआरडीए मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने महत्त्वाचा असा प्रकल्प हाती घेतला असून या प्रकल्पाच्या माध्यमातून आता 90 किमी रस्त्यांचे जाळे मुंबईमध्ये उभारण्यात येणार असून यामध्ये उड्डाणपूल, महामार्ग तसेच अनेक भुयारी मार्गांचा समावेश करण्यात येणार आहे.

जर आपण नवी मुंबई तसेच पनवेल, ठाणे, कल्याण, डोंबिवली तसेच खोपोली, पनवेल आणि वसई विरार इत्यादी ठिकाणी राहणाऱ्या लोकांना दररोज दोन ते चार चार तासांचा प्रवास करावा लागतो व कधीकधी तर दिवसातील अर्धा वेळ हा प्रवासामध्येच वाया जातो.
या सगळ्या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्र विकास प्राधिकरणाने ही योजना आणली असून या प्रकल्पामध्ये मुंबई आणि उपनगरामध्ये मिळून सात आऊटर आणि इनर रिंग रोड बनवले जाणार आहेत.
त्यामुळे आता मुंबईकरांना 59 मिनिटाच्या आत मध्ये शहर व उपनगरातील कोणत्याही ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी पोहोचता येणे शक्य होणार आहे. या प्रकल्पांतर्गत मुंबईचा पूर्व आणि पश्चिम भाग अनेक रस्त्यांच्या माध्यमातून एकमेकांना जोडला जाणार आहे व हा प्रकल्प 2029 पर्यंत पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे.
कोणत्या ठिकाणी असतील हे रिंग रोड?
1- यामधील नरिमन पॉईंट येथून हा पहिला रिंग रोड सुरू होणार असून नरिमन पॉईंट- -कोस्टल रोड -वरळी शिवडी कनेक्टर- पूर्व द्रुतगती मार्ग -ऑरेंज गेट टनल -नरिमन पॉईंट
2- दुसरा रिंग रोड नरिमन पॉईंट पासून वांद्रे – वरळी सागरी सेतू – सांताक्रुज चेंबूर लींक रोड – पश्चिम द्रुतगती महामार्ग – पूर्व द्रुतगती महामार्ग – ऑरेंज गेट टनल ते नरिमन पॉईंट
3- तिसरा रिंग रोड हा नरिमन पॉईंट पासून वांद्रे वरळी सागरी सेतू- पश्चिम द्रुतगती महामार्ग – जेव्हीएलआर -कांजूरमार्ग जंक्शन- पूर्व दृतगती मार्ग एक्सपटेन्शन- पूर्व द्रुतगती मार्ग- ऑरेंज गेट टणल ते नरिमन पॉईंट
4- चौथा रिंग रोड नरिमन पॉईंट पासून वांद्रे वरळी सी लिंक – वर्सोवा वांद्रे सी लिंक – वर्सोवा दहिसर लिंक रोड- गोरेगाव मुलुंड लिंक रोड- पूर्व द्रुतगती मार्ग एक्सटेन्शन- पूर्व द्रुतगती मार्ग- ऑरेंज गेट टनेल ते नरिमन पॉईंट
5- पाचवा रिंग रोड हा नरिमन पॉईंट पासून वांद्रे सागरी सेतू – वर्सोवा वांद्रे सागरी सेतू – वर्सोवा दहिसर लिंक रोड- भाईंदर फाउंटेन कनेक्टर- गायमुख घोडबंदर टनल- ठाणे कोस्टल रोड- आनंदनगर – साकेत उड्डाणपूल – पूर्व द्रुतगती मार्ग एक्सटेंशन- ऑरेंज गेट टनल ते नरिमन पॉईंट
6- सहावा रिंग रोड नरिमन पॉईंट पासून वर्सोवा वांद्रे सागरी सेतू- मीरा-भाईंदर लिंक रोड- अलिबाग विरार कॉरिडॉर – ठाणे कोस्टल रोड – आनंदनगर साकेत फ्लायओव्हर – पूर्व द्रुतगती मार्ग- पूर्व द्रुतगती मार्ग एक्सटेंशन- ऑरेंज गेट टनल ते नरिमन पॉईंट
7- सातवा रिंग रोड नरिमन पॉईंटपासून वर्सोवा दहिसर भाईंदर लिंक रोड- उत्तन लिंक रोड- वडोदरा मुंबई एक्सप्रेस हायवे – अलिबाग विरार मल्टी मॉडेल कॉरिडॉर – अटल सेतू जेएनपीटी – ऑरेंज गेट टनल ते नरिमन पॉईंट