नवरात्रीमध्ये 2 लाख रुपये डाऊन पेमेंट भरून घरी आणा मारुती सुझुकी ब्रिझा CNG! वाचा किती भरावा लागेल ईएमआय?

आता सणासुदीचे दिवस तोंडावर आल्यामुळे नवरात्री आणि दसरा व दिवाळीमध्ये मोठ्या प्रमाणावर कार खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल असतो. त्यामुळे तुम्हाला देखील या नवरात्रीमध्ये सीएनजी कार घ्यायची असेल तर तुमच्यासाठी मारुती सुझुकीची ब्रेझा हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.

Published on -

पेट्रोल आणि डिझेल वाहनांच्या तुलनेमध्ये आता हळूहळू का होईना इलेक्ट्रिक वाहनांचा आणि त्या पाठोपाठ सीएनजी वाहन खरेदीचा कल मोठ्या प्रमाणावर आपल्याला दिसून येत आहे. त्यामुळे अनेक वाहन उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून सीएनजी कार्स उत्पादित केल्या जात असून भारतीय कार बाजारपेठेमध्ये सध्या सीएनजी एसयूव्ही कारची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढलेली आपल्याला दिसून येत आहे.

तसेच आता सणासुदीचे दिवस तोंडावर आल्यामुळे नवरात्री आणि दसरा व दिवाळीमध्ये मोठ्या प्रमाणावर कार खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल असतो. त्यामुळे तुम्हाला देखील या नवरात्रीमध्ये सीएनजी कार घ्यायची असेल तर तुमच्यासाठी मारुती सुझुकीची ब्रेझा हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.

ही कार ऑगस्टमध्ये सर्वाधिक विक्री होणारे कार होती व या कारचा उत्तम लूक तसेच जबरदस्त मायलेज व इतर महत्त्वाच्या वैशिष्ट्यांमुळे मारुती सुझुकी ब्रेझ्झा सीएनजी इतर कारपेक्षा उत्तम ठरत आहे.

जर आपण ब्रेझा सीएनजीचे LXI, VXI, ZXI आणि ZXI DT हे चार व्हेरियंट आहेत. त्यामुळे या लेखात आपण या चारही वेरिएंटाची ऑन रोड किंमत तसेच लोन, करावे लागणारे डाऊन पेमेंट व भरावा लागणारा मासिक हप्ता इत्यादी बद्दलची माहिती बघणार आहोत.

 मारुती सुझुकी ब्रेझाच्या चारही व्हेरियंटची माहिती

1- मारुती सुझुकी ब्रेझा LXI सीएनजी मारुती सुझुकीच्या या बेस व्हेरिएंटची एक्स शोरूम किंमत नऊ लाख 29 हजार रुपये आहे व ऑन रोड किंमत दहा लाख 37 रुपये आहे. तुम्ही जर ही कार दोन लाख रुपयांच्या डाऊन पेमेंटसह खरेदी केली तर तुम्हाला 8.37 लाख रुपयांचे कर्ज मिळू शकते.

या कर्जाचा परतफेडीचा कालावधी पाच वर्षासाठी असेल व त्यावर तुम्हाला नऊ टक्क्यांचा व्याजदर द्यावा लागेल. पुढील पाच वर्षाकरिता प्रत्येक महिन्याला 17375 रुपये मासिक ईएमआय भरावा लागेल.

2- मारुती सुझुकी ब्रेझ्झा VXI सीएनजी या व्हेरियंटची एक्स शोरूम किंमत दहा लाख 64 हजार रुपये असून ऑन रोड किंमत बारा लाख 27 हजार रुपये आहे. तुम्ही जर ही कार दोन लाख रुपयांचे डाऊन पेमेंट करून घेतले तर तुम्हाला बारा लाख  27 हजार रुपयांचे कर्ज यासाठी घ्यावे लागेल.

हे कर्ज तुम्ही पाच वर्षाच्या कालावधी करिता 9% व्याजदराने घेतले तर प्रत्येक महिन्याला तुम्हाला 20904 इतका ईएमआय भरावा लागेल.

3- मारुती सुझुकी ब्रेझा ZXI सीएनजी या मॉडेलची एक्स शोरूम किंमत बारा लाख दहा हजार रुपये असून ऑन रोड किंमत 13 लाख 92 हजार रुपये आहे. जर तुम्ही ही कार दोन लाख रुपये डाऊन पेमेंट करून खरेदी केली तर पाच वर्षाकरिता नऊ टक्के व्याजदराने तुम्हाला 11 लाख 92 हजार रुपयांचे कर्ज या माध्यमातून मिळू शकते. यामध्ये तुम्हाला पुढील साठ महिन्यांपर्यंत 24 हजार 744 रुपये इतके कर्जाचे रक्कम म्हणजेच ईएमआय भरावा लागेल.

4- मारुती सुझुकी ब्रेझा ZXI DT सीएनजी हे मारुती सुझुकी ब्रेझाचे टॉप सीएनजी व्हेरियंट असून याची एक्स शोरूम किंमत 12 लाख 26 हजार रुपये आहे व ऑन रोड किंमत 14 लाख दहा हजार रुपये आहे. जर तुम्ही ही कार दोन लाख रुपये डाऊन पेमेंट करून खरेदी केली तर तुम्हाला 12 लाख 10 हजार रुपयांचे कर्ज मिळेल. या कर्जाचा कालावधी पाच वर्षापर्यंत असेल व व्याजदर 9% असेल. यानुसार तुम्हाला या कारचा मासिक ईएमआय 25118 रुपये भरावा लागेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!