“गरीब की थाली मे पुलाव आ रहा है, लगता है राज्य मे चुनाव आ रहा है” ! जयंत पाटील यांची जोरदार टिका; अकोलेच्या भाषणात जयंत पाटील काय म्हणालेत ?

नगर जिल्ह्यातील अकोले येथे आज शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शिव स्वराज्य यात्रा पोहोचली असून या यात्रेवेळी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. यावेळी पाटील यांनी एक लांबलचक भाषण दिले असून त्यांनी आपल्या भाषणात सत्ताधाऱ्यांचा चांगलाच खरपूस समाचार घेतला आहे. यामुळे पाटील यांच्या या भाषणाची सध्या नगरमध्ये मोठी चर्चा सुरू आहे.

Tejas B Shelar
Published:
Ahmednagar Politics News

Ahmednagar Politics News : आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस गट कमालीचा सक्रिय झाला आहे. पक्षाच्या माध्यमातून गेल्या काही दिवसांपासून विधानसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी केली जात आहे. शरद पवार गटाने आगामी निवडणुका डोळ्यापुढे ठेवून शिवस्वराज्य यात्रा सुरू केली आहे. काल ही यात्रा नाशिक जिल्ह्यात होती आणि आज ही यात्रा नगर जिल्ह्यात धडकली आहे. म्हणून आता या यात्रेकडे संपूर्ण नगरकरांचे लक्ष लागून आहे.

नगर जिल्ह्यातील अकोले येथे आज शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शिव स्वराज्य यात्रा पोहोचली असून या यात्रेवेळी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. यावेळी पाटील यांनी एक लांबलचक भाषण दिले असून त्यांनी आपल्या भाषणात सत्ताधाऱ्यांचा चांगलाच खरपूस समाचार घेतला आहे. यामुळे पाटील यांच्या या भाषणाची सध्या नगरमध्ये मोठी चर्चा सुरू आहे.

जयंत पाटील यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

अकोले येथील शिवस्वराज्य यात्रेवेळी जयंत पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत आपण महाराष्ट्रातून 31 खासदार दिल्लीला पाठवले आहेत. यामुळे भाजपला कळून चुकल आहे की आता त्यांचं राज्य सरकार येणार नाही. यामुळे सरकारी तिजोरी खुली करण्यात आली आहे आणि त्यांना पाहिजेत तशा घोषणा केल्या जात आहेत.

यासाठी सरकार आता सव्वा लाख कोटी रुपयांचे कर्ज आरबीआय कडे मागत असून त्यांचे सरकार पायउतार होईपर्यंत राज्यावर नऊ लाख कोटींचे कर्ज होणार असा आरोप करत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्ला चढवला आहे. नुकतेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्राचा दौरा केला.

या अमित शहा यांच्या दौऱ्यावर देखील जयंत पाटील यांनी निशाणा साधला आहे. यासंदर्भात बोलताना पाटील यांनी अमित शहा म्हणतात की, शरद पवार आणि उद्धव ठाकरे दोघांना रोखा. या दोघांमुळे आपल सरकार जातंय हे आता त्यांनी मान्य केलं आहे. भाजपचा एक नेता मला म्हणाला की लोक म्हणतात तूतारी हाती घ्या.

यावरून सध्या राज्यात सगळीकडे तुतारीची हवा आहे. म्हणून तुतारी हाती घेण्यासाठी लोकांची मोठी स्पर्धा सुरू आहे, असे विधान केले आहे. पुढे त्यांनी शिंदे सरकारने सुरू केलेल्या विविध योजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत. ते म्हणालेत की हे सरकार थकबाकीत गेले आहे.

सरकारने अनेक योजनांचे जीआर काढले आहेत मात्र याचे काम होणार की नाही याबाबत शंका आहे. राज्याच्या योजना सुरू करण्यात आल्या आहेत त्या योजनांसाठी आदिवासींचे पैसे वापरले जात असल्याचा आरोपही पाटील यांनी केला आहे.

राज्यातील सध्याचे सरकार हे पैशांची उधळपट्टी करत असून राज्यात ज्या योजनांची घोषणा करण्यात आली आहे त्या साऱ्या योजना ठेकेदारांसाठी सुरू करण्यात आल्या आहेत असेही त्यांनी म्हटले आहे. जयंत पाटील यांनी महाविकास आघाडीचे जागावाटप कधी होणार याचेही संकेत दिले आहेत.

एक तारखेला महाविकास आघाडीच्या जागा वाटपावर अंतिम शिक्कामोर्तब होणार असल्याचे मोठे विधान जयंत पाटलांनी केले आहे. पुढे बोलताना त्यांनी आम्हाला आघाडी टिकवायची आहे म्हणून आज उमेदवाराची घोषणा करणार नाही असे म्हटले. दरम्यान त्यांचे भाषण सुरू असतानाच तेथे उपस्थित कार्यकर्त्यांच्या माध्यमातून अमित भांगरे यांच्या नावाची घोषणा केली जात होती.

दरम्यान पाटील यांनी सदर कार्यकर्त्याला संबोधून घोषणा करत असणाऱ्या कार्यकर्त्याला अकोलेचा उमेदवार कोण आहे हे अजूनही कळत नसेल तर त्याच्या बुद्धीची कीव येते, असं म्हणतं घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्याला टोला लगावला आणि अप्रत्यक्षरीत्या अकोले विधानसभा मतदारसंघात अमित भांगरे हेच उमेदवार असतील हे नाव न घेता जाहीर करून टाकले. पुढे त्यांनी गरीब की थाली मे पुलाव आ रहा है. लगता है राज्य मे चुनाव आ रहा है, असं म्हणतं राज्यातील महायुती सरकारवर जोरदार निशाणा साधला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe