Devendra Fadnavis News : महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री अन विद्यमान उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राने नेत्रदीपक प्रगती केली. ते मुख्यमंत्री असताना राज्याच्या विकासाची गती ही खूपच उल्लेखनीय होती. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात राज्याचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला.
पुणे, मुंबई, नागपूरसारख्या शहरांमध्ये मेट्रो, कोस्टल रोड, राज्याच्या विकासाला बळ देणारा समृद्धी महामार्ग असे अनेक पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांना त्यांनी गती दिली. या प्रकल्पांना फक्त गतीच दिली नाही तर हे प्रकल्प त्यांनी मार्गी सुद्धा लावलेत. यातील राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर यांना जोडणारा समृद्धी महामार्ग हा त्यांचा एक ड्रीम प्रोजेक्ट होता.
हा प्रकल्प आता जवळपास पूर्ण झाला असून या महामार्गाचा शेवटचा टप्पा येत्या काही महिन्यात सर्वसामान्य नागरिकांसाठी खुला होणार आहे. हा प्रकल्प रेकॉर्ड टाईम मध्ये पूर्ण करण्यात आला असून यामुळे राज्यातील चार महत्त्वाचे विभाग परस्परांना रस्ते मार्गाने जोडले गेले आहे. फक्त पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांनाचं त्यांनी महत्त्व दिले असे नाही तर शेतकरी वर्गासमवेत राज्यातील सर्वच घटकांकडे त्यांचे विशेष लक्ष होते.
मागेल त्याला शेततळे, जलयुक्त शिवार सारख्या शेतकरी हिताच्या योजना त्यांच्या काळात अधिक व्यापक झाल्यात आणि याचा शेतकऱ्यांना फायदा झाला. कृषी, पर्यटन, शिक्षण, उद्योग, विदेशी गुंतवणूक, आरोग्य अशा विविध सेक्टरमध्ये फडणवीस यांनी चांगली मोलाची कामगिरी केली. राज्यातील मराठा समाजासमवेतच विविध समाजाच्या उन्नतीसाठी त्यांनी अनेक कौतुकास्पद निर्णय घेतलेत. राजकीय विश्लेषकांनी देखील त्यांच्या या निर्णयांचे कौतुक केले.
फडणवीस यांचा स्वतःचा साखर कारखाना नाही, स्वतःचा उद्योगही नाही, स्वतःची सूतगिरणी नाही आणि स्वतःची शैक्षणिक संस्था सुद्धा नाही. स्वतःची कोणतीचं संस्था नसल्याने देवेंद्र फडणवीस यांचे कोणाशीच वैयक्तिक हितसंबंध येत नाहीत. त्यामुळे फडणवीस यांच्या कार्यकाळात राज्याच्या हिताचे निर्णय सर्वाधिक झालेत अन कदाचित हेच कारण असावे की फडणवीस हे नेहमीच विरोधकांच्या निशाण्यावर राहिले आहेत.
देवेंद्र फडणवीस यांचे मराठा समाजासाठी मोठे योगदान
फडणवीस यांनी आपल्या कार्यकाळात मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिले होते. महत्त्वाचे म्हणजे हे आरक्षण त्यांनी जोवर त्यांच्या हातात सत्ता होती तोवर कोर्टातही टिकून दाखवले. मात्र देवेंद्रजींची सत्ता गेली आणि महाविकास आघाडीच्या काळात मराठा समाजाचे आरक्षण रद्द झाले. परंतु मराठा समाजातील आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या कुटुंबातील तरुणांसाठी फडणवीस यांनी नोकरीत आणि शिक्षणात दहा टक्के आरक्षण मिळवून दिले.
यातून हजारो मराठा समाजातील तरुणांना नोकरी सुद्धा मिळाली आहे. राज्यातील सर्व तरुणांना सरकारी नोकरी मिळू शकत नाही यामुळे त्यांनी मराठा समाजातील तरुणांना स्वतःचा उद्योग धंदा सुरू करता यावा यासाठी त्यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ या महामंडळाच्या माध्यमातून वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना आणली. यातून मराठा समाजातील तरुणांना 77 कोटी 38 लाख रुपयांचे कर्ज दिले गेले आहे.
एवढेच नाही तर 638 कोटी रुपयांचा व्याज परतावा देखील मिळवून दिला. यामुळे उद्योगात मराठा समाजाचा तरुण आता खूपच पुढे गेला आहे. त्यांनी मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी राजर्षी शाहू महाराज शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजनेतून लाभ मिळवून दिला. सनदी सेवांमध्ये मराठा समाजातील तरुणांचे प्रमाण वाढावे यासाठी सारथी राष्ट्रीय अधिछात्रवृत्ती योजनेला फडणवीस यांनी गती दिली. यामुळे राज्यातील मराठा समाजातील शेकडो तरुण तरुणी सनदी सेवेत सामील झालेत. यूपीएससी परीक्षा देत कोणी आयपीएस, कोणी IAS बनले तर कोणी राज्य लोकसेवा आयोगात यशस्वी होत सनदी अधिकारी बनलेत. महाराणी ताराबाई स्पर्धा परीक्षेद्वारे राज्यातील हजारो तरुणांना कौशल्य प्रशिक्षणासाठी भरीव निधी मिळाला. सारथी तर्फे देखील हजारो तरुणांना किमान कौशल्याचे प्रशिक्षण मिळाले.
मराठा समाजाबरोबरच इतर समाजाचेही हित जोपासले
फडणवीस यांनी फक्त मराठा समाजालाच केंद्रस्थानी ठेवले असे नाही तर इतर अन्य समाजासाठी देखील त्यांनी मोठे कौतुकास्पद काम केले. इतर मागास प्रवर्गातील म्हणजेच ओबीसी प्रवर्गातील मॅट्रिकोत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी मुलांसाठी आणि मुलींसाठी प्रत्येकी एक शासकीय वस्तीगृह सुरू करण्यास मान्यता देण्यात आली. या विद्यार्थ्यांच्या निवासासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी फडणवीस यांनी उपलब्ध करून दिला.
इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी परदेशातील उच्च शिक्षणाच्या शिष्यवृत्तींची संख्या दहावरून 75 करण्याचा निर्णय सुद्धा फडणवीस यांच्या काळातच झाला आहे. राज्यातील ओबीसी, विमुक्त जमाती, भटक्या जमाती व विशेष मागासवर्गीय प्रवर्गातील तीन लाख मॅट्रिकपूर्व आणि 90 लाख मॅट्रिक उत्तर विद्यार्थ्यांना देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नांमुळेच शिष्यवृत्ती देण्यात येत आहे, हे विशेष.
त्यांनी धनगर समाजासाठी देखील मोठे काम केले. आरक्षणासमवेतच धनगर समाजाच्या विविध मागण्या आहेत. धनगर समाजाच्या बऱ्याचशा मागण्या न्यायालयीन प्रक्रियेत प्रलंबित आहेत. मात्र असे असले तरी त्यांनी धनगर समाजाच्या उत्थानासाठी एक हजार कोटी रुपयांची तरतूद त्यांच्या कार्यकाळात केली होती.
धनगर समाजासाठी महाराष्ट्र शेळी मेंढी सहकार विकास महामंडळाची स्थापना त्यांच्याच काळात झाली. त्यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेच्या माध्यमातून विमुक्त जाती व भटक्या जमातीसाठी तसेच धनगर समाजासाठी हजारो घरे बांधण्यासाठी पुढाकार घेतलाय. या प्रवर्गातील बेघर लोकांसाठी त्यांनी 50 हजार गरिबांसाठी पुढाकार घेतला होता आणि यासाठी 600 कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. ओबीसी प्रवर्गातील नागरिकांना हक्काचे घर मिळावे यासाठी मोदी आवास योजना देखील सुरू केली जाणार आहे.
विविध समाजांसाठी आर्थिक विकास महामंडळाची स्थापना
फडणवीस यांचे कार्य कुण्या एका समाजासाठी होत नाही. ते सर्वांचे हित जोपासण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतात. याच प्रयत्नातून त्यांनी महाराष्ट्रातील विविध समाजांसाठी आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केली आहे. राज्यातील लिंगायत समाजासाठी त्यांनी जगत ज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ, गुरव समाजासाठी संत काशीबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ, रामोशी समाजासाठी राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ, वडार समाजासाठी पैलवान मारुती चव्हाण वडार आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केली आहे.
फडणवीस यांच्या पुढाकाराने ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ तसेच राजपूत समाजासाठी वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
अकेला देवेंद्र सब पे भारी !
2019 च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांना जनतेने सत्तेवर एकत्रित रित्या विराजमान व्हावे म्हणून कौल दिला होता. परंतु उद्धव ठाकरे यांनी ऐनवेळी भाजपासोबतची गेल्या अनेक वर्षांची नाळ तोडली. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने भाजपा आणि शिवसेनेची गेल्या अनेक वर्षांची युती मुख्यमंत्रीपदाच्या लालसेपोटी उद्धव ठाकरे यांनी तोडली. पुढे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावर आलेत. त्यावेळी शरद पवार यांच्या कन्या आणि संसदरत्न सुप्रिया सुळे या अकेला देवेंद्र क्या करेगा अशी चेष्टा करत होत्या. मात्र माजी मुख्यमंत्री आणि वर्तमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकट्याने स्वतःच्या हातात सत्ता असताना, विरोधी बाकावर बसलेले असताना आणि आता उपमुख्यमंत्री म्हणून सत्तेत असताना जी कामे करत आहेत ती कदाचित पुढील 50 वर्ष शाश्वत राहतील आणि त्याचे चांगले फायदे राज्याला मिळतील अशा स्वरूपाची आहेत.
यामुळे राज्याच्या जनतेचा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर इतर कोणत्याही नेत्यापेक्षा अधिक विश्वास आहे. कदाचित हेच कारण आहे की देवेंद्र फडणवीस यांच्यावर विरोधक अधिक आक्रमक होताना दिसतात. नेहमीच फडणवीस यांच्या विरोधात गरळ ओकली जाते. महाविकास आघाडी मधील काही नेत्यांच्या माध्यमातून त्यांच्या जातीचा उल्लेख करत त्यांच्यावर खालच्या पातळीची टीका केली जाते. पण, या अशा टीकेचा फडणवीस यांच्या कार्यावर कोणताच विपरीत परिणाम होत नाही. ते आपल्या कार्यातून सबंध महाराष्ट्राचे हित जोपासण्याचा प्रामाणिक प्रयत्न कालही करत होते आणि आजही करत आहेत.
केवळ महाराष्ट्राचे हित हेच ध्येय त्यांचे आहे. यामुळेच त्यांनी पाच वर्ष सलग मुख्यमंत्री पदावर बसून राज्याचा कारभार चालवल्यानंतर जेव्हा त्यांना उपमुख्यमंत्री पदावर बसून राज्याला मार्गदर्शन द्यावे असा आदेश पक्षाने दिला तेव्हा त्यांनी एकही शब्द न काढता पक्षाचा आदेश मानत राज्याच्या हितासाठी उपमुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारला. आज ते उपमुख्यमंत्री पदावर असतानाही राज्याच्या विकासात मोलाची भूमिका निभावत आहेत. जरूर राज्याचे नेतृत्व शिंदे यांच्या हातात आहे मात्र या नेतृत्वाला जी धार मिळाली आहे ती धार फक्त आणि फक्त फडणवीस यांच्यामुळेचं.