‘कावीळ झालेल्या लोकांना सर्व पिवळ दिसतं…..’ आमदार आशुतोष काळे यांची खरमरीत टीका, काय म्हणालेत काळे ?

Tejas B Shelar
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : कोपरगाव विधानसभा मतदारसंघासहित नगर जिल्ह्यातील सर्वच्या सर्व 12 मतदारसंघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. विधानसभा निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या इच्छुकांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे.

इच्छुक उमेदवारांच्या माध्यमातून एकमेकांवर आरोपांच्या फैरी सुरू आहेत. कोपरगाव विधानसभा मतदारसंघात सुद्धा असेच चित्र आहे. निवडणुक जशी जवळ येऊ लागली आहे तसा कोपरगाव विधानसभा मतदारसंघात काळे आणि कोल्हे यांच्यातील संघर्ष आणखी टोकाचा बनत आहे.

खरे तर काळे आणि कोल्हे हा संघर्ष फार जुना आहे. या विधानसभा मतदारसंघातून गेल्या निवडणुकीत म्हणजेच 2019 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे आशुतोष काळे यांनी भारतीय जनता पक्षाच्या स्नेहलता कोल्हे यांचा पराभव केला होता. या विधानसभा मतदारसंघात फार पूर्वीपासूनच काळे आणि कोल्हे असा संघर्ष पाहायला मिळतो.

हा राजकीय संघर्ष गेल्या निवडणुकीत अधिक टोकाचा झाला. मात्र राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यानंतर आशुतोष काळे हे अजित दादा गटात आलेत. सध्या काळे हे महायुतीचा भाग आहेत. यामुळे मात्र यंदाची विधानसभा निवडणूकीची इच्छा उराशी बाळगून बसलेल्या स्नेहलता कोल्हे यांचे सुपुत्र विवेक कोल्हे यांची मोठी कोंडी झाली आहे.

यामुळे त्यांनी इतर पर्यायांची चाचणी सुरू केली आहे. विवेक कोल्हे हे शरद पवार यांच्या गटात जातील आणि तुतारी चिन्हावर निवडणूक लढवतील अशा चर्चा आहेत. यामुळे हे दोन्ही नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. युवा नेते विवेक कोल्हे यांनी आमदार आशुतोष काळे यांना मतदारसंघातील वाढत्या गुन्हेगारीवरून टार्गेट करण्यास सुरुवात केली आहे.

गोळीबार प्रकरणात कोल्हे यांनी आमदार आणि आरोपी यांचा एकत्रित फोटो झळकवला होता. त्यामुळे सर्वत्र खळबळ माजली होती. यानंतर आमदार काळे यांच्या समर्थकांनी कोल्हे आणि आरोपीचे एकत्रित फोटो दाखवलेत. तसेच मतदारसंघातील वाढत्या गुन्हेगारीचा निषेध नोंदवण्यासाठी विवेक कोल्हे यांनी उपोषण सुरू केले होते.

दरम्यान, आता आमदार आशुतोष काळे यांनी विवेक कोल्हे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. आमदार काळे यांनी, विधानसभा निवडणुका जवळ येऊ लागल्या आहेत. तशी इच्छुकांनी मतदार संघातील सर्वसामान्य जनतेची दिशाभूल करण्याचा धंदा सुरू केलाय. मात्र, माझ्या मतदारसंघातील नागरिक खूपच सुज्ञान आणि समजदार आहेत.

माजी आमदार अशोक काळे यांनी तहसील कार्यालय बांधले. या कार्यालयात त्यांच्या काळात, त्यांना फर्निचर करता आले नाही. मी आमदार नसताना, नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी पुढाकार घेतला. आता आमदार असताना फर्निचरसाठी जवळपास 1.93 कोटी रुपयांचा निधी दिला.

त्यामुळे त्यांनी विकासावर बोलू नये, असं म्हणत विवेक कोल्हे यांना टोला लगावला आहे. आमदार काळे यांनी यावेळी कावीळ झालेल्यांना सर्व पिवळं दिसतं. तशीच परिस्थिती विरोधकांची झाली आहे. यातच निवडणुका जशा जवळ येऊ लागल्या आहेत, तशी ही कावीळ वाढली आहे, असं म्हणत कोल्हे यांचा समाचार घेतला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe