Ahmednagar News: अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातुन धक्कादायक घटना समोर आली असून अकोले तालुक्यातील बेलापूर(बदगी) या ठिकाणी दत्तात्रय प्रकाश फापाळे याने सख्खी लहान भावजाई उज्वला अशोक फापाळे आणि चुलत भावजई वैशाली संदीप फापाळे यांचा सोमवारी कोयत्याने निर्घृण हत्या केली.
या मागील कारण बघितले तर दशक्रिया विधीचे पैसे दिले नाहीत म्हणून वाद उद्भवला व त्या वादातूनच हे हत्याकांड घडून आल्याची माहिती समोर आली आहे.

सख्या दिराने केली दोन भावजयांची हत्या
दशक्रियाविधीचे पैसे दिले नाहीत म्हणून झालेल्या वादातू अकोले तालुक्यातील बेलापूर (बदगी) येथे दत्तात्रय प्रकाश फापाळे (वय ५०) याने सख्खी लहान भावजयी उज्ज्वला अशोक फापाळे (वय ३८), चुलत भावजयी वैशाली संदीप फापाळे (वय ४०) यांचा सोमवारी दुपारी अडीच वाजता धारदार कोयत्याने हत्या केली.
विशेष म्हणजे ही घटना गावातील मुख्य बाजारपेठेच्या चौकापासून पन्नास फुटांवरील अंतरावर झाला. घटनास्थळी रक्ताचे मृतदेह अक्षरक्षः रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. खुनाची घटना झाली त्यावेळी या महिला किंचाळत होत्या.
समोरच एका डॉक्टरांना हा आवाज गेला. ते बाहेर आले तेव्हा दत्तात्रय फापाळे याने रक्ताळलेल्या कोयत्याने त्यांना धमकावले. त्यानंतर तो भर गावातून जंगलाच्या वाटेने निघून गेला.
घटना कळताच अकोल्याचे पोलिस निरीक्षक मोहन बोरसे तातडीने तेथे पोहोचले. उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर, पोलिस कर्मचारी सुहास गोरे, किशोर तळपे, विजय खाडे घटनास्थळी रात्री उशिरापर्यंत होते. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अकोले ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले.
आरोपी अविवाहित, पन्नास हजारांसाठी केला खून
आरोपी दत्तात्रय फापाळे ऊर्फ बापू हा अविवाहित आहे. लहान भाऊ अशोक याचे लग्न झाले होते. दोन वर्षांपूर्वी त्याचे निधन झाले. त्याची पत्नी मयत उज्ज्वला आणि दोन मुले आळंदी येथे मजुरी करून गुजराण करत होते.
मयत उज्ज्वलाने दोन्ही मुले माहेरी ठेवली म्हणून ती वाचली. कुटुंबाकडे फक्त पन्नास गुंठे शेती आहे. त्यात दत्तात्रय आणि उज्ज्वला वर्षाआड शेती पीक घ्यायचे.
शेतातील सोयाबीन काढण्यासाठी उज्ज्वला आली होती. भावाच्या दशक्रियेला दत्तात्रय याने भावजयीला पन्नास हजार रुपये दिले होते. या पैशावरून वाद व्हायचे. याच रागातून दत्तात्रय याने आधीच घरात कोयता आणला होता.