Ahilyanagar Politics : काल अर्थातच 15 ऑक्टोबरला भारतीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा केली आहे. विधानसभा निवडणुकांच्या तारकांची घोषणा झाल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना मोठा वेग आला आहे. अशातच राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी अपडेट समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार वंचित बहुजन आघाडीने आपल्या उमेदवारांची तिसरी यादी आज जाहीर केली आहे. खरे तर महायुती आणि महाविकास आघाडी कडून अजून उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र वंचित बहुजन आघाडीने उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आघाडी घेतली आहे.
आतापर्यंत वंचित बहुजन आघाडीने उमेदवारांच्या दोन याद्या प्रसिद्ध केल्या होत्या. दरम्यान आज वंचित बहुजन आघाडी कडून उमेदवारांची तिसरी यादी जाहीर करण्यात आली असून यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांचा देखील समावेश आहे.
वंचितच्या या तिसऱ्या यादीत एकूण 30 उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे. अहिल्या नगर जिल्ह्यातील राहुरी आणि संगमनेर या दोन विधानसभा मतदारसंघांसाठीही वंचितने उमेदवार जाहीर केले आहेत. खरे तर वंचित बहुजन आघाडीने याआधी एकूण 21 उमेदवारांची नावे जाहीर केली होती.
आज पुन्हा 30 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. अशा तऱ्हेने आत्तापर्यंत वंचितच्या माध्यमातून एकूण 51 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. दरम्यान आता आपण वंचित आघाडीने जाहीर केलेल्या या तिसऱ्या यादीमध्ये कोणाकोणाला संधी मिळाली आहे याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत.
वंचित बहुजन आघाडीची तिसरी यादी
1) धुळे शहर – जितेंद्र शिरसाठ
2) सिंदखेडा – भोजासिंग तोडरसिंग रावल
3) उमरेड – सपना राजेंद्र मेश्राम
4) बल्लारपूर – सतीश मुरलीधर मालेकर
5) चिमूर – अरविंद आत्माराम सांदेकर
6) किनवट – प्रा. विजय खुपसे
7) नांदेड उत्तर – डॉक्टर गौतम दु्थडे
8) देगलूर – सुशील कुमार देगलूरकर
9) पाथरी – विठ्ठल तळेकर
10) परतुर आष्टी – रामप्रसाद थोरात
11) घनसावंगी – सौ कावेरीताई बळीराम खटके
12) जालना – डेव्हिड घुमारे
13) बदनापूर – सतीश खरात
14) देवळाली – अविनाश शिंदे
15) इगतपुरी – भाऊराव काशिनाथ डगळे
16) उल्हासनगर – डॉक्टर संजय गुप्ता
17) अनुशक्ती नगर – सतीश राजगुरू
18) वरळी – अमोल आनंद निकाळजे
19)पेण – देवेंद्र कोळी
20) आंबेगाव – दीपक पंचमुख
21) संगमनेर – अझिज अब्दुल व्होरा
22) राहुरी – अनिल भिकाजी जाधव
23) माजलगाव – शेख मंजूर चांद
24) लातूर शहर – विनोद खटके
25) तुळजापूर – डॉक्टर स्नेहा सोनकाटे
26) उस्मानाबाद – एडवोकेट प्रणित शामराव डिकले
27) परंडा – प्रवीण रणबागुल
28) अक्कलकोट – संतोष कुमार खंडू इंगळे
29) माळशिरस – राज यशवंत कुमार
30) मिरज – विज्ञान प्रकाश माने