आईचं काळीज ! स्वतःला उमेदवारी मिळाली असतांनाही मुलाला उमेदवारी मिळावी म्हणून प्रतिभा पाचपुते यांची मुंबईकडे कूच, विकीदादाला उमेदवारी मिळणार ?

शिर्डी मधून राधाकृष्ण विखे पाटील, राहुरी मधून शिवाजीराव कर्डिले, कर्जत जामखेड मधून राम शिंदे, शेवगाव मधून मोनिका राजळे आणि श्रीगोंद्यातून विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांच्या धर्मपत्नी प्रतिभा पाचपुते यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

Tejas B Shelar
Updated:
Shrigonda Politics News 1

Shrigonda Politics News : भारतीय जनता पक्षाने नुकतीचं विधानसभा निवडणुकांसाठी आपल्या अधिकृत उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या पहिल्या यादीत 99 उमेदवारांच्या नावांचा समावेश असून यात अहिल्यानगर जिल्ह्यातील पाच उमेदवारांचा समावेश आहे.

शिर्डी मधून राधाकृष्ण विखे पाटील, राहुरी मधून शिवाजीराव कर्डिले, कर्जत जामखेड मधून राम शिंदे, शेवगाव मधून मोनिका राजळे आणि श्रीगोंद्यातून विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांच्या धर्मपत्नी प्रतिभा पाचपुते यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

दरम्यान श्रीगोंदा मतदारसंघातून स्वतःला उमेदवारी मिळालेली असतानाही प्रतिभा पाचपुते यांनी मुंबईकडे कूच केली आहे. सूत्रांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, प्रतिभा पाचपुते या स्वतः ऐवजी मुलगा विक्रमसिंह पाचपुते यांना उमेदवारी मिळावी यासाठी आधीपासूनच आग्रही राहिल्या आहेत.

यामुळे भाजपची उमेदवारी जाहीर झालेल्या प्रतिभा पाचपुते या आपल्या मुलाला उमेदवारी मिळावी यासाठी मुंबईकडे रवाना झाल्या आहेत. हेच कारण आहे की पक्षश्रेष्ठींची मनधरणी करण्यासाठी आणि विकी दादांना उमेदवारी मिळावी यासाठी माजी मंत्री तथा विद्यमान आमदार बबनराव पाचपुते आणि प्रतिभा पाचपुते या मुंबईला गेल्या आहेत.

खरे तर काल भारतीय जनता पक्षाने आपल्या अधिकृत उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या पहिल्याच यादीत प्रतिभा पाचपुते यांना उमेदवारी देण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठींनी घेतलाय.

पण, आपल्या मुलाला उमेदवारी मिळावी यासाठी प्रतिभा पाचपुते या आधीपासूनच मागणी करत आहेत. मात्र विक्रमसिंह पाचपुते यांना उमेदवारी देण्याऐवजी पक्षाने प्रतिभा पाचपुते यांना उमेदवारी दिली.

त्यामुळं आता प्रतिभा पाचपुते मुंबईला रवाना झाल्या आहेत आणि तिथे त्या पक्षश्रेष्ठींकडे विकी दादांना उमेदवारी मिळावी यासाठी मागणी करणार आहेत. आता त्यांच्या या मागणीवर पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेणार ? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांनी आठवेळा विधानसभा निवडणुका लढवल्या आहेत आणि यातील सहा वेळा त्यांनी बाजी मारली आहे. गतकाही दशकांमध्ये पाचपुते यांनी या मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलला असल्याचा दावा त्यांच्या कार्यकर्त्यांकडून सातत्याने केला जातो.

यामुळे या निवडणुकीतही पाचपुते कुटुंब या विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवारीसाठी प्रमुख दावेदार होते. यानुसार पक्षाने पाचपुते कुटुंबातील विद्यमान आमदार यांच्या धर्मपत्नी प्रतिभा पाचपुते यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

मात्र प्रतिभा पाचपुते आपल्या मुलाच्या उमेदवारीसाठी मुंबईला गेल्या आहेत. यामुळे पक्षश्रेष्ठी प्रतिभा पाचपुते यांच्या मुलाला उमेदवारी देणार का? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe