HDFC बँकेने 25 वर्षांसाठी 25 लाख रुपयांचे गृह कर्ज मंजूर केले तर कितीचा हप्ता ? नोकरदारांना आणि व्यवसायिकवर्गाला एचडीएफसीचे गृह कर्ज परवडणार

देशातील अनेक प्रमुख बँका आपल्या ग्राहकांना परवडणाऱ्या इंटरेस्ट रेटवर गृह कर्ज उपलब्ध करून देत आहेत. एचडीएफसी बँक देखील आपल्या ग्राहकांना कमी व्याजदरात गृह कर्ज ऑफर करत आहे. दरम्यान आज आपण एचडीएफसी बँकेच्या गृह कर्जाची माहिती जाणून घेणार आहोत.

Tejas B Shelar
Published:
HDFC Bank Home Loan

HDFC Bank Home Loan : जर तुम्ही स्वतःचा व्यवसाय करत असाल किंवा नोकरी करत असाल आणि होम लोन घेण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजचा लेख कामाचा ठरणार आहे. खरंतर अलीकडे घरांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.

यामुळे घर खरेदीसाठी होम लोनचा पर्याय सर्वात बेस्ट ठरतो. देशातील अनेक प्रमुख बँका आपल्या ग्राहकांना परवडणाऱ्या इंटरेस्ट रेटवर गृह कर्ज उपलब्ध करून देत आहेत.

एचडीएफसी बँक देखील आपल्या ग्राहकांना कमी व्याजदरात गृह कर्ज ऑफर करत आहे. दरम्यान आज आपण एचडीएफसी बँकेच्या गृह कर्जाची माहिती जाणून घेणार आहोत.

एचडीएफसी बँकेकडून जर 25 लाख रुपयांचे कर्ज मंजूर झाले तर कितीचा हप्ता भरावा लागणार याबाबत आज आपण माहिती पाहणार आहोत.

एचडीएफसी बँकेचे गृह कर्ज

एचडीएफसी बँक नोकरदार वर्गाला आणि व्यवसायिकांना 9.40% ते 9.95% या स्टॅंडर्ड व्याजदरात गृहकर्ज उपलब्ध करून देते.

याशिवाय बँकेच्या माध्यमातून पगारदार लोकांना आणि व्यावसायिकांना ८.७५ टक्के ते 9.65% या स्पेशल व्याज दरात देखील गृह कर्ज उपलब्ध करून देत असल्याची माहिती बँकेकडून समोर आली आहे.

25 लाखाचे गृह कर्ज मंजूर झाल्यास कितीचा हफ्ता भरावा लागणार

जर एचडीएफसी बँकेकडून 8.75 टक्के या स्पेशल व्याजदरात एखाद्या ग्राहकाला 25 लाख रुपयांचे गृह कर्ज 25 वर्ष कालावधीसाठी मंजूर झाले तर सदर व्यक्तीला 20554 रुपयाचा मासिक हप्ता भरावा लागणार आहे.

म्हणजेच या कालावधीत सदर ग्राहकाला 61 लाख 66 हजार दोनशे रुपये बँकेला द्यावे लागणार आहे. अर्थातच 36 लाख 66 हजार दोनशे रुपये असे निव्वळ व्याज सदर ग्राहकाला भरावे लागणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe