Sujay Vikhe Patil News : विधानसभा निवडणुकांचा तारखांची नुकतीच घोषणा झाली आहे. निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यापासून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. सध्या अहिल्यानगर जिल्ह्यातही राजकीय वातावरण पूर्णपणे तापलय. यंदा जिल्ह्यातील संगमनेर विधानसभा मतदारसंघाची निवडणूक अधिक काटेदार होण्याची शक्यता आहे.
येथून विद्यमान आमदार बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात राज्याचे महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र, नगर दक्षिणेचे माजी खासदार सुजय विखे पाटील हे निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक आहेत.
यासाठी ते सध्या संगमनेर विधानसभा मतदारसंघ अक्षरशः पिंजून काढत आहेत. तसेच त्यांनी बाळासाहेब थोरात यांच्यावर जोरदार हल्ले चढवण्यास सुरुवात केली आहे.
त्यांनी नुकताच हिवरगाव पावसा येथे आयोजित झालेल्या युवा संकल्प मेळाव्यात पुन्हा एकदा बाळासाहेब थोरात यांचा समाचार घेतला आहे. सुजय विखे पाटील यांनी उपस्थित लोकांना संबोधित करताना, ‘दडपशाहीची संस्कृती उखडून टाकण्याचे काम तुम्हाला करायचे आहे.
निर्धार करा. या तालुक्याचा यंदाचा आमदार हा महायुतीचाच करायचा आहे. मुख्यमंत्री पदाची स्वप्न पाहणारे आता आमदारही होवू शकणार नाही,’ असे म्हणतं बाळासाहेब थोरात यांच्यावर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला.
पुढे बोलताना माजी खासदारांनी, या तालुक्याची संस्कृती ही फक्त दडपशाही आणि गुंडगिरीमध्ये अडकलेली आहे. येथील विकास हा फक्त ठराविक कुटूंबासाठी आणि ठेकेदार पोसण्यासाठी सुरु आहे.
युवा संवाद यात्रा काढता, पण तुमच्या सोबत युवा राहीला आहे का ? असा सवाल करत त्यांना आव्हान देत लक्ष साधण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी माजी खासदारांनी निळवंडेचा विषय पण छेडला.
ते म्हणालेत की ‘निळवंडे धरण होवू देत नाही असे अनेक आरोप विखे पाटील परिवारावर झालेत. या मुद्द्यावरून दिवंगत नेते बाळासाहेब विखे पाटील यांना सुद्धा बदनाम केले गेले. मात्र, भगवान के घर देर है, अंधेरा नही. निळवंड्यांचे पाणी मंत्री विखे पाटील यांनीच आणून दाखविले.
म्हणून कधीतरी खरं बोलायला शिका.’ यावेळी त्यांनी गायरान मुद्द्याचा प्रश्न उपस्थित करत माजी महसूलमंत्र्यांनी गायरान जमिनी स्वतःच्या संस्थांच्या नावावर करून घेतल्यात असा आरोप करत हीच तुमची संस्कृती आहे का असे म्हटले आहे.
तसेच यावेळी त्यांनी संगमनेर तालुक्यात परिवर्तन करण्याची हीच खरी संधी आहे असे म्हणतं लोकांना महायुतीचा उमेदवार जिंकून आणावा असे आवाहन केले.