नेवासा विधानसभा मतदारसंघात महायुतीची मोठी खेळी ! भाजपाच्या भिडूला शिवसेना शिंदे गटाचे तिकीट, गडाख विरोधात तगड आव्हान ?

भारतीय जनता पक्षाकडून माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, विठ्ठलराव लंघे आणि शिवसेना शिंदे गटाकडून उद्योजक प्रभाकर शिंदे हे या जागेसाठी इच्छुक होते. यासाठी या नेत्यांच्या माध्यमातून मुंबईमध्ये जोरदार फिल्डिंग लावली जात होती. दरम्यान माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी काल भाजप, शिवसेना व अपक्ष असे तीन उमेदवारी अर्ज दाखल केलेत.

Tejas B Shelar
Published:
Nevasa Vidhansabha

Nevasa Vidhansabha : काल महायुतीमधील शिवसेना शिंदे गटाने आपल्या अधिकृत उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर, नेवासा आणि श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा करण्यात आली. खरे तर संगमनेरमधून भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील निवडणुकीच्या रिंगणात उतरतील अशा चर्चा होत्या.

मात्र ही जागा शिंदे गटाकडे गेली आहे. शिंदे गटाने येथून अमोल धोंडीबा खताळ यांना उमेदवारी दिली आहे. श्रीरामपूर मधून शिंदे गटाने भाऊसाहेब मल्हारराव कांबळे यांना उमेदवारी दिली. तसेच नेवासा विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाने भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांना उमेदवारी बहाल केली आहे.

यामुळे महायुतीने नेवासा विधानसभा मतदारसंघात मोठी खेळी खेळली असल्याचे बोलले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार भाजपा जिल्हा अध्यक्ष विठ्ठलराव लंघे आज आपल्या भाजपा जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देतील आणि शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर उमेदवारी अर्ज भरणार आहेत.

खरे तर नेवासा विधानसभा मतदारसंघात गेल्या काही दिवसांपासून पडद्याआड अनेक मोठमोठ्या घटना घडत होत्या. भारतीय जनता पक्षाकडून माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, विठ्ठलराव लंघे आणि शिवसेना शिंदे गटाकडून उद्योजक प्रभाकर शिंदे हे या जागेसाठी इच्छुक होते.

यासाठी या नेत्यांच्या माध्यमातून मुंबईमध्ये जोरदार फिल्डिंग लावली जात होती. दरम्यान माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी काल भाजप, शिवसेना व अपक्ष असे तीन उमेदवारी अर्ज दाखल केलेत.

परंतु उद्योजक प्रभाकर शिंदे व लंघे हे शिंदे गटाच्या व भाजप नेत्यांच्या निर्णयाची वाट पाहत होते. अखेर कार महायुतीने नेवासा विधानसभा मतदारसंघात भाकरी फिरवली. अगदीच शेवटच्या क्षणी लंघे यांना उमेदवारी बहाल करण्यात आली आहे.

यामुळे त्यांना आता भारतीय जनता पक्षाला रामराम ठोकावा लागणार आहे आणि ते धनुष्यबाण चिन्हावर यंदाची निवडणूक लढवणार आहेत. यानिमित्ताने मात्र गडाख यांच्या विरोधात तुल्यबळ आव्हान उभे राहणार आहे.

आज लंघे हे उमेदवारी अर्ज भरणार आहेत पण शिंदे गटातील उद्योजक प्रभाकर शिंदे आणि माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे नेमका काय निर्णय घेणार, त्यांची भूमिका नेमकी काय असणार याकडे देखील विशेष लक्ष राहणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe