कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे वारे फिरले! येथे पुन्हा शिंदे सरकार येणार का ? जनता कोणाच्या बाजूने कौल देणार ?

विधान परिषदेचे आमदार राम शिंदे हे 2019 पूर्वी या बालेकिल्ल्याचे राखणदार होते. पण गेल्या निवडणुकीत या ठिकाणी मोठा उलटफेर झाला. मंत्री असतानाही रामा भाऊंना पराभवाचा सामना करावा लागला. त्यांना शरद पवारांचे नातू रोहित पवार यांनी पराभूत केले. मात्र रामाभाऊ हे देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय. यामुळे पराभवानंतरही रामाभाऊंची लॉटरी लागली आणि त्यांचे पुनर्वसन विधान परिषदेवर केले गेले.

Tejas B Shelar
Published:
Karjat Jamkhed Politics

Karjat Jamkhed Politics : अहिल्यानगर जिल्ह्यात एकूण बारा विधानसभा मतदारसंघ. कर्जत जामखेड हा देखील जिल्ह्यातील एक महत्त्वाचा विधानसभा मतदारसंघ आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव चौंडी यामुळे हा राज्यातील एक महत्त्वाचा विधानसभा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. खरे पाहता हा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला होता. विधान परिषदेचे आमदार राम शिंदे हे 2019 पूर्वी या बालेकिल्ल्याचे राखणदार होते.

पण गेल्या निवडणुकीत या ठिकाणी मोठा उलटफेर झाला. मंत्री असतानाही रामा भाऊंना पराभवाचा सामना करावा लागला. त्यांना शरद पवारांचे नातू रोहित पवार यांनी पराभूत केले. मात्र रामाभाऊ हे देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय. यामुळे पराभवानंतरही रामाभाऊंची लॉटरी लागली आणि त्यांचे पुनर्वसन विधान परिषदेवर केले गेले. दरम्यान, यंदाच्या निवडणुकीतही राम शिंदे विरुद्ध रोहित पवार अशीच लढत या मतदारसंघात पाहायला मिळत आहे.

यामुळे या दोन ताकतवर नेत्यांच्या लढाईत कोण बाजी मारणार ? भाजपाचा बालेकिल्ला रामाभाऊ पुन्हा खेचून आणणार का ? या ठिकाणी पुन्हा राम शिंदे यांचे शिंदे सरकार येणार का? असे अनेक प्रश्न आहेत. साहजिकच या प्रश्नांची उत्तर मतमोजणीच्या दिवशीच मिळणार आहेत.

मात्र त्यापूर्वी या मतदारसंघात नेमके वारे कोणत्या दिशेने वाहत आहे? याबाबत आज आपण आढावा घेणार आहोत. खरेतर, देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती असल्याने गेल्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर राम शिंदे यांचे विधान परिषदेवर पुनर्वसन करण्यात आले. याचा मतदार संघात रामाभाऊंना याचा फायदा होताना दिसतोय.

गेल्या काही दिवसांच्या काळात राम शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आणि रोहित पवारांनी दिलेले आश्वासन पाळले नसल्याने तसेच कार्यकर्त्यांना रोहित पवार अपमानास्पद वागणूक देत असल्याची तक्रार करत अनेक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात सामील होण्याचा निर्णय घेतलाय.

रोहित पवारांसमवेत असणारे मतदारसंघातील शेकडो कार्यकर्ते आता राम शिंदे यांच्या खेम्यात आले आहेत. यामुळे निवडणुकीच्या काळात विधान परिषदेचे आमदार राम शिंदे यांची ताकद वाढली आहे. रोहित पवारांचे अनेक ज्येष्ठ पदाधिकारी देखील आता राम शिंदे यांच्याकडे आले आहेत.

राम शिंदे यांनी सुरू केलेल्या भूमिपुत्र चळवळीच्या माध्यमातून सध्या मतदारसंघात एक वेगळीच सुनामी आली आहे. असंख्य तरुण, युवक आता भूमिपुत्र चळवळीकडे आकर्षित होत असून राम शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत आहेत. एकंदरीत कर्जत जामखेडची यंदाची निवडणूक ही भूमिपुत्र विरुद्ध बाहेरचा अशी बनली आहे.

तसेच, रोहित पवार यांच्या विरोधात महाविकास आघाडीमध्ये देखील नाराजी असल्याचे बोलले जात आहे. राम शिंदे व महायुतीच्या माध्यमातून भूमिपुत्राचा मुद्दा लावून धरण्यात आला आहे, त्यांना याचा फायदा होतानाही दिसतोय. सध्या स्थितीला या मुद्द्यावरून राम शिंदे यांच्या समर्थकांकडून जोरदार वातावरण निर्मिती होत आहे.

याशिवाय राम शिंदे हे मंत्री असताना आपण केलेल्या कामांच्या जोरावरही अन विधान परिषदेचे आमदार म्हणून त्यांनी मतदारसंघासाठी जी काही कामे केली आहेत त्यांच्या जोरावर मतदारांमध्ये जात आहेत. दरम्यान राम शिंदे यांना मतदारसंघात जोरदार प्रतिसाद सुद्धा मिळतं आहे.

यामुळे कर्जत आणि जामखेड या दोन तालुक्यांच्या गावांनी मिळून बनलेल्या या मतदारसंघात नेमकं कोण वरचढ ठरणार, रामाभाऊ पुन्हा आपला गड काबीज करणार की रोहित पवार नव्याने हाती आलेला गड शाबूत ठेवणार? ही गोष्ट विशेष पाहण्यासारखी ठरणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe