महाराष्ट्रात लोकसभेचाचं ट्रेंड दिसणार! महाविकास आघाडी वरचढ ठरणार, लोकपोलच्या निवडणूकपूर्व सर्व्हेत कोणत्या पक्षाला किती जागा ?

यंदा विधानसभा निवडणुकीसाठी वीस तारखेला मतदान होणार आहे आणि 23 तारखेला निकाल जाहीर होणार आहे. म्हणजे मतदानासाठी आता अवघ्या काही 6 दिवसांचा काळ बाकी राहिला आहे. तसेच प्रचारासाठी फक्त चार दिवस शिल्लक आहेत. अशातच आता लोकपोलचा निवडणूक पूर्व सर्व्हे जाहीर झालाय.

Tejas B Shelar
Published:
Maharashtra Assembly Election

Maharashtra Assembly Election : शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, ठाकरे गट, शिवसेना शिंदे गट, शिवसेना काँग्रेस आणि भाजपा असे प्रमुख सहा पक्ष पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये सरळ टक्कर होणार आहे.

यंदा विधानसभा निवडणुकीसाठी वीस तारखेला मतदान होणार आहे आणि 23 तारखेला निकाल जाहीर होणार आहे. म्हणजे मतदानासाठी आता अवघ्या काही 6 दिवसांचा काळ बाकी राहिला आहे. तसेच प्रचारासाठी फक्त चार दिवस शिल्लक आहेत.

अशातच आता लोकपोलचा निवडणूक पूर्व सर्व्हे जाहीर झालाय. खरे तर नुकत्याच काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले होते.

महायुतीच्या तुलनेत महाविकास आघाडीला चांगल्या जागा मिळाल्यात. त्यानंतर मात्र महायुती सरकारने महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिकांसाठी मोठमोठ्या घोषणा केल्यात. अनेक योजना सुरू केल्या गेल्यात.

यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी लोकसभेची कामगिरी कायम ठेवणार की महायुती लोकसभेच्या पराभवातून बाहेर निघत आपली सत्ता कायम ठेवणार? याबाबत वेगवेगळ्या दावे केले जात आहेत.

अशातच आता लोकपोलने निवडणूकपूर्व सर्व्हे जाहीर केला असून यामधून जनतेचा कौल नेमका कोणाच्या बाजूने झुकू शकतो याबाबत अंदाज वर्तवण्यात आला आहे.

लोकपोलच्या सर्व्हेनुसार, राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला ११५ ते १२८ जागा, मविआला १५१-१६२ जागा आणि इतरला ०५-१४ जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

महाराष्ट्रात सत्ता स्थापित करण्यासाठी 145 आमदारांचे संख्याबळ आवश्यक असते. अर्थातच या सर्वेनुसार महाविकास आघाडी 145 आमदारांच्या संख्याबळाच्या जादुई आकड्याला गवसनी घालताना दिसत आहे.

म्हणजेच या सर्वे मध्ये महाविकास आघाडी लोकसभेचा आपला परफॉर्मन्स विधानसभेत देखील कायम ठेवणार असा अंदाज सांगितला गेला आहे. मात्र हा निवडणूक पूर्व सर्वे आहे. प्रत्यक्षात जेव्हा विधानसभा निवडणुकीचा निकाल लागेल तेव्हाच महाराष्ट्राची सत्ता कोणाच्या हातात जाणार हे स्पष्ट होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe