सावधान ! घरात ‘या’ ठिकाणी चुकूनही ठेऊ नका पैसा, नाहीतर होणार मोठे नुकसान, वाचा सविस्तर

घरात पैसे कोणत्या ठिकाणी ठेवले पाहिजेत याबाबतही वास्तुशास्त्रात काही नियम आहेत. हे नियम नीट पाळले नाहीत तर आपल्याला आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते. वास्तुशास्त्रातील तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे, पैसा आणि संपत्तीशी संबंधित समस्यांवर मात करण्यासाठी वास्तुशास्त्रात काही विशेष दिशा आणि स्थान सांगण्यात आले आहे.

Tejas B Shelar
Published:
Vastu Tips 2024

Vastu Tips 2024 : वास्तुशास्त्रानुसार, घराची बांधणी केली असेल तर घरात भरभराट राहते. खरेतर वास्तुशास्त्राचे असे काही नियम आहेत ज्या नियमांचे पालन केले नाही तर मोठे नुकसान सहन करावे लागू शकते. घरात पैसे कोणत्या ठिकाणी ठेवले पाहिजेत याबाबतही वास्तुशास्त्रात काही नियम आहेत.

हे नियम नीट पाळले नाहीत तर आपल्याला आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते. वास्तुशास्त्रातील तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे, पैसा आणि संपत्तीशी संबंधित समस्यांवर मात करण्यासाठी वास्तुशास्त्रात काही विशेष दिशा आणि स्थान सांगण्यात आले आहे.

दरम्यान आज आपण वास्तुशास्त्रात पैसे कोणत्या ठिकाणी ठेवले पाहिजेत ? याबाबत काय सांगितले गेले आहे याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.

जिन्याखाली पैसे ठेवू नका : जर तुमच्याही घरात जिना असेल तर त्या जिन्याखाली पैसे ठेवू नका. वास्तुशास्त्रानुसार, घरामध्ये जिन्याच्या पायऱ्यांखाली कोणतीही वस्तू ठेवणे अशुभ मानले जाते. अशा ठिकाणी पैसे ठेवण्यासाठी जागा बनवल्यास घरातील पैशाचा ओघ थांबू शकतो.

यामुळे तुमच्या घरातील समृद्धी थांबू शकते आणि तुम्हाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे पायऱ्यांखाली कधीही पैसे ठेवू नका आणि ही जागा रिकामी आणि स्वच्छ ठेवा.

टॉयलेटच्या भिंतीजवळ कधीही पैसे ठेवू नका : आजकाल बरेच लोक लहान घरात राहतात. घरात कमी जागा असते आणि यामुळे मग जागेची ॲडजस्टमेंट करावे लागते. जागेच्या कमतरतेमुळे अनेक वेळा काही लोक बाथरूमच्या भिंतीजवळच वस्तू ठेवतात. काही लोक तर बाथरूमच्या भिंती जवळच पैसे ठेवतात.

पण चुकूनही तुम्ही तुमचे पाकीट किंवा पैसे बाथरूमच्या भिंतीजवळ ठेवू नयेत. वास्तूनुसार ही मोठी चूक मानली जाते, या ठिकाणी पैसे ठेवल्याने पैशाची समस्या उद्भवते. यामुळे पैसा तर वाचत नाहीच, शिवाय कर्जात बुडून जाण्याचीही शक्यता असते. यामुळे चुकूनही बाथरूमच्या भिंती जवळ पैसे ठेवू नका.

दक्षिण दिशेला पैसा ठेवू नका : वास्तुशास्त्रानुसार, घराची दक्षिण दिशा पैसा ठेवण्यासाठी योग्य मानली जात नाही. याला यमाची दिशा म्हणतात, जी मृत्यू आणि विनाशाचे प्रतीक मानली जाते.

जर तुम्ही कष्टाने कमवलेला पैसा दक्षिण दिशेला ठेवलात तर तो नेहमी खर्च होतो आणि कोणत्या ना कोणत्या कारणाने तुम्हाला नुकसान सहन करावे लागते. त्याऐवजी घराची ईशान्य दिशा पैसे ठेवण्यासाठी उत्तम मानली जाते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe