2025 मध्ये मुंबईला मिळणार एका नव्या मार्गाची भेट ! ‘या’ रस्ते प्रकल्पामुळे 40 मिनिटाचा प्रवास होणार फक्त 15 मिनिटात

मुंबईत मेट्रो समवेतच रस्त्याचेही अनेक मोठ मोठे प्रकल्प पूर्णत्वाला गेले आहेत आणि भविष्यात अजूनही मोठमोठ्या प्रकल्पांची कामे होणार आहे. शहरात अजूनही काही महत्त्वाच्या प्रकल्पांची कामे सुरू असून यातील काही प्रकल्प येत्या काही दिवसांनी सुरू होणार आहेत. कोस्टल रोड प्रकल्प हा असाच एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून हा प्रकल्प 2025 मध्ये सुरू होणार अशी माहिती समोर येत आहे.

Tejas B Shelar
Published:
Mumbai News

Mumbai News : गेल्या काही वर्षांमध्ये मुंबईसहित संपूर्ण महाराष्ट्रात मोठ-मोठ्या रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत. विशेषतः मुंबई बाबत बोलायचं झालं तर मुंबईमधील कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी शासन आणि प्रशासनाने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. मुंबईत मेट्रो समवेतच रस्त्याचेही अनेक मोठ मोठे प्रकल्प पूर्णत्वाला गेले आहेत आणि भविष्यात अजूनही मोठमोठ्या प्रकल्पांची कामे होणार आहे.

शहरात अजूनही काही महत्त्वाच्या प्रकल्पांची कामे सुरू असून यातील काही प्रकल्प येत्या काही दिवसांनी सुरू होणार आहेत. कोस्टल रोड प्रकल्प हा असाच एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून हा प्रकल्प 2025 मध्ये सुरू होणार अशी माहिती समोर येत आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की कोस्टल रोड प्रकल्पाचे जवळपास 95 टक्के काम पूर्ण झाले असून लवकरच बाकी राहिलेले काम पूर्ण होईल आणि हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने सर्वसामान्यांसाठी सुरू होईल.

यावर्षी, 11 मार्च 2024 रोजी वरळी ते मरीन ड्राईव्ह 9.29 किमी. दक्षिणवाहिनी मार्गिका सुरू करण्यात आली होती. पुढे 10 जून 2024 रोजी मरीन ड्राईव्ह ते लोटस जंक्शन 6.25 किमी उत्तरवाहिनी मार्गिका सुरु झाली.

तसेच, 11 जुलै 2024 रोजी हाजी अली ते खान अब्दुल गफार खान मार्गाला जोडणारी मार्गिका सुरु करण्यात आली. दरम्यान नुकत्याच दोन दिवसांपूर्वी मुंबई महापालिकेने हाजी अली ज्यूस सेंटर ते वरळी नाक्यापर्यंतची आंतरबदल मार्गिका क्रमांक २ ही मार्गीका सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यामुळे या रोडवरील हाजी अली ते वांद्रे-वरळी सी लिंकदरम्यानच्या आठपैकी सहा आंतरबदल मार्गिका सुरू झाल्या आहेत. त्यामुळे मुंबईकरांचा प्रवासाचा वेळ वाचणार आहे. कोस्टल रोड प्रकल्पामुळे आता 40 मिनिटांचा प्रवास 10 ते 15 मिनिटांत होणार असा विश्वास यावेळी व्यक्त केला आहे.

महत्त्वाचे म्हणजे याच्या उर्वरित दोन मार्गिका देखील लवकरच सुरू होणार आहेत. या प्रकल्पातील राहिलेली कामे म्हणजे काँक्रिटकीरण, विद्युत खांबाची उभारणी यासह इतर तांत्रिक कामे येत्या दोन आठवड्यात पूर्ण होणार अशी माहिती पालिका प्रशासनाकडून दिली जात आहे.

यामुळे येत्या जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत कोस्टल रोड प्रकल्पाचा शेवटचा टप्पा सर्वसामान्यांसाठी सुरू होऊ शकतो. यामुळे मुंबईच्या वाहतूक क्षेत्रात लवकरच एक नवी क्रांती येणार आहे आणि यामुळे मुंबईकरांना वाहतूक कोंडी पासून दिलासा मिळेल असे म्हटले जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe