नवीन 7 सीटर कार खरेदी करायचीये ? मग ‘हे’ 3 पर्याय ठरतील बेस्ट !

जर तुम्हीही नजीकच्या भविष्यात परवडणाऱ्या किमतीत नवीन 7-सीटर खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. कारण की आज आपण परवडणाऱ्या किमतीच्या तीन सेव्हन सीटर कारची माहिती पाहणार. भारतीय कार मार्केटमध्ये अशा 3 कार आहेत, ज्या की 7 सीटर आहेत अन बजेट फ्रेंडली सुद्धा आहेत.

Tejas B Shelar
Published:

Best 7 Seater Car : भारतीय कार मार्केटमध्ये विविध ऑटो कंपन्याच्या सेव्हन सीटर कार उपलब्ध आहेत. गेल्या काही वर्षांपासून भारतीय ग्राहकांमध्ये 7-सीटर कारच्या मागणीत सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. जर तुम्हीही नजीकच्या भविष्यात परवडणाऱ्या किमतीत नवीन 7-सीटर खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.

कारण की आज आपण परवडणाऱ्या किमतीच्या तीन सेव्हन सीटर कारची माहिती पाहणार. भारतीय कार मार्केटमध्ये अशा 3 कार आहेत, ज्या की 7 सीटर आहेत अन बजेट फ्रेंडली सुद्धा आहेत.

आता आपण या भारतातील 3 प्रमुख बजेट फ्रेंडली 7 सीटर कारचे फीचर्स, पॉवरट्रेन आणि किंमत याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत.

महिंद्रा बोलेरो निओ : महिंद्रा बोलेरो निओ ही देशातील लोकप्रिय ऑटो कंपनी महिंद्राची एक लोकप्रिय कार आहे. ही गाडी भारतीय रस्त्यांसाठी फारच उत्कृष्ट असून एक उत्तम ७ सीटर पर्याय आहे. भारतीय बाजारात बोलेरो निओची एक्स-शोरूम किंमत 9.95 लाख रुपये आहे.

आम्ही तुम्हाला सांगतो की, पॉवरट्रेन म्हणून कारमध्ये 1.5-लिटर डिझेल इंजिन देण्यात आले आहे. त्याच वेळी, MPV मध्ये 7-इंचाची टचस्क्रीन आणि ड्युअल एअरबॅग्ज सारखी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.

मारुती सुझुकी एर्टिगा : मारुती सुझुकी ही देशातील एक लोकप्रिय ऑटो कंपनी आहे. या कंपनीच्या अनेक गाड्या ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहेत. मारुती सुझुकी एर्टिगा ही देखील कंपनीची अशीच एक लोकप्रिय कार असून भारतीय बाजारपेठेत सर्वाधिक विकली जाणारी एमपीव्ही म्हणून या गाडीला ओळखले जात आहे.

Maruti Suzuki Ertiga ची मार्केटमध्ये एक्स-शोरूम किंमत 8.69 लाख रुपये आहे. या एमपीव्हीमध्ये 1.5-लिटर पेट्रोल इंजिन पॉवरट्रेन म्हणून वापरले गेले आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, गेल्या काही महिन्यांपासून मारुती एर्टिगा एकूणच देशातील सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या कारच्या यादीत समाविष्ट आहे हे विशेष.

टोयोटा Rumion : जर तुम्ही नवीन 7-सीटर खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर टोयोटा रुमिओन हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. Toyota Rumion मध्ये पॉवरट्रेन म्हणून 1.5-लीटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे.

ही 7-सीटर ग्राहकांना 20 किमी मायलेज देण्याचा दावा करते. Toyota Rumion ची भारतीय बाजारपेठेत एक्स-शोरूम किंमत 10.04 लाख रुपये इतकी आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe