Realmi 14x Smartphone:- तुम्हाला जर नवीन स्मार्टफोन खरेदी करायचा असेल व चांगलीच चांगली वैशिष्ट्ये तसेच दमदार असा स्मार्टफोनच्या शोधात तुम्ही असाल तर तुमचा शोध जवळपास उद्या संपणार आहे. कारण उद्या म्हणजेच 18 डिसेंबरला रियलमी ही कंपनी Realmi 14x हा दमदार स्मार्टफोन लॉन्च करणार आहे.
विशेष म्हणजे कंपनीने दावा केल्यानुसार जर बघितले तर पंधरा हजार रुपयांच्या किमतीमध्ये मिळणारे जे काही स्मार्टफोन आहेत त्यामध्ये प्रथमच या स्मार्टफोनमध्ये पाणी आणि धूळ यांना प्रतिरोध म्हणजेच अटकाव करण्यासाठी IP69 रेटिंग असलेले
संरक्षण मिळणार आहे.
या स्मार्टफोन बद्दल कंपनीने अजून कुठलीही माहिती शेअर केलेली नाही.परंतु अनेक मीडिया रिपोर्टमध्ये या स्मार्टफोनचे फीचर्स लीक झाले आहेत. त्यानुसार या स्मार्टफोनबद्दल काही माहिती घेऊ.
काय आहेत Realmi 14x स्मार्टफोनचे फीचर्स?
1- कसा असेल डिस्प्ले- या स्मार्टफोन मध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.67 इंचाचा फुल एचडी + एलसीडी डिस्प्ले मिळण्याची शक्यता आहे. या डिस्प्लेचा पिक ब्राईटनेस 1000 nits इतका आहे.
2- कसा आहे कॅमेरा- या स्मार्टफोनमध्ये कंपनीने मागच्या पॅनलवरील फ्लॅशसह ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप दिला आहे व यामध्ये पन्नास मेगापिक्सलचा प्राइमरी सेन्सर आणि दोन मेगापिक्सल डेप्थ सेंसर यामध्ये मिळू शकते. तसेच उत्तम व्हिडिओ कॉलिंग व सेल्फीकरिता आठ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देखील असण्याची शक्यता आहे.
3- प्रोसेसर कोणता आहे?- हा स्मार्टफोन प्रामुख्याने अँड्रॉइड 14 वर काम करणारा असून मीडियाटेक डायमेन्शन 6300 प्रोसेसर या स्मार्टफोनमध्ये असू शकतो.
4- कशी आहे बॅटरी?- कंपनीने केलेल्या दाव्यानुसार बघितले तर पावर बॅकअप करिता या स्मार्टफोनमध्ये 6000mAh क्षमतेची बॅटरी दिली आहे.जी 45W चार्जिंगला सपोर्ट करते. यामध्ये कंपनीने दावा केला आहे की हा स्मार्टफोन अवघ्या 38 मिनिटांमध्ये 93 टक्के पर्यंत चार्ज होऊ शकतो.
5- इतर वैशिष्ट्ये- तसेच रियलमी 14x स्मार्टफोनमध्ये व्हीसी कुलिंग तंत्रज्ञान वापरले आले आहे व त्यासोबत आयपी 54 रेटिंग, 3.5 एमएम जॅक आणि साऊंड माउंटेन फिंगरप्रिंट सेन्सर देखील आहे. तसेच या फोनची जाडी 7.69 मीमी व वजन 188 ग्राम आहे.