28 डिसेंबरपासून शुक्र वाढवेल ‘या’ 3 राशींचा ताण! होऊ शकते पैशांचे नुकसान व करावा लागू शकतो अडचणींचा सामना

ज्योतिष शास्त्रानुसार बघितले तर शुक्र हा ग्रह धनसंपत्ती,प्रेम, वासना आणि ऐश्वर्य इत्यादींचा कारक समजला जातो व ज्या व्यक्तींच्या कुंडलीमध्ये शुक्र मजबूत स्थितीमध्ये असतो ते व्यक्ती धनवान असतात. करियर आणि व्यवसायाच्या दृष्टिकोनातून देखील शुक्र हा फायद्याचा ठरतो.

Ajay Patil
Published:
shukra gochar

Shukra Gochar 2024:- ज्योतिष शास्त्रानुसार बघितले तर शुक्र हा ग्रह धनसंपत्ती,प्रेम, वासना आणि ऐश्वर्य इत्यादींचा कारक समजला जातो व ज्या व्यक्तींच्या कुंडलीमध्ये शुक्र मजबूत स्थितीमध्ये असतो ते व्यक्ती धनवान असतात. करियर आणि व्यवसायाच्या दृष्टिकोनातून देखील शुक्र हा फायद्याचा ठरतो.

तसेच कुंडलीमध्ये शुक्राची स्थिती मजबूत असेल तर आयुष्यामध्ये फार कमीत कमी समस्यांना तोंड द्यावे लागते. परंतु या उलट जर शुक्र अशुभ स्थितीमध्ये असेल तर मात्र पैशांची कमतरता भासू शकते किंवा इतर अनेक प्रकारचे नुकसान होऊ शकते.

सध्या जर आपण बघितले तर 28 डिसेंबर रोजी शुक्र राशी बदलणार आहे व कुंभ राशीमध्ये संक्रमण म्हणजेच कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. या शुक्राच्या संक्रमणाचा म्हणजेच गोचराचा काही राशींना फायदा होणार आहे तर काही राशी साठी ते अशुभ व नुकसानदायक ठरणार आहे. कुंभ राशीत शुक्राचे होत असलेले संक्रमण कोणत्या राशींना अडचणीचे ठरू शकते? याबद्दलची माहिती या लेखात बघू.

शुक्राचे कुंभ राशीतील संक्रमण या राशींना ठरेल अडचणीचे

1- वृश्चिक राशी- या राशींच्या व्यक्तींकरिता शुक्राचे हे राशी परिवर्तन फारसे अनुकूल राहणार नाही. या कालावधीत मानसिक तणाव वाढू शकतो.तसेच विद्यार्थ्यांना अभ्यास करावासा वाटणार नाही व त्यांची एकंदरीत शैक्षणिक कामगिरी खराब होऊ शकते. तसेच कुटुंबामध्ये काही समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.

कुटुंबामध्ये आई किंवा कुटुंबातील एखाद्या सदस्यांची तब्येत बिघडू शकते व पैशांचा खर्च वाढू शकतो. तुम्ही ज्या ठिकाणी काम करत असाल त्या ठिकाणी देखील अडचणींचा सामना करावा लागू शकतो व तुमचे शत्रू तुम्हाला काही गोष्टींमध्ये अडचणी निर्माण करू शकतात.

2- कन्या राशी- कन्या राशींच्या व्यक्तींना शुक्राच्या या संक्रमणामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात तसेच शत्रूंमुळे जीवनात अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागू शकते.

वैवाहिक जीवनामध्ये देखील चढउतार येऊ शकतात व कोणत्याही व्यक्तीवर या कालावधीत आंधळेपणाने विश्वास ठेवू नये. कारण या कालावधीत फसवणूक होण्याची शक्यता जास्त आहे. पार्टनरशिपमध्ये कुठला व्यवसाय असेल तर त्यात नुकसान होण्याची शक्यता आहे.

3- धनु राशी- कुंभ राशीत शुक्राचे होणारे हे संक्रमण धनु राशींच्या व्यक्तींसाठी लाभदायक ठरणार नाही. कार्यक्षेत्रामध्ये देखील अडचण येण्याची शक्यता आहे व नोकरी करत असाल तर त्यामध्ये अचानक बदल संभवतो.

नातेसंबंधांमध्ये देखील नकारात्मक असे बदल पाहायला मिळू शकतात व पती-पत्नीमध्ये देखील कटूता निर्माण होण्याची शक्यता आहे व यामुळे गैरसमज वाढतील. त्यामुळे कौटुंबिक पातळीवर विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे.

( टीप- वरील माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती वाचकांसाठी माहितीस्तव सादर केली आहे. या माहिती विषयी अहमदनगर लाईव्ह 24 कुठल्याही प्रकारचा दावा करत नाही किंवा या माहितीचे समर्थन देखील करत नाही.)

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe