15 हजारपेक्षा कमी बजेटमध्ये स्मार्टफोन शोधत आहात का? ‘हे’ आहेत उत्तम असे 5G स्मार्टफोन! मिळतात अनेक फीचर्स

स्मार्टफोन खरेदी करणारा कुठलाही व्यक्ती हा कमीत कमी बजेटमध्ये म्हणजेच कमीत कमी किमतीत अतिशय उत्तम असा स्मार्टफोन आपल्याला मिळेल या दृष्टिकोनातून स्मार्टफोनची निवड करतो. भारतीय स्मार्टफोन बाजारपेठेमध्ये अनेक बजेटमधील स्मार्टफोन आहेत

Ajay Patil
Published:
smartphone

Under 15K Price Smartphone:- स्मार्टफोन खरेदी करणारा कुठलाही व्यक्ती हा कमीत कमी बजेटमध्ये म्हणजेच कमीत कमी किमतीत अतिशय उत्तम असा स्मार्टफोन आपल्याला मिळेल या दृष्टिकोनातून स्मार्टफोनची निवड करतो. भारतीय स्मार्टफोन बाजारपेठेमध्ये अनेक बजेटमधील स्मार्टफोन आहेत व प्रत्येकाची वैशिष्ट्ये मात्र वेगवेगळे असल्याचे आपल्याला दिसून येतात व त्यामुळे स्मार्टफोन निवड करताना मात्र बऱ्याचदा गोंधळ उडतो.

समजा तुम्हाला देखील स्मार्टफोन घ्यायचा आहे आणि तुमचा बजेट जर 15000 रुपयांपेक्षा कमी असेल तर या लेखामध्ये आपण अशाच मध्यम बजेट श्रेणी मधील काही स्मार्टफोनची माहिती बघणार आहोत. जे कमी किमतीत आकर्षक अशी वैशिष्ट्ये ऑफर करतात.

पंधरा हजारपेक्षा कमी बजेटमधील ही आहेत टॉप स्मार्टफोन ऑप्शन

1- पोको M7 Pro 5G- या स्मार्टफोनचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये रेडमी नोट 14 ची सर्व वैशिष्ट्ये देण्यात आले आहेत. या फोनमध्ये 6.67 इंच 1080 पिक्सेलचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे व याचा स्क्रीन रिफ्रेश रेट 120Hz आहे आणि पीक ब्राईटनेस 2100 nits आहे व या डिवाइसमध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 संरक्षण देण्यात आले असून या हँडसेटमध्ये मीडियाटेक डायमेन्शन 7025 अल्ट्रा प्रोसेसर देण्यात आला आहे.

आठ जीबी रॅम आणि 256 जीबी पर्यंत इनबिल्ट स्टोरेज देखील आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइड 14 वर आधारित Xiaomi HyperOS सह येतो आणि उत्तम फोटोग्राफीसाठी या स्मार्टफोन मध्ये 50 मेगापिक्सलचा सोनी LYT-600 प्राथमिक सेन्सर कॅमेरा देण्यात आला आहे व दोन मेगापिक्सलचा मॅक्रो सेंसर देखील देण्यात आला आहे.

उत्तम सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंग करिता या फोनमध्ये वीस मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच उत्तम पावर बॅकअप करिता यामध्ये मोठी 5110mAh बॅटरी देखील दिली आहे व जी 45W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

या स्मार्टफोनमध्ये आठ जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज पर्यायसह सहा जीबी रॅम आणि 128 जीबी इनबिल्ट स्टोरेज आहे. दोन्ही स्टोरेज मॉडेल्सची अनुक्रमे किंमत 14999 आणि 16999 रुपये इतकी आहे.

2- रियलमी 14X 5G- रियलमीच्या या स्मार्टफोनमध्ये 6.67 इंच 120Hz एलसीडी डिस्प्ले देण्यात आला असून स्क्रीनची कमाल ब्राईटनेस पावर 625 nits इतकी आहे. तसेच या स्मार्टफोनला IP69 डस्ट आणि वॉटर रेजिस्टन्स रेटिंग देण्यात आले आहे.

या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सीटी 6300 प्रोसेसर देण्यात आला असून आठ जीबी पर्यंत रॅम आणि 128 जीबी पर्यंत इनबिल्ट स्टोरेज सारखी वैशिष्ट्ये देखील देण्यात आली आहे.

तसेच उत्तम पावर बॅकअप करिता या स्मार्टफोनमध्ये मोठी 6000mAh बॅटरी देण्यात आली असून जी 45W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. फोटोग्राफीसाठी या स्मार्टफोनमध्ये एपर्चर F/1.8 सह 50 मेगापिक्सलचा प्राथमिक मागील सेंसर देण्यात आला आहे व सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी आठ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

या स्मार्टफोनच्या सहा जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 14 हजार 999 रुपये इतकी आहे. तर आठ जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरियंटची किंमत 15999 रुपये आहे.

3- रेडमी 13 5G- या स्मार्टफोनमध्ये ६.७८ इंच 1080 एलसीडी डिस्प्ले देण्यात आला असून त्याचा रिफ्रेश रेट 120 Hz इतका आहे व स्क्रीन 550 nits इतक्या ब्राईटनेसला सपोर्ट करते. फोटोग्राफीसाठी या स्मार्टफोनमध्ये 108 मेगापिक्सल सॅमसंग HM6 प्राथमिक सेंसर देण्यात आला आहे व दोन मेगापिक्सलची मॅक्रो लेंस देखील आहे.

तसेच तेरा मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. उत्तम पावर बॅकअप करिता या स्मार्टफोनला मोठी 5030mAh क्षमतेची बॅटरी दिली असून जी 33W जलद चार्जिंगला सपोर्ट करते.

या स्मार्टफोनच्या सहा जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरियंटची किंमत 13999 रुपये आहे तर आठ जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 15499 रुपये आहे.

4- विवो T3x 5G- या स्मार्टफोनमध्ये ६.७२ इंचाचा 1080 पिक्सेल एलसीडी डिस्प्ले देण्यात आला असून त्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे व स्क्रीनची कमाल ब्राईटनेस क्षमता ही 1000 nits इतकी देण्यात आली आहे. तसेच या स्मार्टफोनला पावर बॅकअप करिता 6000mAh क्षमतेची बॅटरी दिली असून जी 44W जलद चार्जिंगला सपोर्ट करते व हा फोन अँड्रॉइड 14 वर चालतो.

या फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यामध्ये 50 मेगापिक्सलचा प्राथमिक मागील कॅमेरा आणि दोन कॅमेरे हे दोन मेगापिक्सल सेंसरचे आहेत. या स्मार्टफोनमध्ये आठ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

हा स्मार्टफोनच्या 4 जीबी रॅम आणि 128 जीबी व्हेरियंटची किंमत 13499 रुपये इतकी आहे. तसेच आठ जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरियंटची किंमत 16499 रुपये आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe