Diploma Courses After 10th:- तुम्हाला जर दहावीनंतर पटकन करिअर सेट करायचे असेल किंवा तुम्हाला दोन पैसे कमावता येतील असे काही करायचा प्लॅन असेल तर यामध्ये काही महत्त्वाचे डिप्लोमा कोर्स खूप महत्त्वाचे असून ते एक करिअरच्या दृष्टिकोनातून उत्तम पर्याय आहेत.
दहावी नंतर करता येणारे जे काही डिप्लोमा कोर्सेस आहेत ते नुसते आवश्यक कौशल्य शिकवत नाही तर रोजगाराच्या चांगल्या संधी देखील निर्माण करतात.
त्यामुळे तुमच्या घरात जर कोणी दहावीला असेल किंवा तुम्ही स्वतः दहावीला असाल व त्यानंतर तुम्हाला करिअर करायचे असेल तर या लेखात काही महत्त्वाच्या डिप्लोमा कोर्सची माहिती थोडक्यात दिलेली आहे. कमी कालावधीत नोकरी मिळवण्यासाठी व करिअर सेट करण्यासाठी फायद्याचे ठरतील.
दहावीनंतर फायद्याचे डिप्लोमा कोर्सेस
1- अभियांत्रिकी पदविका( इंजिनीरिंग डिप्लोमा)- दहावीनंतर तुम्ही मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सिविल किंवा कम्प्युटर सायन्स सारखे इंजीनियरिंग डिप्लोमा कोर्सेसला प्रवेश घेऊन तांत्रिक क्षेत्रामध्ये उत्तम प्रकारचे करिअर करू शकतात. या अभ्यासक्रमांना उद्योग क्षेत्रामध्ये एक चांगली मागणी आहे.
2- डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स- इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक क्षेत्रामध्ये डिप्लोमा कोर्सेस करून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि उपकरणांची दुरुस्ती आणि देखभाल या क्षेत्रामध्ये उत्तम करिअर बनवता येते.
3- डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट- हॉटेल इंडस्ट्रीमध्ये करिअर करायचे असेल तर हा कोर्स तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे मदत करेल व यामध्ये तुम्हाला किचन तसेच हॉस्पिटॅलिटी आणि हॉटेल ऑपरेशनची माहिती मिळेल.
4- डिप्लोमा इन कॅम्पुटर एप्लीकेशन- ज्या विद्यार्थ्यांना एक क्षेत्रामध्ये करिअर करायची इच्छा आहे अशा विद्यार्थ्यांसाठी हा अभ्यासक्रम एक उत्तम पर्याय आहे. यामध्ये वेब डिझाईनिंग तसेच प्रोग्रामिंग आणि मूलभूत सॉफ्टवेअर कौशल्य शिकवली जातात.
5- डिप्लोमा इन नर्सिंग- ज्यांना आरोग्य क्षेत्रामध्ये काम करायचे आहे त्यांच्यासाठी हा अभ्यासक्रम अतिशय महत्त्वाचा असून या अभ्यासक्रमामुळे हॉस्पिटल,आरोग्य क्षेत्राशी संबंधित क्षेत्रामध्ये चांगल्या नोकरीच्या संधी मिळतात.
6- डिप्लोमा इन ग्राफिक डिझाईनिंग- फॅशन इंडस्ट्रीत करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा अभ्यासक्रम एक उत्तम पर्याय आहे. या अभ्यासक्रमामध्ये फॅशन ट्रेंड आणि डिझाइनिंगचे बारकावे शिकवले जातात.
7- डिप्लोमा इन फायनान्स अँड अकाउंटिंग- फायनान्स आणि अकाउंटिंग क्षेत्रातील हा डिप्लोमा कोर्स तुम्हाला बँक आणि वित्तीय संस्थांमध्ये नोकरी मिळवून देऊ शकतो.
8- डिप्लोमा इन मेकअप अँड ब्युटी थेरपी- सौंदर्यप्रसाधने उद्योगांमध्ये करिअर करणाऱ्यांसाठी हा अभ्यासक्रम फायद्याचा आहे. यामध्ये स्किन केअर, हेल्थकेअर आणि मेकअप आर्ट शिकवले जाते.
9- डिप्लोमा इन फुड टेक्नॉलॉजी- या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून अन्नप्रक्रिया आणि तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये रोजगाराच्या चांगल्या संधी उपलब्ध होतात.