Chankya Niti:- आचार्य चाणक्य हे नाव सगळ्यांना माहिती आहे व ते त्यांचे प्रेरणादायी विचार आणि कुठल्याही व्यक्तीने आयुष्यामध्ये कशा प्रकारचे जीवन जगावे? यासंबंधी जी काही माहिती किंवा जे काही नियम सांगितले आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत. त्यांनी जीवनातील प्रत्येक क्षेत्रामध्ये कशा पद्धतीने व्यक्तीने जीवन जगावे किंवा कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या गोष्टी करू नयेत? इत्यादी बद्दल खूप सखोल असे विचार मांडलेले आहेत व त्यांचे विचार जर बघितले तर ते प्रत्येक व्यक्तीसाठी फायद्याचे ठरतील असेच आहेत.
सोप्या शब्दात सांगायचे म्हटले म्हणजे एकंदरीत मानवी जीवनाच्या कल्याणाकरिता त्यांनी जे काही नियम किंवा ज्या काही बाबी सांगितलेले आहेत त्याला चाणक्य नीति म्हणून देखील ओळखले जाते. जीवन जगताना जीवनाचा मार्ग सोपा आणि सुकर व्हावा याकरिता त्यांनी अनेक मार्ग सांगितलेले आहेत.
तसेच त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे हे सगळे मार्ग अगदी सोप्या भाषेत सांगितल्याने समजायला आणि ते जीवनामध्ये अवलंबायला देखील सोपे जातात. त्यांनी त्यांच्या चाणक्य नीति मध्ये पैशांचा योग्य वापर कोणत्या ठिकाणी करावा आणि कशा पद्धतीने करावा? इत्यादी बद्दल देखील खूप छान असे विचार मांडलेले आहेत.
या अनुषंगाने त्यांनी असे काही मार्ग सांगितलेत की त्या ठिकाणी जर तुम्ही पैसा खर्च केला तर पैशाची कमी कधीच पडत नाही. त्यासंबंधीचेच माहिती या लेखात आपण थोडक्यात बघू.
या ठिकाणी पैसा खर्च कराल तर आयुष्यात पैसा कमी नाही पडणार
1- मुलांचे शिक्षण- आचार्य चाणक्यांच्या मते जर बघितले तर त्यानुसार मुलांचे शिक्षणावर कधीही पैसा खर्च करताना जास्त विचार करता कामा नये. शिक्षणावर तुम्ही किती पैसा खर्च केला तर तो वाया जात नाही
व या माध्यमातून भविष्यात तुम्हाला दुप्पट पैसे मिळण्याची शक्यता असते व मुलांना चांगलं शिक्षण मिळते व अनेक नवनवीन गोष्टी ते शिकतात व याचा फायदा आयुष्यात आपल्याला देखील होतो.
2- गरिबांना मदत- चाणक्यांच्या मते जर बघितले तर ते सांगतात की नेहमीच गरीब लोकांची मदत करायला पुढे असावे. स्वतःसाठी आणि कुटुंबाकरिता पैसा हा कमवावा लागतोच व ते वाईट नाही.
परंतु त्या पैशाचा वापर योग्य ठिकाणी करणे खूप गरजेचे आहे. तुमच्याकडे जर पैसा असेल तर समाजातील कमजोर आणि गरिबांची मदत करावी असे ते म्हणतात.
3- समाजसेवा- आचार्य चाणक्य असे म्हणतात की, तुमचे जे काही उत्पन्न आहे त्यातील काही वाटा तुम्ही समाज कार्यासाठी देखील बाजूला जोडणे गरजेचे आहे.
त्यांच्या मते तुम्ही एखाद्या शाळेत किंवा हॉस्पिटल सारख्या संस्थांमध्ये देखील पैसे दान स्वरूपात देऊ शकतात. असे केल्यामुळे त्याचे पुण्य तुम्हाला मिळते व तुमची आणखी प्रगती होते व तुमचा मानसन्मान देखील वाढीस लागतो.
4- आजारपणात मदत- चाणक्यांच्या मते जर एखादी व्यक्ती आजारी असेल तर असे आजारी व्यक्तीची मदत करताना कधीही मागेपुढे पाहू नये. जे काही आर्थिक सामर्थ्य असेल त्यानुसार तुम्ही समोरच्याची मदत करू शकता.
तुमच्या एका मदतीने व्यक्तीला खूप मोठा दिलासा मिळू शकतो व त्यामुळे देवाची नेहमी तुमच्यावर कृपा राहील असे ते म्हणतात.
5- धार्मिक गोष्टींना किंवा स्थळांना दान करणे- आचार्य चाणक्य यांच्या मते तुम्ही धार्मिक स्थळाला दान देताना कंजूषणा करू नये. त्यांच्या मते तुम्ही जर एखाद्या ट्रस्ट किंवा मंदिराला दान केले तर त्यामुळे जीवनात सकारात्मकता वाढीस लागते व त्याचा फायदा तुम्हाला होतो. त्यामुळे दान करत राहणे खूप गरजेचे आहे.
( टीप- वरील माहिती वाचकांसाठी माहितीस्तव सादर केली आहे. या माहिती विषयी अहमदनगर लाईव्ह 24 कुठल्याही प्रकारचा दावा करत नाही किंवा या माहितीचे समर्थन करत नाही.)