घारगाव : विहिरीत पडून नऊ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि. ६) दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास संगमनेरातील खंदरमाळवाडी शिवारातील करंजेकर मळा येथे घडली.
याप्रकरणी घारगाव पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. श्रीराज बाळू लेंडे असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, श्रीराज त्यांच्या विहिरीत पाय घसरून पडला.
त्यानंतर ग्रामस्थ व नातेवाइकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.
त्यास विहिरीतून बाहेर काढून खासगी रुग्णवाहिकेतून घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यास मृत घोषित केले.