Upcoming IPO:- काही दिवसापासून शेअर मार्केटमध्ये घसरणीचे सत्र जरी सुरू असले तरी मात्र या कालावधीत देखील अनेक नवनवीन कंपन्यांचे आयपीओ मात्र लॉन्च केले जात आहेत व काही आगामी कालावधीत लॉन्च केले जाणार आहेत. आयपीओमध्ये गुंतवणुकीच्या अनेक संधी सध्या गुंतवणूकदारांना उपलब्ध झाल्या आहेत
व अशीच एक नामी संधी गुंतवणूकदारांना चालून आली आहे. कारण काबरा ज्वेलर्स लिमिटेड कंपनीचा आयपीओ बाजारात लॉन्च होणार असून हा आयपीओ 15 ते 17 जानेवारी दरम्यान सबस्क्रिप्शनसाठी खुला असणार आहे. विशेष म्हणजे काबरा ज्वेलर्स लिमिटेड कंपनीने या आयपीओ शेअरकरिता 128 रुपये प्राईस बँड निश्चित केला आहे.
काबरा ज्वेलर्स लिमिटेडचा शेअर खुला होण्यापूर्वीच आहे तेजीत
जसे आपण बघितले की, काबरा ज्वेलर्स लिमिटेड कंपनी आयपीओ 15 ते 17 जानेवारी दरम्यान खुला होणार आहे. परंतु त्या अगोदरच मात्र हा शेअर ग्रे-मार्केटमध्ये जबरदस्त तेजीत असल्याचे दिसून येत आहे
ग्रे-मार्केटमध्ये हा शेअर 39 टक्क्यांपेक्षा जास्त प्रिमियमवर सध्या ट्रेड करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार,काबरा ज्वेलर्स लिमिटेड कंपनी लॉन्च करत असलेल्या या आयपीओच्या माध्यमातून चाळीस कोटी रुपयांचा निधी उभारणार असल्याची माहिती समोर आली आहे.
178 रुपयांच्या आसपास लिस्ट होण्याची आहे शक्यता
आगामी लाँच होऊ घातलेला काबरा ज्वेलर्स लिमिटेड कंपनी आयपीओ शेअरची प्राईस बँड 128 रुपये आहे व ग्रे-मार्केटमध्ये काबरा ज्वेलर्स लिमिटेड कंपनीचे शेअर मात्र आधीच पन्नास रुपयांच्या प्रीमियमवर ट्रेड करत आहेत. यानुसार जर बघितले तर सध्याच्या जीएमपीनुसार कंपनीचे शेअर 178 रुपयांच्या जवळपास मार्केटमध्ये लिस्ट होऊ शकतील अशी शक्यता आहे.
याचा सरळ अर्थ असा होतो की, गुंतवणूकदारांना हा शेअर लिस्ट होण्याच्या दिवशी 39 टक्क्यांपेक्षा जास्तीचा परतावा देईल अशी एक शक्यता आहे. काबरा ज्वेलर्स लिमिटेड कंपनीचे शेअर 22 जानेवारी 2025 रोजी एनएसई एसएमइ प्लेटफार्मवर लिस्ट होणार आहेत.
गुंतवणूकदारांना एक लॉटसाठी लावता येईल बोली
या आयपीओमध्ये रिटेल गुंतवणूकदार एक लॉटसाठी बोली लावू शकतात व त्यामध्ये 1000 शेअर्स मिळतील. म्हणजेच रिटेल गुंतवणूकदारांना एका लॉटकरिता एक लाख 28 हजार रुपयांची गुंतवणूक यामध्ये करावी लागणार आहे.
काबरा ज्वेलर्स लिमिटेड कंपनी काय करते?
काबरा ज्वेलर्स लिमिटेड कंपनीची स्थापना 2010 मध्ये झाली व या कंपनीचा व्यवसाय बघितला तर ती किरकोळ दागिन्यांच्या व्यवसायामध्ये आहे. म्हणजेच सोने, हिरे आणि चांदीच्या दागिन्यांचे मोठे कलेक्शन ही कंपनी ऑफर करते. अहमदाबादमध्ये या कंपनीचे जवळपास 6 शोरूम आहेत.