१५ जानेवारी २०२५ नवी दिल्ली : नवी दिल्ली येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, दिल्लीत आम आदमी पक्षाचा आलेख दिवसेंदिवस वर चढत आहे.आम्हाला मतदारांचा पाठिंबा मिळत असून पुन्हा एकदा स्पष्ट बहुमत मिळणार आहे.दुसरीकडे,आप ला आव्हान देण्यासाठी भाजपकडे दूरदृष्टी व नेतृत्वाचा अभाव आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपने हातमिळवणी केली आहे,असा आरोप आम आदमी पक्षाचे (आप) प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी केला.काँग्रेस व भाजपमधील जुगलबंदी उजागर झाली आहे.
मी जेव्हा राहुल गांधी यांच्याविषयी बोलतो तेव्हा भाजप उत्तर देते.यावरून दोघेही एकाच माळेचे मणी असल्याचे सिद्ध होत असल्याचा प्रहार त्यांनी केला.दिल्लीत मतदारांना प्रलोभन दाखवण्यासाठी भाजपकडून पैसे व सोनसाखळीचे वाटप सुरू असल्याचा आरोप केजरीवालांनी केला.
भाजपने आतापासूनच पराभव स्वीकारला आहे.भाजपकडे मुख्यमंत्री पदाचा चेहरा सुद्धा नाही,असा टोला त्यांनी लगावला.यंदाच्या निवडणुकीत भाजपने चुकीचा हातखंडा अमलात आणायला सुरुवात केली आहे.मत विकत घेण्यासाठी जॅकेट, बूट, साड्या व धन आणि एवढेच नव्हे तर सोनसाखळी सुद्धा वाटली जात आहे. दोन वसाहतीत भाजपच्या नेत्यांनी मतदारांना सोनसाखळी वाटल्या आहेत.
आम्ही जनतेचे मत विकत घेण्यासाठी हे सर्व करीत असल्याची कबुली त्यांचे नेते देत आहेत. पण जर आपच्या उमेदवाराने पैसे वाटल्याचे समजले तर त्या उमेदवाराला मतदान करू नका, असे केजरीवाल म्हणाले. जशीजशी निवडणूक जवळ येत आहे तसतसा आपचे बहुमतासह स्थिर सरकार बनणार असल्याचा दावा केजरीवाल यांनी केला