Post Office RD Scheme:- ज्या गुंतवणूकदारांना गुंतवणूक सुरक्षित ठिकाणी गुंतवायची असते आणि चांगला परतावा मिळवायचा असतो असे गुंतवणूकदार खास करून पोस्ट ऑफिसच्या योजनांना प्राधान्य देताना आपल्याला दिसून येतात. पोस्ट ऑफिसच्या अनेक छोट्या बचत योजना आहेत.
तसेच पोस्टाची फिक्स डिपॉझिट म्हणजे एफडी योजना व आवर्ती ठेव म्हणजेच आरडी योजना देखील तितकीच फायद्याची आहे.गेल्या काही वर्षांपासून बघितले तर पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून अनेक उत्तम अशा योजना सादर करण्यात आल्या असून गुंतवणूकदारांमध्ये देखील त्या विशेष लोकप्रिय आहेत.
यामध्ये जर आपण पोस्ट ऑफिसची आरडी योजना बघितली तर ही एक महत्वाची अशी योजना असून या योजनेमध्ये गुंतवणूक केल्यावर चांगला परतावा गुंतवणूकदारांना मिळतो.
कशी आहे पोस्ट ऑफिसची आरडी योजना?
पोस्टाच्या आवर्ती ठेव म्हणजेच आरडी योजनेमध्ये जर तुम्हाला खाते उघडायचे असेल तर कुठल्याही भारतीय नागरिकाला ते उघडता येते. तसेच तुम्ही या योजनेमध्ये 100 रुपयांपासून ते दोन हजार रुपयांची छोटीशी रक्कम देखील नियमितपणे गुंतवू शकतात व एक चांगला फंड उभा करू शकतात.
गुंतवणूकदार त्यांच्या आर्थिक खर्चानुसार एक ठराविक रक्कम यामध्ये गुंतवू शकतात. पोस्टाच्या आरडी योजनेमध्ये जर गुंतवणूक सुरू केली तर त्यावर तुम्हाला वार्षिक 6.70% इतका व्याजदर मिळतो व या योजनेचा कार्यकाळ पाच वर्षाचा आहे व पहिल्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये देखील तुम्ही चांगला पैसा मिळवू शकतात.
महिन्याला किती रुपये गुंतवले तर किती परतावा मिळेल?
1- महिन्याला पाचशे रुपयांची गुंतवणूक- एखाद्या गुंतवणूकदाराने पोस्ट ऑफिसच्या आरडी योजनेमध्ये महिन्याला पाचशे रुपयांची गुंतवणूक सुरू केली तर पाच वर्षाच्या कालावधीत 30 हजार रुपये जमा होतात व या रकमेवर 6.70% वार्षिक व्याजदर मिळाला तर ही रक्कम 35 हजार 681 रुपये होते. म्हणजेच तुम्हाला 5,681 रुपये यावर व्याज मिळते.
2- महिन्याला एक हजार रुपयांची गुंतवणूक- पोस्टाच्या आवर्ती ठेव म्हणजेच आरडी योजनेमध्ये तुम्ही महिन्याला 1000 रुपयांची गुंतवणूक सुरू केली तर पाच वर्षात तुमची मुद्दल आणि व्याज मिळून तुम्हाला 71369 रुपये मिळतात.
3- महिना दोन हजार रुपयांची गुंतवणूक- तसेच महिन्याला दोन हजार रुपयांची गुंतवणूक तुम्ही पोस्ट ऑफिसच्या आरडी योजनेत सुरू केली तर पाच वर्षांमध्ये तुम्हाला व्याज आणि मुद्दल मिळून एक लाख 42 हजार 732 परत मिळतात.
4- महिन्याला दहा हजार रुपयांची गुंतवणूक- समजा तुम्ही पोस्टाच्या आरडी योजनेमध्ये महिन्याला दहा हजार रुपयांची गुंतवणूक करत गेला तर पाच वर्षाच्या कालावधीत गुंतवणूकदाराला व्याज आणि मुद्दल मिळून सात लाख 13 हजार 659 रुपये मिळतात.