कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 8 वा वेतन आयोग पगारात किती वाढ करेल ?

केंद्रीय कर्मचाऱ्यांना आठव्या वेतन आयोगाच्या घोषणेची प्रतिक्षा कित्येक दिवसापासून होती व अखेर सरकारने 16 जानेवारी रोजी आठवा वेतन आयोग स्थापन करण्याला मंजुरी दिली व त्यासंबंधीची घोषणा देखील करण्यात आली.त्यामुळे आता जेव्हापासून आठव्या वेतन आयोगाच्या शिफारसी लागू होतील त्यानंतर देशातील जवळपास 1.20 कोटी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना खूप मोठ्या प्रमाणावर याचा फायदा होणार आहे.

Ratnakar Ashok Patil
Published:
8th pay commission

8th Pay Commission:- केंद्रीय कर्मचाऱ्यांना आठव्या वेतन आयोगाच्या घोषणेची प्रतिक्षा कित्येक दिवसापासून होती व अखेर सरकारने 16 जानेवारी रोजी आठवा वेतन आयोग स्थापन करण्याला मंजुरी दिली व त्यासंबंधीची घोषणा देखील करण्यात आली.त्यामुळे आता जेव्हापासून आठव्या वेतन आयोगाच्या शिफारसी लागू होतील त्यानंतर देशातील जवळपास 1.20 कोटी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना खूप मोठ्या प्रमाणावर याचा फायदा होणार आहे.

आता सध्या कर्मचाऱ्यांना जे काही वेतन तसेच महागाई भत्ता व इतर भत्ते मिळत आहेत ते सातव्या वेतन आयोगाच्या अंतर्गत मिळत आहेत. परंतु आठवा वेतन आयोग स्थापन झाल्यानंतर व त्याच्या तरतुदी लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि पेन्शनमध्ये वाढ होणार आहे.

त्यामुळे साहजिकच पेन्शनधारक आणि कर्मचाऱ्यांना उत्सुकता लागून राहिली असेल की आता आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर पगार किती वाढेल आणि पेन्शनमध्ये किती वाढ होईल? त्याबद्दलचीच माहिती थोडक्यात आपण बघणार आहोत.

फिटमेंट फॅक्टर ठरेल महत्वाचा
फिटमेंट फॅक्टर हा कर्मचाऱ्यांच्या पगार आणि पेन्शन निश्चितीमध्ये एक महत्त्वाचा घटक असून कर्मचाऱ्यांचे जुने जे मूळ वेतन असते त्या वेतनाचे नव्या वेतन श्रेणीमध्ये रूपांतर करण्यासाठी प्रामुख्याने फिटमेंट फॅक्टरचा नियम लागू करण्यात आला आहे.

सध्या सुरू असलेल्या सातव्या वेतन आयोग अंतर्गत जर बघितले तर फिटमेंट फॅक्टर 2.57 इतका होता व त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात 23 ते 25 टक्क्यांची वाढ झालेली होती.आता आठवा वेतन आयोग स्थापन झाल्यानंतर फिटमेंट फॅक्टर 2.86% निश्चित केला तर वेतनामध्ये आणखीन मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

अशा पद्धतीचे होऊ शकते पगारवाढ
जर फिटमेंट फॅक्टर 2.86% निश्चित केला गेला तर कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन सध्या असलेल्या 18000 रुपयांवरून 51,480 रुपयापर्यंत वाढण्याची शक्यता आहे. उदाहरणाने आपण हे समजून घेतले तर समजा एखाद्या कर्मचाऱ्याचा सध्याचा मूळ पगार 40 हजार रुपये आहे आणि फिटमेंट फॅक्टर 2.86 असेल तर त्याचे नवीन मूळ वेतन हे एक लाख 14 हजार चारशे रुपये असेल.

याव्यतिरिक्त एकूण वेतनामध्ये महागाई भत्ता, घरभाडे भत्ता तसेच प्रवास भत्ता व इतर भत्त्यांचा देखील यामध्ये समावेश केला जातो. म्हणजेच एकूण वेतनातील टक्केवारी वाढ किमान मूलभूत वेतन इतकी नसते.

म्हणजेच 2.86 चा अंदाजे फिटमेंट फॅक्टर मंजूर झाला तरी सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपूर्ण पगारात तेवढी वाढ होईल असा त्याचा अर्थ होत नाही.

सातवा वेतन आयोग लागू केल्यानंतर पगारामध्ये किती फरक पडला होता?
जेव्हा सातवा वेतन आयोग स्थापन करण्यात आला होता तेव्हा त्याच्या शिफारसी 1 जानेवारी 2016 पासून लागू करण्यात आल्या व तेव्हा फिटमेंट फॅक्टर 2.57 होता. त्यामुळे केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या किमान मूळ वेतनात सात हजार रुपयांवरून तब्बल 18000 रुपये वाढ झाली होती.

आता आठवा वेतन आयोग लागू झाल्यामुळे फिटमेंट फॅक्टर 2.86% जाईल अशी शक्यता आहे व त्यामुळे किमान मूळ वेतन 51,480 रुपयापर्यंत वाढेल अशी एक शक्यता आहे. सातव्या वेतन आयोगात एकूण वेतनवाढ 23 ते 25% झाली होती व तेव्हा फिटमेंट फॅक्टर 2.57 होता व आता आठवा वेतन आयोगा अंतर्गत एकूण 25 ते 30 टक्के पगारवाढ होईल अशी एक शक्यता आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe