Kotak Emerging Equity Fund:- अलीकडच्या कालावधीमध्ये आपल्याला शेअर मार्केट आणि त्यासोबतच म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक वाढताना दिसून येत आहे. म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक ही बाजाराशी निगडित असल्यामुळे काही प्रमाणामध्ये यात जोखीम असते. परंतु प्रत्यक्षात शेअर मार्केटमध्ये केलेल्या गुंतवणुकीच्या तुलनेत ही जोखीम कमी असते.
म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीवर मिळणारा परतावा जर बघितला तर तो तज्ञांच्या मते साधारणपणे 12 ते 15 टक्क्यांच्या आसपास मिळतो व त्यामुळे चांगला निधी या माध्यमातून जमा होऊ शकतो. म्युच्युअल फंडांमध्ये जर आपण कोटक एमर्जिंग इक्विटी फंड बघितला तर सध्या हा खूप चर्चेत आहे.
30 मार्च 2017 रोजी सुरू झालेल्या या फंडाने अगदी सुरुवातीपासून चांगली कामगिरी केली असून 21 टक्क्यांपर्यंत चक्रवाढ परतावा गुंतवणूकदारांना दिला आहे. इतकेच नाही तर या फंडाला चार स्टार रेटिंग मिळाले आहे.
कोटक एमर्जिंग इक्विटी फंडात एसआयपी गुंतवणुकीने किती दिला परतावा?
समजा एखाद्या गुंतवणूकदाराने जर कोटक एमर्जिंग इक्विटी फंडामध्ये प्रत्येक महिन्याला दहा हजार रुपयांची एसआयपी दहा वर्षे केली असती तर अशा गुंतवणूकदारांना या फंडातून 21.2% वार्षिक परतावा मिळाला आहे.
प्रति महिना दहा हजार रुपये प्रमाणे एसआयपी केल्यानंतर दहा वर्षातील एकूण गुंतवणूक यामध्ये 12 लाख रुपये होते व पाच वर्षानंतर या एसआयपीचे मूल्य तब्बल 3,673,285 रुपये इतके झाले.
एकरकमी गुंतवणुकीवर किती दिला परतावा?
कोटक एमर्जिंग इक्विटी फंडामध्ये जर एकरकमी एक लाख रुपये दहा वर्षांकरिता जर गुंतवले व या दहा वर्षावरील एकरकमी गुंतवणुकीवर 18.28 टक्क्यांचा वार्षिक परतावा मिळाला.
यानुसार दहा वर्षानंतर एक लाख रुपये एकरकमी गुंतवणुकीचे मूल्य 5.36 लाख रुपये इतके झाले. सध्या कोटक एमर्जिंग इक्विटी फंडाची एकूण मालमत्ता 30 नोव्हेंबर 2024 रोजी 52 हजार 49 कोटी रुपये इतकी होती व या फंडाचे खर्च-गुणोत्तर 1.42% हे 30 नोव्हेंबर 2024 रोजी होते.