SBI Mutual Fund:- गेल्या काही वर्षांपासून गुंतवणूकदारांचा कल हा म्युच्युअल फंड योजनांकडे वाढताना दिसून येत आहे व या म्युच्युअल फंड योजनांमध्ये एसआयपीच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला एक निश्चित रक्कम जमा करून गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळाला आहे तर एकरकमी गुंतवणुकीतून देखील बऱ्याच म्युच्युअल फंड योजनांनी गुंतवणूकदारांना भरघोस असा परतावा दिला आहे.
सध्याच्या घडीला अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या म्युच्युअल फंड योजना आपल्याला दिसून येतात व यामध्ये जर आपण स्टेट बँक ऑफ इंडियाची म्हणजेच एसबीआयची म्युच्युअल फंड योजना बघितली तर ही एक भन्नाट अशी योजना असून या योजनेने गुंतवणूकदारांचे पैसे पाच वर्षात तब्बल चौपट वाढवलेले आहेत.
समजा एखाद्या गुंतवणूकदाराने जर पाच वर्ष कालावधीसाठी एक लाख रुपयांची गुंतवणूक या योजनेत केली असती तर त्या एक लाखाचे चार लाख रुपये या एसबीआयच्या म्युच्युअल फंड योजनेत बनले आहेत. तसेच दोन लाखाची गुंतवणूक पाच वर्षासाठी केली असती तर तब्बल आठ लाख रुपये गुंतवणूकदाराला मिळाले असते. याच म्युच्युअल फंड योजनेची माहिती या लेखात बघू.
एसबीआयची हेल्थकेअर अपॉर्च्युनिटीज फंड योजना आहे भन्नाट
एसबीआयचा हेल्थकेअर ऑपॉर्च्युनिटी फंड गुंतवणूकदारांसाठी खूप फायद्याचा आणि मजबूत परतावा देणारा असून गुंतवणूकदारांमध्ये अतिशय लोकप्रिय आहे.
बरेच गुंतवणूकदार एसबीआयच्या हेल्थकेअर अपॉर्च्युनिटीज फंडाला प्राधान्य देत असून या फंडामध्ये पाच वर्षासाठी गुंतवलेली एक लाख रुपयांची रक्कम चार लाख रुपये पर्यंत झाली आहे.
एक लाखाचे पाच वर्षात झाले चार लाख
एसबीआय हेल्थकेअर ऑपॉर्च्युनिटीज फंडाने गुंतवणूकदारांना दिलेला परतावा जर बघितला तर या म्युच्युअल फंड योजनेत एखाद्या गुंतवणूकदाराने पाच वर्षांपूर्वी एक लाख रुपयांची रक्कम गुंतवली असती तर सध्या त्याचे व्हॅल्युएशन चार लाख रुपयापर्यंत झाले असते.
दुसरे महत्त्वाचे म्हणजे या एसबीआय हेल्थकेअर ऑपॉर्च्युनिटीज फंडामध्ये एखाद्या गुंतवणूकदाराने पाच वर्षांसाठी दहा हजार रुपये प्रत्येक महिन्याला एसआयपी करून गुंतवणूक केली असती तर त्या एसआयपीचे आज मूल्य बारा लाख रुपयापेक्षा जास्त झाले असते. तसेच गुंतवणूकदारांनी एक लाख रुपयांच्या रकमेची गुंतवणूक केली असती तर पुढील पाच वर्षांमध्ये सरासरी वार्षिक परतावा 32.90% मिळाला असता.
म्हणजेच तुम्ही गुंतवलेल्या एक लाख रुपयाचे मूल्य चार लाख 14 हजार 596 रुपये झाले असते व चार लाख पेक्षा तुम्हाला अधिक रक्कम मिळाली असती व पुढील पाच वर्षांकरिता प्रत्येक महिन्याला दहा हजार रुपये प्रमाणे एसआयपीचे गुंतवणूक मूल्य 12 लाख 80 हजार रुपये झाले असते.
एसबीआयची हेल्थकेअर अपॉर्च्युनिटी फंड योजना ही मोठ्या प्रमाणावर हेल्थकेअर कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करतात व त्यासोबतच फार्मास्युटिकल कंपन्यांमध्ये देखील या फंडाचे गुंतवणूक आहे व या गुंतवणुकीच्या माध्यमातून एसबीआय हेल्थकेअर अपॉर्च्युनिटीज फंडाच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळतो.