पक्षातील फुटीरवाद्यांना योग्य वेळी जागा दाखवणार

२५ जानेवारी २०२५ मुंबई : सध्या पक्षात काही राहिलेले नाही,असे सांगणारे काही फुटीरवादी आहेत.सर्वांची माहिती माझ्याकडे आहे.पक्षात राहून फुटीरपणा करणाऱ्यांना पुन्हा थारा देणार नाही.योग्य वेळी त्यांना जागा दाखवणार,असा सूचक इशारा शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना दिला.

तसेच सोबत निष्ठावंत असलेल्यांनी शिवसेनेची (ठाकरे) हिंदुत्वाची भूमिका तळागाळातील लोकांपर्यंत न्या, असे आवाहन केले.दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त उद्धव ठाकरे यांनी अंधेरीत भव्य मेळावा घेऊन स्वबळाची भूमिका घेणार असल्याचे संकेत दिले.

पार्श्वभूमीवर शुक्रवारी शिवसेना भवन येथे पक्ष प्रमुखांनी राज्यपातळीवरून सर्वांची मते विचारात घेण्यासाठी पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली.राज्यभरातील जिल्हाप्रमुख व संपर्क प्रमुख या बैठकीला उपस्थित होते.

संविधान व भारतमातेची राज्यभर मिरवणूक काढणार

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या वतीने २५ जानेवारी रोजी रात्री ८ वाजता मुंबईसह तालुका पातळीवर, प्रत्येक जिल्ह्यांमध्ये मुंबईसह राज्यभरात संविधान आणि भारतमातेच्या संरक्षणासाठी पूजन व मिरवणूक काढण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन मुंबईत शिवसेना भवन येथे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत करण्यात आल्याची माहिती ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe