‘तुम्ही मरा आता,’ असे म्हणत चालकाने मारली उडी : महसूल विभागाचे अधिकारी थोडक्यात वाचले !

Sushant Kulkarni
Published:

३० जानेवारी २०२५ अहिल्यानगर : अवैध वाळू तस्करी रोखण्यासाठी मातुलठाण येथे गोदावरी नदीपात्रात गेलेल्या महसूल विभागाच्या पथकावर वाळूतस्करांनी गोंडेगाव परिसरात दगडफेक केल्याची घटना बुधवारी पहाटे घडली. गौन खनिज भरारी पथक तहसीलदारांच्या आदेशानुसार कारवाईसाठी गेले होते.या हल्ल्यात पथकाच्या वाहनाचे नुकसान झाले आहे.

याबाबत पोलीस सूत्रांनी सांगितले, की बुधवारी (दि. २९) पहाटे ही घटना घडली, तर दुपारी ११ वाजेच्या सुमारास याप्रकरणी तालुक्यातील उंबरगाव येथील ग्राम महसुल अधिकारी अशोक रामचंद्र थोरात यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली किसन जाधव (रा. शिरसगाव), विकी जयराम लुंड (रा. टाकळीभान), महेश सुरेश साठे, गणेश ज्ञानेश्वर सातपुते (रा. तिनवाडी, हरेगाव), कुणाल (पुर्ण नाव माहित नाही), बबन जाधव (रा.शिरसगाव), ज्ञानदेव साळुंके (डंपर चालक), विशाल अशोक बेहरे (डंपर चालक) यांच्यासह इतर ३० ते ३५ अनोळखी इसमांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

या कारवाई दरम्यान महसूल अधिकारी अशोक थोरात व सुरेंद्र पवार डंपरमध्ये बसलेले असताना गोंडेगाव ते खैरी निमगाव रस्त्यावरील वीस नंबर चारीजवळ डंपर आला असता त्यात बसलेले थोरात व पवार यांना चालक ज्ञानदेव साळुंके याने’तुम्ही मरा आता,’ असे म्हणून त्याने या डंपर मधून उडी मारुन पळुन गेला.

त्यानंतर सदरचा डंपर या चारीत उलटला त्यामुळे आत बसलेले अधिकारी जखमी झाले.पोलिसांनी घटनास्थळावरून विना नंबरचा विटकरी रंगाचा वाळु भरलेला डंपर (एमएच १६ टी ९७८६) जप्त केला आहे.

अपर पोलीस अधिक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे, पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी सकाळी घटनास्थळाची पाहाणी करून माहिती घेतली.पहाटे दीड वाजेच्या सुमारास महसूलच्या भरारी पथकाला विना नंबरचा विटकरी रंगाचा वाळु भरलेला डंपर (एमएच १६ टी ९७८६) अवैधरीत्या वाळु वाहतुक करताना मातुलठाण ते नायगाव रस्त्यावर आढळुन आला.त्यामुळे अधिकारी कायदेशीर कारवाई करीत असतांना आरोपींनी संगनमत करुन दगडफेक केली.याबाबत पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मुरकुटे करीत आहेत

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe