मुथय्या मुरलीधरन आणि मुकेश अंबानी यांची गुप्त डील उघड! Spinner ने मार्केटमध्ये निर्माण केली सनसनाटी

रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी आता केवळ क्रिकेट सामन्यांच्या प्रसारण हक्कांपुरते मर्यादित न राहता स्पोर्ट्स ड्रिंक व्यवसायातही मोठी झेप घेण्याच्या तयारीत आहेत. यासाठी त्यांनी श्रीलंकेचे दिग्गज फिरकीपटू मुथय्या मुरलीधरन यांच्यासोबत भागीदारी केली आहे.

Published on -

Spinner Drink:- रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी आता केवळ क्रिकेट सामन्यांच्या प्रसारण हक्कांपुरते मर्यादित न राहता स्पोर्ट्स ड्रिंक व्यवसायातही मोठी झेप घेण्याच्या तयारीत आहेत. यासाठी त्यांनी श्रीलंकेचे दिग्गज फिरकीपटू मुथय्या मुरलीधरन यांच्यासोबत भागीदारी केली आहे. या नव्या उपक्रमांतर्गत “स्पिनर” नावाने नवे स्पोर्ट्स ड्रिंक बाजारात आणले जात असून ज्याची किंमत अवघी १० रुपये ठेवण्यात आली आहे.

अंबानींचा नवा मास्टरस्ट्रोक

रिलायन्सच्या RCPL कंपनीने मुथय्या मुरलीधरनसोबत मोठी भागीदारी केली असून स्पिनर हे स्पोर्ट्स ड्रिंक लाँच करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे गेटोरेड आणि पावरेड यांसारख्या आघाडीच्या ब्रँड्सच्या तुलनेत या ड्रिंकची किंमत अर्ध्या दरात ठेवण्यात आली आहे, त्यामुळे स्पर्धक कंपन्यांना मोठे आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे.

स्पिनर – नावामागील भन्नाट कल्पना!

“स्पिनर” हे नाव निवडण्यात आले स्पिन गोलंदाजांच्या लोकप्रियतेला अनुसरून. अनिल कुंबळे, शेन वॉर्न आणि मुथय्या मुरलीधरन यांसारख्या फिरकीपटूंचा क्रिकेटमधील प्रभाव पाहता या नावाने क्रिकेटप्रेमी आणि खेळाडूंचे लक्ष वेधले जाण्याची शक्यता आहे.

मुथय्या मुरलीधरनच्या फॅक्टरीत उत्पादन सुरू!

मुरलीधरन यांची कर्नाटकमधील म्हैसूर येथे स्वतःची बेव्हरेज फॅक्टरी आहे. याच फॅक्टरीत आता स्पिनरचे उत्पादन व पॅकिंग सुरू झाले आहे. विशेष म्हणजे कॅम्पा कोला ब्रँडच्या उत्पादनासाठीही हीच फॅक्टरी वापरली जाते.

रिलायन्सचा आणखी एक मोठा निर्णय

या व्यवसायाला वेग देण्यासाठी अंबानींनी नुकतीच SIL ही कंपनी ताब्यात घेतली आहे त्यामुळे उत्पादन साखळी आणखी मजबूत होणार आहे.

स्पिनर ड्रिंक कधी लाँच होणार?

“स्पिनर” लवकरच बाजारात उपलब्ध होणार असून याचा उद्देश भारतीय खेळाडू आणि सामान्य ग्राहकांसाठी परवडणारे स्पोर्ट्स ड्रिंक सुलभ करणे हा आहे. या निर्णयामुळे रिलायन्सच्या FMCG व्यवसायाला जबरदस्त चालना मिळण्याची शक्यता आहे.या नव्या स्पर्धेत अंबानी आणि मुरलीधरन यांचे हे कॉम्बिनेशन FMCG क्षेत्रात मोठा गेम चेंजर ठरू शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!