OnePlus चा जबरदस्त स्मार्टफोन 5000 mAh बॅटरी,आणि 100W फास्टचार्जिंग…

भारतीय स्मार्टफोन बाजारात OnePlus कंपनीने एक आणखी दमदार स्मार्टफोन लाँच केला आहे. OnePlus 11R 5G हा नवीन स्मार्टफोन प्रीमियम डिझाइन आणि शक्तिशाली वैशिष्ट्यांसह उपलब्ध आहे. जर तुम्ही उत्कृष्ट कॅमेरा, उच्च स्पीड प्रोसेसिंग, आणि जलद चार्जिंग होणाऱ्या फोनच्या शोधात असाल तर हा स्मार्टफोन तुमच्यासाठी एक आदर्श पर्याय असू शकतो.

Ratnakar Ashok Patil
Published:

OnePlus 11R 5G Smartphone :- भारतीय स्मार्टफोन बाजारात OnePlus 11R 5G हा नवीन स्मार्टफोन प्रीमियम डिझाइन आणि पॉवरफुल फीचर्ससह उपलब्ध आहे. जर तुम्ही उत्कृष्ट कॅमेरा, उच्च स्पीड प्रोसेसिंग, आणि जलद चार्जिंग होणाऱ्या फोनच्या शोधात असाल तर हा स्मार्टफोन तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय असू शकतो.

OnePlus 11R 5G मध्ये तुम्हाला स्नॅपड्रॅगन 8+ जनरेशन 1 प्रोसेसर, 120 हर्ट्झ रिफ्रेश रेटसह सुपर AMOLED डिस्प्ले आणि 50 मेगापिक्सेल ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप मिळेल, याचे महत्त्वाचे फिचर म्हणजे त्याची 5000mAh बॅटरी, जी 100W SUPER VOOC फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. यामुळे फोन फक्त 19 मिनिटांत 100% चार्ज होऊ शकतो. ज्यामुळे हा स्मार्टफोन युजर्सला बॅटरी संपण्याच टेन्शन राहणार नाही.

फोनचा डिस्प्ले
OnePlus 11R मध्ये 6.7 इंचाचा सुपर AMOLED डिस्प्ले आहे. जो 120 हर्ट्झ रिफ्रेश रेटसह येतो. हा डिस्प्ले FHD+ रिझोल्यूशन आणि 1450 निट्स ब्राइटनेससह असून ज्यामुळे तुमचं व्हिडीओ आणि गेमिंग अनुभव अत्यंत आनंददायी होईल. यामध्ये ADFR 2.0 तंत्रज्ञान देखील असून जे पावर सेव्हिंगसाठी रिफ्रेश रेटला 40 Hz, 45Hz, ९90Hz आणि 120 Hz दरम्यान स्विच करतो.

क्वालिटी कॅमेरा
OnePlus 11R च्या रिअर कॅमेरा सेटअपमध्ये 50 मेगापिक्सेल सोनी IMX890 प्रायमरी सेन्सर असून जो ऑप्टिकल इमेज स्टेबिलायझेशनसह येतो. यामध्ये 8 मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सेल मॅक्रो लेन्स देखील आहे. ज्यामुळे विविध प्रकारच्या फोटो आणि व्हिडीओ सहजपणे काढता येतात. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 16 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे.

प्रोसेसिंग आणि स्टोरेज
हा स्मार्टफोन Qualcomm स्नॅपड्रॅगन 8+ जनरेशन 1 चिपसेटसह सुसज्ज असून जो एक अत्यंत जलद आणि शक्तिशाली प्रोसेसिंग अनुभव देतो. OnePlus 11R 5G दोन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असून त्यातील पहिला म्हणजे 8GB रॅम आणि 128 GB स्टोरेज असलेला आणि दुसरे व्हेरियंट म्हणजे16 GB रॅम आणि 256 GB स्टोरेज असलेले आहे. त्यामुळे तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात डेटा स्टोअर करण्याची सोय मिळते.

बॅटरी आणि चार्जिंग
OnePlus 11R 5G मध्ये 5000 mAh बॅटरी दिली असून जी 100 W SUPER VOOC फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कंपनीचा दावा आहे की ही बॅटरी केवळ 19 मिनिटांत 100 चार्ज होऊ शकते. त्यामुळे तुम्हाला दीर्घ काळ वापरासाठी त्वरित चार्जिंग मिळते. ज्यामुळे तुम्ही दिवसभर विना टेन्शन स्मार्टफोन वापरू शकता.

कुठे खरेदी करता येईल?
हा स्मार्टफोन Amazon.in, OnePlus.in आणि OnePlus Experience Stores वर खरेदीसाठी उपलब्ध आहे. लाँच ऑफर्समध्ये सिटीबँक क्रेडिट कार्ड वापरून ईएमआयच्या व्यवहारांवर 1000 ची त्वरित सूट मिळवता येईल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe