Mutual Fund SIP: पैसे कसे गुंतवाल की… 3 ते 4 वर्षात 50 लाखांचे मालक व्हाल? इथे पहा!

आजकाल अनेक गुंतवणूकदार शेअर बाजारातील वाढत्या संधींचा लाभ घेत आहेत. मात्र जोखीम मर्यादित ठेवत चांगला परतावा मिळवण्याचा सर्वांत सुरक्षित पर्याय म्हणजे म्युच्युअल फंडातील एसआयपी (SIP) गुंतवणूक होय.

Ratnakar Ashok Patil
Published:

Mutual Fund SIP:- आजकाल अनेक गुंतवणूकदार शेअर बाजारातील वाढत्या संधींचा लाभ घेत आहेत. मात्र जोखीम मर्यादित ठेवत चांगला परतावा मिळवण्याचा सर्वांत सुरक्षित पर्याय म्हणजे म्युच्युअल फंडातील एसआयपी (SIP) गुंतवणूक होय.

ही योजना शेअर बाजाराशी निगडित असली तरी तुलनेने कमी जोखमीची आहे आणि दीर्घकाळ गुंतवणूक केल्यास मोठी संपत्ती तयार करता येते. चला तर मग मंडळी आपण जाणून घेऊया की, केवळ 3 ते 4 वर्षांत 50 लाख रुपयांचा फंड कसा उभारता येईल.

गुंतवणुकीसाठी योग्य पर्याय कोणता?

जर तुम्ही अल्प किंवा मध्यम कालावधीसाठी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर एसआयपी आणि एकरकमी गुंतवणूक हे दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत. मात्र नियमित व शिस्तबद्ध बचतीसाठी एसआयपी हा अधिक चांगला पर्याय ठरू शकतो.

यामध्ये तुम्ही निश्चित रक्कम दरमहा गुंतवून मोठी संपत्ती उभारू शकता. जर तुम्हाला पुढील 3 ते 4 वर्षांत 50 लाख रुपयांचा फ्लॅट खरेदी करायचा असेल तर योग्य नियोजनाने म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल.

50 लाखांचे टार्गेट

समजा, तुम्ही 3 वर्षे आणि 5 महिने दरमहा 1 लाख रुपये एसआयपीमध्ये गुंतवत असाल तर या कालावधीत तुमची एकूण गुंतवणूक 42 लाख रुपये होईल.

जर या गुंतवणुकीवर तुम्हाला 12% वार्षिक परतावा मिळत राहिला तर तुम्हाला एकूण 10.39 लाख रुपये व्याज मिळेल. त्यामुळे मॅच्युरिटीच्या वेळी तुम्हाला एकूण 52.39 लाख रुपयांचा फंड उपलब्ध होईल. या रकमेमुळे तुमच्या घराच्या स्वप्नाला साकार रूप मिळू शकते.

म्युच्युअल फंड SIP गुंतवणुकीचे फायदे

कमी जोखीम – शेअर बाजाराच्या थेट गुंतवणुकीपेक्षा कमी जोखमीचा पर्याय

शिस्तबद्ध गुंतवणूक – नियमित बचतीमुळे मोठी संपत्ती निर्माण करण्यास मदत.

संभाव्य उच्च परतावा – चांगल्या फंडात गुंतवणूक केल्यास 10-15% वार्षिक परतावा मिळू शकतो.

कर बचत – ELSS फंडाच्या माध्यमातून करसवलत मिळवता येते.

लिक्विडिटी – गरज पडल्यास गुंतवणूक मोडता येण्याची सुविधा.

शिस्तबद्ध गुंतवणूकदारांसाठी फायद्याचे

जर तुम्ही शिस्तबद्ध आणि दीर्घकालीन गुंतवणुकीत आवड ठेवत असाल तर म्युच्युअल फंडातील एसआयपी हा एक उत्तम पर्याय आहे. योग्य नियोजन आणि चांगल्या फंडाची निवड केल्यास तुम्ही 3 ते 4 वर्षांतच ५० लाखांचा फंड तयार करू शकता. त्यामुळे लवकरात लवकर गुंतवणुकीला सुरुवात करा आणि तुमच्या आर्थिक उद्दिष्टांची पूर्तता या माध्यमातून करणे गरजेचे आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe