Crypto Currency Price:- गेल्या काही आठवड्यांतील अस्थिरतेनंतर मंगळवारी क्रिप्टोकरन्सी बाजारात जोरदार तेजी पाहायला मिळाली. बिटकॉइन जो जगातील सर्वात मोठा आणि प्रभावी क्रिप्टो अॅसेट मानला जातो. त्याने 3.70% पेक्षा अधिक उसळी घेतली आणि $98,700 च्या पुढे गेला. इथर, सोलाना आणि XRP सारख्या इतर मोठ्या क्रिप्टोकरन्सींचाही वेग वाढला आहे.
बाजारातील तेजीमागील कारण काय?
या वाढीमागे अनेक महत्त्वाची कारणे आहेत.
अमेरिका आणि चीनमधील व्यापारी तणाव
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी चीन आणि मेक्सिको यांसारख्या देशांवर नव्या टॅरिफ्स (शुल्क) लावले आहेत. परिणामी जागतिक स्टॉक मार्केटमध्ये मोठी घसरण झाली. अशा वेळी गुंतवणूकदार पारंपरिक शेअर मार्केटऐवजी क्रिप्टोमध्ये पैसे टाकत आहेत.
बिटकॉइनचा ऐतिहासिक उच्चांक
बिटकॉइनने अलिकडेच $109,200 च्या उच्चांकाला स्पर्श केला होता. ज्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये आत्मविश्वास वाढला आहे. बिटकॉइनची वाढती लोकप्रियता आणि स्वीकारार्हता हे देखील किंमतीत वाढ होण्यामागील एक मोठे कारण आहे.
डोनाल्ड ट्रम्प आणि क्रिप्टोकरन्सी धोरण
ट्रम्प यांनी त्यांच्या प्रचार मोहिमेत बिटकॉइन आणि क्रिप्टोकरन्सीच्या समर्थनाचे संकेत दिले होते. त्यांनी बिटकॉइनचा राष्ट्रीय साठा निर्माण करण्याची योजना मांडली होती. मात्र फेडरल रिझर्व्हने या योजनेला हिरवा कंदील दिलेला नाही. तरीसुद्धा ट्रम्प यांच्या भूमिकेमुळे बाजाराला सकारात्मक गती मिळाली आहे.
क्रिप्टो मार्केटमध्ये दोन अब्ज डॉलर्सहून अधिक खरेदी
बाजार विश्लेषकांच्या मते, गेल्या काही तासांमध्ये क्रिप्टो मार्केटमध्ये दोन अब्ज डॉलर्सहून अधिक खरेदी झाली आहे. मोठे संस्थागत गुंतवणूकदार आता क्रिप्टोमध्ये अधिक रस दाखवत आहे. ज्यामुळे किंमती आणखी वाढण्याची शक्यता आहे.
इतर प्रमुख क्रिप्टोकरन्सींची कामगिरी
बिटकॉइन व्यतिरिक्त इतर प्रमुख क्रिप्टोकरन्सींमध्येही मोठी वाढ दिसून आली.जसे की,इथर (ETH): 5% वाढून $2,731 च्या पुढे आणि सोलाना (SOL): 6.3% उसळी आणि XRP: 4.2% वाढ झाल्याचे दिसून आले.
या क्रिप्टोकरन्सींच्या वाढीमुळे संपूर्ण बाजार तेजीत दिसत आहे.
भारतात क्रिप्टोकरन्सीबाबत सरकारचा दृष्टीकोन
भारत सरकारने क्रिप्टोकरन्सीवर अजूनही कठोर धोरण ठेवले आहे. आर्थिक व्यवहार सचिव अजय सेठ यांनी सांगितले की, क्रिप्टोच्या धोरणावर पुनर्विचार केला जात आहे.
“जागतिक स्तरावर काही देशांनी क्रिप्टोकरन्सी स्वीकारण्याच्या भूमिकेत बदल केला आहे. त्यामुळे आम्हीही आमच्या धोरणाचा आढावा घेत आहोत,” असे सेठ यांनी स्पष्ट केले.
याच दरम्यान भारतात बायबिट या दुबईस्थित क्रिप्टो एक्सचेंजला 9.27 कोटींचा दंड ठोठावण्यात आला आहे. फायनान्शियल इंटेलिजेंस युनिटने मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन केल्यामुळे हा दंड लावला आहे.
गुंतवणूकदारांनी पुढे काय करावे?
सध्याच्या तेजीच्या पार्श्वभूमीवर, क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी हा चांगला काळ असू शकतो. मात्र गुंतवणूकदारांनी खालील गोष्टी लक्षात ठेवाव्यात…..
क्रिप्टो बाजार अस्थिर असतो
बिटकॉइन आणि इतर करन्सी जरी वेगाने वाढत असल्या तरी भविष्यात किंमतीत मोठे चढउतार होऊ शकतात.
सतत अपडेट राहा
जागतिक बाजारातील घडामोडींवर लक्ष ठेवा.कारण त्या क्रिप्टोच्या किमतींवर थेट परिणाम करतात.
तज्ज्ञांचा सल्ला घ्या
मोठी गुंतवणूक करण्याआधी तज्ज्ञ सल्लागारांचा सल्ला घ्यावा.
क्रिप्टोकरन्सीचा भविष्यातील अंदाज
किंमती आणखी वाढणार?
बाजार विश्लेषकांच्या मते, जर बिटकॉइनने $100,000 चा स्तर पार केला तर तो पुढील काही महिन्यांत $120,000 पर्यंत जाऊ शकतो. क्रिप्टोकरन्सीमध्ये संस्थागत गुंतवणूक वाढत आहे आणि जागतिक बाजारातील अस्थिरतेमुळे क्रिप्टो ही गुंतवणुकीसाठी पर्यायी मालमत्ता म्हणून उदयास येत आहे.
गुंतवणुकीसाठी योग्य संधी का?
बिटकॉइन आणि इतर प्रमुख क्रिप्टोकरन्सी सध्या वेगाने वाढत आहेत. जागतिक घडामोडी, अमेरिकेचे नियामक धोरण, आणि गुंतवणूकदारांचा वाढता कल लक्षात घेता क्रिप्टोकरन्सी बाजार अजूनही मोठ्या संधी देत आहे.मात्र प्रत्येक गुंतवणुकीस धोका असतो. त्यामुळे गुंतवणूकदारांनी काळजीपूर्वक आणि योग्य नियोजनाने पावले उचलावीत.