नवी दिल्ली : देशातील एकूण सोन्याची मागणी २०२३ मध्ये ७६१ टन होती. आयात शुल्क कपात, सोन्याच्या विक्रमी किमतींमुळे गुंतवणूक मागणीत वाढ आणि लग्न आणि सणांमुळे वाढलेली खरेदी यामुळे गेल्या वर्षात देशातील सोन्याची मागणी ५ टक्क्यांनी वाढून ८०२.८ तणांवर गेली; पण या वर्षी सोन्याची मागणी कमी होण्याचा अंदाज आहे.
प्रत्यक्षात, सोन्याच्या किमतीत विक्रमी वाढ झाली असल्याने लोकांना इच्छा असूनही सोने खरेदी करता येत नाही अशी स्थिती आहे. परिणामी, या वर्षामध्ये सोन्याची मागणी ७००-८०० टनांपर्यंत कमी होण्याचा अंदाज जागतिक सुवर्ण परिषदेने आपल्या अहवालामध्ये व्यक्त. केला आहे भारतातील सोन्याची मागणी कायम आहे. २०२५ मध्ये सोन्याची मागणी ७०० ते ८०० टनांच्या दरम्यान असेल, असा आमचा अंदाज आहे. किमतींमध्ये
काही स्थिरता असेल तर लग्नाशी संबंधित खरेदीमुळे सोन्याच्या दागिन्यांची मागणी वाढेल, अशी अपेक्षा आहे. सोन्याच्या गुंतवणूक मागणीचा कल कायम राहील आणि किरकोळ गुंतवणूकदार गोल्ड ईटीएफ, डिजिटल गोल्ड, बार आणि कॉईन्समध्ये गुंतवणूक करत राहतील, असे जागतिक सुवर्ण परिषदेचे भारतातील प्रादेशिक मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन जैन यांनी म्हटले आहे
या वर्षी सोन्याचा भाव ८.०७ टक्क्यांनी वाढून ८५,८०० रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे, जो १ जानेवारी रोजी ७९, ३९० रुपये प्रति १० ग्रॅम होता. जागतिक सुवर्ण परिषदेच्या अहवालानुसार, चौथ्या तिमाहीत (ऑक्टोबर-डिसेंबर) मागणी २६५.८ टनांवर स्थिर राहिली, जी २०२३ च्या याच कालावधीत २६६.२ टन होती. २०२३ मध्ये ५७५.८ टन असलेल्या दागिन्यांची मागणी २०२४ मध्ये दोन टक्क्यांनी कमी होऊन ५६३.४ टन होण्याची अपेक्षा आहे. . त्याच वेळी २०२४ मध्ये सोन्याची आयात ४ टक्क्यांनी घसरून ७१२.१ टन झाली. २०२३ मध्ये हे ७४४ टन होते.
गेल्या वर्षात रिझ रिझर्व्ह बँक सोन्याचा महत्त्वाचा २ खरेदीदार ठरला असून ७३ टन सोने खरेदी झाली आहे. ही खरेदी २०२३ मधील १६ टनांच्या तुलनेत चार पट जास्त आहे. शिवाय, सोन्यासाठी मजबूत गुंतवणूक मागणीचा कल कायम राहील, असा अंदाज आहे. गेल्या वर्षात जागतिक स्तरावर सोन्याची मागणी मोठ्या प्रमाणात स्थिर राहील. २०२३ मधील ४,९४५.९ टनांच्या तुलनेत गेल्या वर्षात ही मागणी वाढून ४,९७४ टन झाली. उच्च किमती, कमकुवत आर्थिक वाढ आणि वाढत्या जागतिक अनिश्चिततेमुळे अलंकारांच्या मागणीत घट झाली आहे, असे जैन यांनी सांगितले