8th Pay Commission : सध्या आठवा वेतन आयोगाबाबत मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहेत. सरकारने आठवा वेतन आयोगाच्या स्थापनेची घोषणा केल्यापासून या चर्चा अधिक जोर धरत आहेत. आठवा वेतन आयोगाच्या स्थापनेची घोषणा तर झाली आहे पण आठवा वेतन आयोग प्रत्यक्षात कधीपासून लागू होणार, आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर पगार कितीने वाढणार? DA, TA सह HRA अन इतर भत्त्यांमध्ये किती वाढ होणार? ईपीएफ ग्रेच्युटी कितीने वाढणार? असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित होताना दिसत आहेत.
दरम्यान जर तुम्हीही सरकारी कर्मचारी असाल आणि तुमच्या मनातही असेच काही प्रश्न असतील तर तुमच्यासाठी आजचा हा लेख फारच कामाचा ठरणार आहे. कारण की आज आपण आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनापासून ते भत्यापर्यंत काय काय बदल होणार? याची एक डिटेल माहिती घेणार आहोत.
आठवा वेतन आयोग कधीपासून आणि पगार किती वाढणार?
गेल्या वर्षापासून आठवा वेतन आयोगाच्या चर्चा सुरु आहेत. कारण असे की आत्तापर्यंत जेवढे वेतन आयोग लागू झाले आहेत ते सारे वेतन आयोग प्रत्येक दहा वर्षांनी लागू करण्यात आले आहेत. पहिला वेतन आयोग 1946 मध्ये लागू झाला आणि त्यानंतर प्रत्येक दहा वर्षांनी वेतन आयोग लागू होत आले आहेत.
सध्याचा सातवा वेतन आयोग हा 1 जानेवारी 2016 पासून लागू झाला आहे. यानुसार आता आठवा वेतन आयोग हा 1 जानेवारी 2026 पासून लागू होणे अपेक्षित आहे. सातवा वेतन आयोगाच्या समितीची स्थापना 2014 मध्ये झाली होती. मात्र आठवा वेतन आयोगाच्या समितीची स्थापना 2025 मध्ये झाली आहे.
यामुळे आता अवघ्या 10-11 महिन्यांच्या काळातच या आठवा वेतन आयोगाच्या समितीला आपल्या शिफारशी सरकारला द्यावे लागणार आहेत आणि सरकार या शिफारशी एक जानेवारी 2026 च्या आधी स्वीकृत करेल आणि प्रत्यक्षात एक जानेवारी 2026 पासून आठवा वेतन आयोग लागू होईल असे म्हटले जात आहे. पगारवाढीबाबत बोलायचं झालं तर सातवा वेतन आयोग लागू झाला त्यावेळी पगारात 14 टक्के वाढ झाली होती मात्र यावेळी पगारात वीस ते तीस टक्के वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
बेसिक पगार काय असेल?
किमान मूळ वेतन ठरवण्यात फिटमेंट फॅक्टर महत्त्वाची भूमिका निभावणार आहे. 7 व्या वेतन आयोगामध्ये फिटमेंट फॅक्टर 2.57 होता, परिणामी किमान वेतन 18,000 रुपये आहे. प्रस्तावित आठव्या वेतन आयोगात ते 1.90, 2.08 किंवा 2.86 असू शकते, ज्यामुळे मूळ वेतनात लक्षणीय वाढ होईल असा अंदाज वर्तवला जातोय.
आठवा वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर 1.90 असण्याची शक्यता दाट आहे. असे केल्यास सरकारी कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन १८,००० रुपयांवरून ३४,२०० रुपयांपर्यंत वाढू शकते, असा दावा मीडिया रिपोर्ट मध्ये केला जातोय.
पेन्शन मध्ये किती वाढ होणार?
सध्या किमान पेन्शन 9000 रुपये आहे मात्र आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर किमान पेन्शन दुपटीने वाढण्याची शक्यता आहे. किमान पेन्शन 15 ते 20 हजार रुपयांच्या घरात जाईल आणि कमाल पेन्शन ही जवळपास सव्वा लाखाच्या आसपास असेल असे म्हटले जात आहे.
DA, TA अन HRA मध्ये काय बदल होणार?
DA अर्थातच महागाई भत्ता आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर शून्य होऊ शकतो असे म्हटले जात आहे. किंवा मग 50% DA शून्य केला जाईल अन त्यापुढील DA प्रमाणे लाभ दिला जाऊ शकतो. आठव्या वेतन आयोगात वाहतूक भत्ता म्हणजेच टीए आणि घरभाडे भत्ता म्हणजेच एचआरए देखील चांगला राहणार आहे. परंतु प्रत्यक्षात हे भत्ते किती वाढणार हे सर्वस्वी आठवा वेतन आयोगाच्या तरतुदी समोर आल्यानंतरच क्लिअर होणार आहे.
ग्रॅच्युइटी आणि पीएफमध्ये काय बदल होतील
सरकारी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर मिळणारी ग्रॅचूटी ची रक्कम वाढण्याची शक्यता आहे. निवृत्ती ग्रॅच्युईटी आणि पीएफ योगदानात सुद्धा वाढ मिळणार आहे. पीएफ योगदानात वाढ झाल्यास सेवानिवृत्तीनंतर सरकारी कर्मचाऱ्यांना आर्थिक स्थैर्य लाभणार आहे.